तरूण तेजपाल, तेहेलका आणि पत्रकारीतेतील नैतिकता
तेहेलकाचे नाव ऐकल्यावर भारतात "स्टींग ऑपरेशन" कसे प्रचलीत झाले ते लक्षात येते. बंगारू लक्ष्मण यांचे लाच घेताना काढलेल्या चित्रफिती आठवतात. तोच प्रकार इतर राजकारण्यांबरोबर देखील केला. मोदींच्या विरोधात गोध्रादंगलीवरून आवाज करणार्यांमधे तेहलकाच पुढे होते. त्याचे संस्थापक - प्रमुख संपादक तरूण तेजपाल हे इंडीया टूडे, आउटलूक आदी कम्युनिस्ट विचारसरणींच्या माध्यमातून वर आलेले असल्याने सगळा तेहेलका हा भाजपा, संघ आणि तत्सम (आणि कधी कधी काँग्रेसच्या) विरोधातच असणे ह्यात काहीच आश्रर्यकारक नव्हते.