राज ठाकरे यांचे काय चाललेय?

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
23 Oct 2013 - 4:32 pm

काही वर्षांपूर्वी राजसाहेब ठाकरे सेनेतून बाहेर पडले .. त्यांनी मराठी आणि विकास हे मुद्दे उचलून धरले. तेव्हा महाराष्ट्राला नवनिर्माणाच्या काही आशा निर्माण झाल्या होत्या. त्याचं प्रतिबिंब मतांमधेही दिसून आलं... पण काही प्रश्न निर्माण होतातच.
राज यांनी बांगलादेशींच्या हिंसाचाराचा निषेध करणारा मोर्चा आझाद मैदानावर नेला त्यावेळी "आता यापुढे आपण हिंदुत्त्ववाचा मुद्दा उचलून धरणार का ? " असं विचारल्यावर त्यांनी हिदुत्त्व झटकून टाकलं. "छे छे हिंदुत्त्व वगैरे मला चिकटवू नका" असं उत्तर होतं. हिंदुत्त्वाचा इतका तिटकारा का असावा ...
राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते उघडपणे टीका करतात पण आतून सगळ्यांशी सगळीकडे घरोबा करतात. याबाबत सेनेनी टीका केल्यावर म्हणतात "सेनेनी तरी सुरुवातीच्या काळात दुसरं काय केलं ? "
राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते टीका करतात. अपवाद फक्त - शरद पवार. त्यांचा उल्लेख ते पवारसाहेब असाच करतात.
मधे टोलविरोधी आंदोलन हाती घेतले. ते पुढे का बंद पडले ?

मोदींच्या गुजरातचं त्यांना केवढं कौतुक पण मोदींचे हात बळकट करावेसे मात्र वाटत नाहीत. मागच्या २००९ च्या विधानसभा निवडणूकीत सेना-भाजप युतीचे जवळपास ४४ उमेदवार मतविभागणीमुळे पडले. पुणे लोकसभेचे उदाहरण सर्वांसमोर आहे.
काँग्रेसला भाजपपेक्षा २८००० मते अधिक मिळाली. मनसेने मते मिळवली ७६०००. ही मतविभागणी झाली नसती तर ! बरं याचा फायदा उठवून पुण्यात कोण विजयी झाले ? सुरेश कलमाडी. म्हणजे नेमका फायदा कुणाला होतोय.

विचारावसं वाटतं...
"आता गप्प बसायला काय घ्याल(टोलबद्दल) ? तसं आता निवडणूकीत हरायला काय घ्याल"

त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका काय ? आणि कुणाचा फायदा करून देणार ? याबाबत उत्सुकता आहे.

राजकारणविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 7:39 pm | मुक्त विहारि

फोडा, झोडा आणि राज्य करा.

मराठी माणूस फोडा आणि शिवसेना इभी करा.

मराठी माणूस अजून एकदा फोडा आणि मनसे तयार करा.

आधी पण काँग्रेसची मते ३० ते ४० टक्केच होती आणि आता पण तितकीच आहेअध्ती मते तो पक्ष राखून आहे.ते फक्त दर २५/३० वर्षांनी नविन पक्ष स्थापायला मदत करतात आणि राज्य करायला मो़कळे होतात.

थोडक्यात काय?

हाताला घड्याळ बांधा आणि प्रार्थनेची वेळ सांभाळा.

ग्रेटथिन्कर's picture

23 Oct 2013 - 8:02 pm | ग्रेटथिन्कर

भाजप परप्रांतियांची बाजू घेतो.. त्याला मनसेने कशाला साथ द्यायची?
काँग्रेस भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष बिहारी आणि युपीवाल्यांच्या ताब्यात असतात ,रेल्वे अवजड उद्योग वगैरे भरपुर नौकर्या असलेल्या खात्याचे भैय्ये मंत्री मराठ्याला कात्रजचा घाट दाखवतात... त्यामुळे प्रादेशिक पक्षांची ताकद वाढवणे गरजेचे आहे.. कोणत्याही पक्षाला मत द्या राष्ट्रवादी ,शिवसेना ,मनसे आरपीआय.... प्रादेशिक पक्ष बळकट करा ..तरच दिल्लिश्वर नरमतील..

