सत्तेवर कोण यायला हवे
देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले. अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले.