रांगडी रात्र
रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचा पण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रुममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापुर्वीच तिचे मिस्टर दुर कुठेतरी दोन दिवसांच्या अॉफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करुन ट्रॅव्हल भेटल्याची खात्री करुन घेतली. दिवस तसा धावपळीतच गेला होता. एक अनामिक हुरहुर तिला लागुन राहीलेली. घड्याळाकडे वारंवार नजर चालली. तसही करण्यासारखं काही काम नव्हतं. रोजचा छंद म्हणुन बेडटाईम स्टोरीज वाचत पडली होती.