काँग्रेस भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष बिहारी आणि युपीवाल्यांच्या ताब्यात असतात ,रेल्वे अवजड उद्योग वगैरे भरपुर नौकर्या असलेल्या खात्याचे भैय्ये मंत्री मराठ्याला कात्रजचा घाट दाखवतात...

भाजप केंद्रात सत्तेत असताना राम नाईक केंद्रीय रेल्वेमंत्री होते.
नेमकं आठवत नाही परंतू विलासराव देशमुखांकडे कधी काळी अवजड उदयोग खाते होते.

तिमा's picture

24 Oct 2013 - 1:21 pm | तिमा

यांच नांवाचा धागा, मी मागे लिहिला होता. तो येथे आहे. येथे

प्रसाद गोडबोले's picture

24 Oct 2013 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले

राजसाहेबांकडुन फार अपेक्षा होत्या राव ...पण एकुणच राजकारणाची दिशा पाहता अन नाशिक मधील मनसेचे कर्तृत्व पाहता फार मोठ्ठा अपेक्क्षाभंग झाला आहे हे कबुल करतो :(

मदनबाण's picture

24 Oct 2013 - 1:36 pm | मदनबाण

आर ठाकरे यांनी टोल आंदोलन गुंडाळले तेव्हाच काय समजायचे ते समजलो !

टवाळ कार्टा's picture

24 Oct 2013 - 1:56 pm | टवाळ कार्टा

+१

बॅटमॅन's picture

24 Oct 2013 - 2:15 pm | बॅटमॅन

बाकी काही असो, मनसेच्या वेबसाईटचे डिझाईन मात्र मस्त आहे.

सुहासदवन's picture

24 Oct 2013 - 4:04 pm | सुहासदवन

केवळ दणकट भाषण करून मन जिंकता येतं पण मत जिंकण्यासाठी दणकट कामच करावं लागतं.

मुक्त विहारि's picture

24 Oct 2013 - 4:10 pm | मुक्त विहारि

+१

काम काय अन किती आहे ते सगळ्यांना दिसतंच आहे. त्यामुळे जे बरंय तेवढ्याबद्दलच बोल्लो.

आर ठाकरे उत्तम भाषणे ठोकतात पण काम ?

जाता जाता :- आर ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बहुचर्चीत नाशिकच्या गोदापार्कचा अंबानींच्या ‘रिलायन्स फाऊंडेशन'च्या माध्यमातून विकास केला जाणार आहे अशी बातमी मध्यंतरी वाचली होती.
मी मनात विचार केला आर ठाकरेनी ‘रिलायन्स फाऊंडेशन'च्या माध्यमातूनच ठाण्यातल्या रस्त्यांचा विकास केला तर किती बरं होईल ! ठाणेकरांना पार्क नाही निदान धड वाहन चालवायला तरी रस्ते मिळतील. ;)

शिवसेना - मनसे आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी ह्या दोन्ही पक्षात बरीच साधर्म्यता आहे.फरक फक्त शरद पवार. आश्चर्य वाटून घेऊ नका. माझे विधान फारच धाडसी आहे असे वाटू शकण्याची शक्यता अधिक.ज्याप्रमाणे शरद पवार कॉंग्रेसमधून फुटून बाहेर पडले त्याचप्रमाणे राज ठाकरे फुटून बाहेर पडले. कारणे वेगळी असतीलही पण शरद पवारांनी स्व-हित का सत्ता-हित समजून कॉंग्रेसशी आघाडी केली व आपली सत्ता शाबूत राखली. बरोबर याच्या विरुद्ध मनसेचे वर्तन आहे. कॉंग्रेस पक्षाने सुद्धा पवारांना ना'राज' न करता अधिक केले म्हणजेच जवळ केले .याउलट शिवसेनेने ना'राजां'ना वजा केले. वजाबाकी मागे आपसी हेवेदावे कमी व स्वतःची खुर्ची डळमळीत होईल याची भीती जास्त......

