आतापर्यंत ..... मेहुणी " अहो हे काय तूमचे नाव मला 'People You May Know' मध्ये तुमचे नाव आणि प्रोफाईल पिक्चर दिसत आहे.अहो थांबा इथे तर तुमचे ३-४ सेम टु सेम नावे आणि फोटो दिसत आहेत." झाले अमितच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्यासोबत अमितही डोक्याला हात लावून खाली बसला.... त्याच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द होते... "अरे बापरे !!! आता हे काय नविन लफडे आहे." पुढे चालु.....
स्क्रिन शॉट भाग -४ पुढे चालू
ह्या मेसेज,स्क्रिन शॉट, नंतर सेम टू सेम प्रोफाइल्सने अमित साठी आजचा दिवस या वेळे पर्यंत तरी एका मागोमाग एक धक्के देणाऱ्या भूकंपाचा ठरला होता. म्हणतात ना सलग मिळणाऱ्या सुखाने माणूस आळशी आणि दुःखाने कणखर बनतो. अगदी तसेच आता अमितचे सुध्दा झाले होतेे.त्याने फेसबुक अकाऊंट ओपन करुन नेमके काय झाले आहे हे पहायचे ठरवले.त्याने स्क्रिन वर नजर टाकताच त्याला SMS, मेसेंजर व व्हाट्स अप वर आलेले नोटिफिकेशन्स दिसले.आता त्याने प्रथम नोटिफिकेशन्स वाचायचे ठरवले आणि एक एक मेसेज वाचु लागला तसे आपण समजतो तसे एकटे पडलेलो नाही याची त्याला जाणीव झाली. कितीतरी मित्र- मैत्रिणी, सहकारी,नातेवाईक त्याला सपोर्ट करत असल्याचे त्यांनी कळवले तर होतेच पण वेगवेगळ्या गृपवरील मित्र असलेले सुधीर,जगदीश,विशाल,सुषमा,नेहा/सोहम,सार्थक अजुन बरेचसे असे जवळचे मित्र एकत्र येऊन अमितसाठी " i am with amit " नावाचा एक सपोर्ट गृप तयार करुन त्यावर त्यांनी कामाची विभाजणी सुध्दा केली होती. अमितने त्या गृपवरील पोस्ट आणि कमेंट्स वाचायला सुरुवात केली आणि आपण आभासी जग म्हणून सर्वांबाबत किती चुकीचा विचार करत होतो हे त्याला जाणवले. सर्वात पहिली त्याने पिन पोस्ट पाहिली त्यात लिहिले असे लिहिले होते कि " Hi Friends आज सकाळी नेहमी प्रमाणे आपण सर्वजण फेसबुकवर आलो ते कोणी सवयी प्रमाणे तर कोणी आलेल्या मेसेज वा कॉलमुळे आलो. आजची सकाळ हि आपल्या सर्वांना तशी धक्का देणारी ठरली आहे. आपला मित्र अमित याचे अकाऊंट वरून काही आक्षेपार्ह मेसेज असलेले स्क्रिन शॉट काहिजणांनी आपल्या वॉलवर टाकले आणि अमितला त्या बद्दल जाब विचारला आहे.फ्रेंड्स अमित असे करू शकतो का? हा प्रश्न स्वतःला विचारा जर नाही असे वाटत असेल तर आम्हाला मदत करा.
अमित एकटाच जितके स्पष्टीकरण देईल तितकी परिस्थिती अजुन बिघडत जाईल. तरी आत्ताच आपण केलेल्या आपल्या मदतीचे आणि त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे महत्व आहे. एकमेकांवर विश्वास असतो तेव्हा दोरीवर चालणारा खाली डफली वाजवत असलेल्या साथीदारावर त्याच्या तालावर विश्वास असतो म्हणून छोट्याशा दोरीवर चालत असतो. आणि जर खालच्याचा ताल चुकला तर त्याला माहित असते आपण आपले स्वतःचे तरी असतो का?
आता मदत म्हणजे नेमके काय करायचे आहे हे आम्ही तुम्हाला इनबॉक्स मध्ये पाठवतो." हे सर्व वाचून झाल्यावर अमितला आता नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रु वाहु लागले. हे आनंदाचे होते कि अजुन कसले हे मात्र तो सुध्दा सांगु शकला नसता. आता आपण नेमके काय करावे असा तो विचार करत असतानाच अचानक त्याच्या पाठिवर कोणीतरी हात ठेवला. आणि अमितला परत एकदा जबरदस्त धक्का बसला आणि तो मोठ्याने ओरडला " शक्यच नाही ?"
क्रमशः
प्रतिक्रिया
26 Sep 2015 - 7:44 pm | मांत्रिक
मस्तच!!! कथा छान रंगवताय!!! बिचारा अमित या ग्रहणातून सुटो म्हणजे झालं!!!
26 Sep 2015 - 8:35 pm | चांदणे संदीप
वाटल नव्हत फेबुपण कधी असा शॉट देईल डोक्याला!
26 Sep 2015 - 8:40 pm | बाबा योगिराज
मस्त लिव्लै.
पुभाप्र.