बेसरकार...

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
29 Feb 2024 - 3:54 pm

17 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या रावळपिंडीचे विभागीय आयुक्त असलेल्या लियाकत अली चट्टा यांनी पाकिस्तानातच नव्हे तर आख्ख्या जगात खळबळ उडवून दिली !!! दहा बारा दिवसापासून पाकिस्तानात व्यवस्थेचा नंगा नाच सुरु आहे. राष्ट्रीय निवडणुका झाल्या, त्याची मत मोजणी सुरु झाल्यावर तिकडे धुमाकुळ सुरु झाला. इम्रानखानला आधीच तुरुंगात ठेवले आहे. त्याचा पक्ष मोडीत काढला. चिन्ह गोठवले. पुन्हा कधी निवडणूक लढण्याचे धाडस केले नाही पाहिजे अशी तजवीज करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात भलतंच घडलं. आम जनतेने त्यालाच डोक्यावर घेतले. त्याचे उमेदवार अपक्ष लढले. आणि सर्वाधिक संख्येने निवडून देखील आले.

प्रत्यक्षात पाकिस्तानातल्या लष्कराला नवाज शरीफला पंतप्रधान करायचे होते. त्या साठी दोनच महिने आधी त्याला इंग्लंड मधून पाकीस्तानात परत आणले. त्याच्यावर देखील भ्रष्टाचारा सहित अनेक आरोप होते. तिथल्या प्रथेप्रमाणे तो पळून गेला होता. पण दस्तुरखुद्द लष्करानेच त्याला परत बोलावले, त्याच्यावरील आरोपातून मुक्तता केली. लष्कराला त्याची कठपुतळी करून त्याला गादीवर बसवायचे होते. पण इम्रानच्या पाठीराख्यानी लष्कराचे मनसुबे उधळले. जसजशी मत मोजणी होऊ लागली तसतसे पाकिस्तानातले वातावरण बिघडू लागले.

आपल्याकडे EVM च्या नावाने कंठशोष करणारे राजकीय नेते आणि विशेषतः फुरोगामी लोकांना 2014 पासून मतपत्रिकेचा पुळका आला आहे. बँक, विमा, ईमेल इत्यादी ई-व्यवस्था यांना मान्य आहे. पण EVM हॅक होते आहे असा साप हे लोक्स सतत सोडत असतात. पाकिस्तानात शेवटी सरळ लष्कराने आपल्या हस्तकांमार्फत मतपेट्या ताब्यात घेतल्या आणि ज्यांना हवे त्यांना निवडून आणले. कायदा, नियम आणि लोकमत गेले तेल लावत !!! नवाज शरीफ जितक्या मताने निवडून आला तितक्या संख्येने त्या मतदार संघात मतदारच नाहीत, वगैरे !!!

तर लियाकत अली 17 फेब्रुवारी रोजी सकाळी आत्महत्या करायच्या तयारीला लागले होते. पण मग त्यांनी ज्या कारणाने आपण स्वतःला आपण आरोपी ठरवून आत्महत्या करीत आहोत, ती बाजु आम जनतेला कळावी म्हणून आत्महत्येचा विचार बाजुला ठेवला आणि एक पत्रकार परिषद भरवली. त्यांनी सरळ सांगून टाकले की जे उमेदवार हरत होते त्या - नवाज शरीफच्या - प्रतिनिधींना आम्ही सत्तर सत्तर हजार अधिक मते तयार करून जिंकवले आहे. हे काम लियाकत अलीने मुख्य निवणूक आयुक्त आणि मुख्य न्यायाधीश यांच्या सांगण्याने आणि संगनमताने केले असल्याचा आरोप केला.

तिकडली जनता मतमोजणी मध्ये काहीतरी भानगड होते आहे या संशयाने अगोदरच कावली होती, त्यात लियाकत अलीने तेल ओतले. बरोबर एक महिन्यांनी लियाकत सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कबुली जबाबाला अधिक महत्व दिले गेले. जाते जाते कौन खुदको बरबाद कर के जाएगा ??? पण त्या बहाद्दराने ते केलं.

लियाकत अलींना तातडीने अटक झाली, आता सगळ्यांनी त्यांना मनोरुग्ण ठरवले आणि तिकडच्या प्रथेप्रमाणे गायब केले आहे. लियाकत अलीचा सध्यातरी कुठे पत्ता नाही !!

पाकिस्तान हा तमाम रानटी लोकांचा बेबंद देश आहे. पाकी लोकांना रानटी म्हटल्यावर आपल्याकडल्या 'मानवतावादी' कार्यकर्त्यांना माझा राग येणे हा त्यांच्या प्रचाराचा एक भागच आहे. पण त्यांच्या तिकडच्या भाऊ बंदानी "होय कसाब आमचा आहे आणि आम्ही क्रुर खेळी खेळली त्याची आम्हाला लाज वाटते" असे कधी म्हटले नाही. ते मुर्ख लोक कसाबचा विषय काढला की कुलभूषण जाधवांची केस पुढे करतात. म्हंजे मुंबईत शेकडो खुन त्यांनी केले हा विषय त्यांच्या पटलावर ते आणतच नाहीत. त्यांच्या विषयी आस्था का ठेवायची ? डुक्कर कुठचे !!!