थोडक्यात काय तर बेरजेची रीत समजून घेण्यातच मनसे - भाजप - शिवसेनेचे हित आहे.....

उद्दाम's picture

26 Oct 2013 - 5:01 pm | उद्दाम

:)

पाषाणभेद's picture

26 Oct 2013 - 11:00 pm | पाषाणभेद

ते आले आले आले आले
ते गेले गेले गेले गेले

ते उद्घाटनाला आले आले आले आले
ते उद्धाटन करून गेले गेले गेले गेले

त्यांनी ब्ल्यू प्रिंट आणली आणली आणली
त्यांनी ब्ल्यू प्रिंट नेली नेली नेली

एकहाती सत्त्ता नागरीकांनी दिली
त्यांचीच उडवली तुम्ही खिल्ली

खाजगीकरण हटवीण्याच्या केल्या गप्पा
नंतर मात्र ठेकेदारांचा घेतलात पापा

कुठलाच निर्णय ठोस घ्यायचा नाही
खळ्ळ खट्याक केले तर रडायचे नाही

मोठी आशा होती तुमच्याकडून सुरूवातीला
नंतर पाने पुसली नागरीकांच्या तोंडाला

कारभार लोकांनी लोकांसाठी करायचा ही लोकशाहीची व्याख्या असते
एखाद्या माणसाच्या एकाच मतावर निर्णय घेण्यासाठी थांबायचे नसते

सगळे आधीच्याचसारखे आहे तर सांगा तुमच्यात अन त्यांच्यात फरक काय?
फक्त त्यांच्या अंगावर खादी हाय अन तुमच्या डोक्यावर पांढरी टोपी नाय!

पण लक्षात ठेवा, असेच जर नवनिर्माण असेल
तर पुढल्या वेळेला सत्तेत नवा बदल निश्चित असेल

धर्मराजमुटके's picture

26 Oct 2013 - 11:57 pm | धर्मराजमुटके

छान ! भावना तंतोतंत उतरल्या आहेत.

आशु जोग's picture

27 Oct 2013 - 1:08 pm | आशु जोग

सुपरलाइक

मिपाच्या तमाम वाचकांना आठवतच असेल की ज्याने मनसेचे गुणगाण गाईले त्याच्याच हातून असले काव्य निर्माण व्हावे यासारखे दुर्दैव कोणते?
त्याच्य हृदयाचे किती शकले झाले असतील त्याचा तुम्ही विचार केला आहे काय? वाचकांनो तुम्हीदेखील असले गुणगाण करणारे, कौतूक करणारे, चांगले बोलणारी काव्यमौतिके, लेखसुमने, आनंदमाला या व्यक्तीविषयी ऐकल्या आणि वाचल्या नसतील काय? हेची फळ काय मम तपाला असा उद्गार काढून आधीच का माझी वाचा बंद झाली नाही, हे प्रभो, हे दिनदयाळा, हे आकाशातल्या बापा, हे परवरदिगार, हे तथागथा असले काय घोर पाप मी केले होते ज्यायोगे माझ्या लेखणीतून पोवाड्यासारखे ओजस्वी कावलेखणीतून प्रगट झाले? या सार्‍या प्रकाराला काळ हाच जबाबदार नव्हे काय? वाचकांनो, तुमच्याही हृदयसिंहासनावर कधीकाळी विराजमान असलेल्या आर. ठाकरेंबाबत आपलेही मत असेच झाले आहे काय?

- दिवाळीच्या शुभेच्छा!

मंदार कात्रे's picture

27 Oct 2013 - 2:57 pm | मंदार कात्रे

होय राज ठाकरे नी खूप मोठा अपेक्षाभन्ग केलेला आहे सर्वान्चा !

मंदार कात्रे's picture

27 Oct 2013 - 3:00 pm | मंदार कात्रे

शिवसेना -मनसे एकत्र येवुन निवडणूक लढल्यास नक्की फायदा होईल ,पण इगो आडवे येतात

इगो सोडा ,महाराश्त्ट्राच्या भल्यासाठी एकत्र या !

सुहासदवन's picture

27 Oct 2013 - 3:58 pm | सुहासदवन

अहो ह्या दोन पक्षांनी एकत्र येउन तरी काही मोट्ठे दिवे लावले नसते.

मुळात एक गोष्ट मान्य करायला हवी, की शिवसेनेकडे सत्ता हातात ठेवायची आणि राबवायची व्यवस्था आहे मग भले ती मोडकी किंवा तोकडी का असेना आणि मनसेकडे मुळात अनुभवच नाही.
त्यामुळे जरी हे पक्ष एकत्र आले तरी सत्ता नक्की कोण आणि कशी राबवणार ह्यावर एक मत होणे मुळातच कठीण.
मग उद्धव कितीही संयमी असले आणि राज कितीही रोखटोख असले तरी.
कारण जर राज शिवसेनेच्या मर्जीने काही करू लागले तरी आणि नाही ऐकले तरी होणारा फायदा शिवसेनेचाच.

आणि त्याचसाठी राज ह्यांनी नाशिकचा गेम खेळलेला आहे.
न पटणाऱ्या भिडू बरोबर आधीच हात मिळवण्यापेक्षा मिळालेला जिल्हा किती व्यवस्थित चालविता येतो ते आधी पाहू मग नंतर ठरवता येईल काय करायचे ते.

ह्या दोन्ही पक्षांची स्वबळावर निवडणूक न जिंकण्याची अशी अनेक कारणे आहेत. इगो तर आहेच.
पण खरच आत्ताचे सरकार भ्रष्ट असेल आणि ह्या दोन्ही पक्षांना महाराष्ट्र आणि मराठी पुन्हा उभा करायचा असेल तर तसा प्रयत्न त्यांनी आधीच केला असता ना, आपल्याला सांगावे लागलं नसतं.

उद्दाम's picture

28 Oct 2013 - 9:22 am | उद्दाम

कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय न करता अब्जाधीश असलेला मनुष्य. माझ्या दृष्टीने हेच एक मोठे कुतुहल आहे.

सोत्रि's picture

28 Oct 2013 - 9:42 am | सोत्रि

खासच!
असा विचार केला तरच 'नवनिर्माण' म्हणजे 'नेमके' काय ते लक्षात यावे!
:)

-(अब्जाधीश कसे व्हावे ह्या विचारात असलेला) सोकाजी

कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय न करता अब्जाधीश असलेला मनुष्य. माझ्या दृष्टीने हेच एक मोठे कुतुहल आहे.

+१०००००
(राजकारणातल्या सगळ्याच घराण्यांच्या चरितार्थाबद्दल कुतूहल असलेला) चावटमेला

उद्दाम's picture

28 Oct 2013 - 4:21 pm | उद्दाम

आण्णा, दोनचार शून्या अजुन वाढवायच्या की, म्हणजे आमी पण अब्जाधीश नसतो का झालो?

जेपी's picture

28 Oct 2013 - 9:57 am | जेपी

राज ठाकरे कडुन काही नवनिर्माणाची आशा होती पण एका कार्यक्रमात थोरल्या पवारांच्या पाय पडताना पाहील आशा संपुष्टात आल्या .नंतर म्हणाले राजकारण आणी खाजगी आयुष्य वेगळ असत .

सुहासदवन's picture

28 Oct 2013 - 2:57 pm | सुहासदवन

कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय न करता अब्जाधीश असलेला मनुष्य. माझ्या दृष्टीने हेच एक मोठे कुतुहल आहे.

आपण सारे चाकोरीमध्ये असलेला काम धंदा करतो तसेच तेही इतर नेत्यांसारखेच किबहुना (बहुगुणा नाही) जास्तच काम करतात -
१ मेंदू आणि वाणी मर्मभेदी राहाण्यासाठी नियमित वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करणे
२ स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संघटनांची कार्ये (स्वतःची वगळून) कोळून पिणे.
३ सत्ताधारी पक्षाचा आणि सरकारचा समाजाला होणारा त्रास ह्या बद्दल अनेक मेनू असलेला बुफ्फे बनवणे

आणि इतर …।

आशु जोग's picture

28 Oct 2013 - 3:12 pm | आशु जोग

नंतर म्हणाले राजकारण आणी खाजगी आयुष्य वेगळ असत .
पण तुझं राजकारण आमच्या खाजगी आयुष्याला मारक ठरतय त्याचे काय !