एकाच दिवशी स्वतंत्र देश म्हणून जन्माला आलेल्या भारत आणि पाकिस्तानात इतका जमीन अस्मानाचा फरक केवळ एका कारणामुळे आहे. पाकिस्तानातली जनता देशापेक्षा धर्म मोठा मानते. आणि मदरशांमध्ये तिथल्या तमाम जनतेला त्यांचा धर्म पृथ्वी सपाट असून सुर्य तिच्या भोवती घिरट्या घालतो असे शिकवून रानटी प्रजा बनवतो. पाकिस्तान माणसात येणं अशक्य आहे. पाकिस्तान आपल्याबरोबर सख्य करणे अशक्य आहे.

मला भारतीयांचे कमालीचे कौतुक वाटते. शंभर, सव्वाशे, दिडशे कोटी लोक असणाऱ्या या अगडबंब देशात लोकांनी आजवर व्यवस्था छान रुजवल्या आहेत. शिस्त बाळगली. कोरोनासारख्या महामारीमध्ये एकमेकांना कमालीचा आधार दिला आणि सांभाळले. त्यातून सही सलामत बाहेर आले.

हिंदु समाज, हिंदु परंपरा आणि हिंदु जनता मानवते प्रती संवदेनशील आहे आणि सामाजिक बांधिलकी हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते. कितीही कट्टरता कुणी दाखवली तरी राष्ट्र प्रथम या विषयी कधी कुणाला शंकाच नसते. अनेक महनीय व्यक्ती, चळवळी, संस्थानी राष्ट्र प्रथम ही जबाबदारी लोकांमध्ये जागी ठेवली हे भारतीयांवर त्यांचे थोर उपकारच आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर गेली शंभर वर्षे अव्याहत हेच काम तळमळीने करतो आहे. राष्ट्रसर्वतोपरी !

आसेतुहिमाचल एक राष्ट्र म्हणून जगण्याची आणि ते मानण्याची आपली सवय गेल्या काही शतकांच्या आक्रमणाने मोडली जाणे स्वाभाविक आहे. पण भारतीय समाज गोड आहे. स्वातंत्र्य मिळाल्या नंतरच्या अगदी किरकोळ कालावधी मध्ये आपण एक राष्ट्र आहोत हे मानले, जगलो आणि राष्ट्र हे आमचे पहिले कर्तव्य आहे, बाकी सब बादमें ही जाणीव सतत जिवंत ठेवली आहे.

अगदी यातल्या आपल्या विषयीच्या प्रत्येक विधानाच्या उलट तिकडे पाकिस्तानात पहिल्या दिवसापासून आजतागायत सुरु आहे. त्यामुळे ते सर्वार्थाने सातत्याने भिकेला लागलेले आहेत !

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Feb 2024 - 6:31 pm | मुक्त विहारि

इथल्या काही पक्षांना, EVM का नको आहे? ह्याचे उत्तर पाकिस्तानने दिले...

अहिरावण's picture

29 Feb 2024 - 7:24 pm | अहिरावण

अगदी नेमके.

लेख अनेक गोष्टींचा ऊहापोह करतोय.

हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते.

प्लीज गुणसूत्रांवर असं काहीच लिहिलेलं नसतं.हिंदूंच्या अभिमानात ,स्वाभिमानात लिहिलेलं असतं असं म्हणा हवं तर.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Mar 2024 - 12:41 am | अमरेंद्र बाहुबली

ऊगाच पुरोगामी वगैरे शब्द वापरून लेखाचा कचरा करून घेतला.

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2024 - 6:10 pm | चौथा कोनाडा

पाकिस्तान हा तमाम रानटी लोकांचा बेबंद देश आहे.

म्हणूनच कायम अराजकताच तिथं धुमाकूळ घालत असते... काही सुधारणा बिधारणा झाल्या तर त्या तात्पुरत्या ... पुन्हा पैले पाढे पंचावन्न !

हिंदु समाज, हिंदु परंपरा आणि हिंदु जनता मानवते प्रती संवदेनशील आहे आणि सामाजिक बांधिलकी हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते. कितीही कट्टरता कुणी दाखवली तरी राष्ट्र प्रथम या विषयी कधी कुणाला शंकाच नसते. अनेक महनीय व्यक्ती, चळवळी, संस्थानी राष्ट्र प्रथम ही जबाबदारी लोकांमध्ये जागी ठेवली हे भारतीयांवर त्यांचे थोर उपकारच आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर गेली शंभर वर्षे अव्याहत हेच काम तळमळीने करतो आहे. राष्ट्रसर्वतोपरी !

जय हिंद, जय भारत !