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Oct 2013 - 4:10 pm | llपुण्याचे पेशवेll

राज सध्यातरी कुठल्याही वादात २न्ही कडून पैसे काढायचे काम करतो. ते पाकीस्तानी कलाकरांचे कार्यक्रम भारतात प्रक्षेपित झालेच ना शेवटी. :)

प्यारे१'s picture

28 Oct 2013 - 4:57 pm | प्यारे१

आशा ताईंच्या विनंतीवरुन स्पेशल एपिसोड होता तो!

बहुतेक चकटफु असणार. नेहमी असंच असतंय.
जोरात सुरुवात करायची नि नंतर आत्ता झालं ते झालं...' ह्यापुढं हे खपवून घेणार नाही'.

आर्र तिज्यायला. (त्यांचीच स्टाईल) काय खेळणं वाटलं का काय?

बाकी ज्या ज्या वेळी धाग्याचं नाव वाचतोय

'राज ठाकरे यांचे काय चाललेय' तेव्हा तेव्हा

१. कुणास ठाऊक?
२. काही बोलले नाहीत मला...
३. बरें चाललें असावें!
४. तुम्हाला काय करायचंय?

अशी उत्तरे कशी आलेली नाहीत अजून ह्यावरुन अचंबित झालोय.
कदाचित खळ्ळ खट्याक ची भीती असावी! :)

आशु जोग's picture

28 Oct 2013 - 6:32 pm | आशु जोग

मग सोत्रि
कधी सुरु करताय नवा धंदा स्वारी ते नवनिर्माण

बा द वे
शुभेच्छा ... अब्जधीश भव !

मंदार कात्रे's picture

28 Oct 2013 - 7:20 pm | मंदार कात्रे

मला पण अब्जाधीश व्हावस वाटतय....

उत्तम टोपीबदलू राज-कारणी कसे बनावे हे शिकवणारे क्लासेस चालु करा रे कुणीतरी !

;)

बाकी सेना आणि मनसे यांचा विषय निघाली की मला नेहमी ज्ञानेश्वर मेश्राम यानी गायलेले विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती हे गाणं आठवतच आठवत ! प्रत्येक ओळ नी ओळ मनाला भिडणारी !

जाता जाता :- शेवटी या मंडळीसाठी काय सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती !

( नमो मंत्र जपणारा)

आशु जोग's picture

29 Oct 2013 - 2:13 pm | आशु जोग

सुपरलाइक ...

चिरोटा's picture

29 Oct 2013 - 3:19 pm | चिरोटा

पण तुझं राजकारण आमच्या खाजगी आयुष्याला मारक ठरतय त्याचे काय !

जोग साहेब, फक्त राज ठाकरेच नाही तर सर्वपक्षिय राजकारण्यांमधे हे दिसते. 'राजमाता' विजयाराजे शिंदे मुलाच्या(माधवराव- काँग्रेस) संघात भाजपाच्या प्रचारासाठी कधी जात नसत.सध्याच्या काळातही हा अलिखित नियम पाळण्यात येतो. भाजपा मावशी- वसुंधराराजेंच्या विरोधात काँग्रेस भाचा ज्योतिर्दित्य बोलायचे टाळतो.अगदी 'त्यागी'
नेहरू-गांधी घराण्यामधेही हा नियम पाळला जातो.
भारतिय राजकारणात व्यक्तिगत संबंधांपुढे पक्ष,मुल्ये,विचार दुय्यम मानले जातात.

आशु जोग's picture

9 Nov 2013 - 12:15 pm | आशु जोग

हार मे भी एक जीत होती है ...

आशु जोग's picture

20 Nov 2013 - 11:02 pm | आशु जोग

आणखी एक कूणकूण...

जयदेव ठाकरे यांचेही काही नवे सुरु आहे. त्यांच्यामागे 'पवार'फुल्ल माणसे आहेत. चित्र लवकरच स्पष्ट होइलच.

विद्युत् बालक's picture

20 Nov 2013 - 11:08 pm | विद्युत् बालक

राज ठाकरे जेव्हा "तसली" टोपी घालून हिंडला होतो तेवाच मनातून पार उतरला होता
तसेही परप्रांतीयांना शिवीगाळ करण्यावाचून येते काय ह्याला?

आणि खरी गोम तिथच आहे ?

सुहासदवन's picture

21 Nov 2013 - 11:05 am | सुहासदवन

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/raj-t...

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

आजवर उत्तर भारतीयांना 'खळ्ळखट्याक्'चा धाक दाखवतानाच, गुजराती बांधवांना कुरवाळणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीवरून गुजरातींना टार्गेट करीत बुधवारी एक नवा राजकीय भूकंप घडविला.

मारवाडी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार रामकृष्णदादा बेलूरकर यांना राज ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी नागपुरात प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजय दर्डा होते तर, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी प्रमुख पाहुणे होते.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापत असताना, राज ठाकरे यांनी दोन दशकांपूर्वी किल्लारी येथील आणि १२ वर्षांपूर्वी भुज येथील भूकंपांचे उत्खनन करीत गुजराती बांधवांसह सगळ्यांनाच धक्के दिले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा अलीकडेच मुंबईतील गुजराती सराफा व्यावसायिकांनी सत्कार करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकासाठी निधी दिला. त्या पार्श्वभूमीवर या धक्क्यांची तीव्रता राजकीय रिस्टर स्केलवर अधिकच जाणवेल.

'माझ्या हस्ते सत्कार करू नका, असे मी वारंवार म्हणालो, पण ऐकेल ते नागपूर कसले! त्यांनी तो माझ्याच हस्ते केला. मला लोकं म्हणतात, मी मारतो. अरे तुम्ही आमच्यासारखे, आमच्यातले बनून रहा, मग सगळं ठीक होईल. तिकडे गुजरातेत बघा. तेथील मराठी लोकं मराठी बोलतात, पण त्यांचा लेहजा गुजराती असतो. आमचीही तीच अपेक्षा आहे, असे राज यांनी स्पष्ट केले.

तेथील मराठी लोकं मराठी बोलतात, पण त्यांचा लेहजा गुजराती असतो. आमचीही तीच अपेक्षा आहे.

याचा अर्थ "येथील गुजराती लोकांनी गुजराती बोलावं पण त्यांचा लेहजा मराठी असावा" असा काढावा की "येथील गुजराती लोकांनी मराठी बोलावं पण त्यांचा लेहजा गुजराती असावा"

खटासि खट's picture

22 Nov 2013 - 4:41 pm | खटासि खट

राज ठाकरे यांचे काय चाललेय?

हो ना, फोन नाही आणि काही नाही बरेच दिवसांत. काळजी वाटते.

आशु जोग's picture

22 Oct 2016 - 1:40 pm | आशु जोग

ऐ दिल है मुश्किल

आशु जोग's picture

22 Oct 2016 - 11:18 pm | आशु जोग

विचारावसं वाटतं...
"आता गप्प बसायला काय घ्याल(टोलबद्दल) ? तसं आता निवडणूकीत हरायला काय घ्याल"

त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका काय ? आणि कुणाचा फायदा करून देणार ? याबाबत उत्सुकता आहे.

आजही हेच वाटतंय

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Oct 2016 - 9:13 am | कैलासवासी सोन्याबापु

कोण राज ठाकरे ???

साहना's picture

23 Oct 2016 - 9:40 am | साहना

गुंडागिरी !

आशु जोग's picture

23 Oct 2016 - 10:44 am | आशु जोग

दिले की पाहू

अजून काहीच नाही

कंजूस's picture

23 Oct 2016 - 11:18 am | कंजूस

हा संदर्भ वेगळा आहे.
राजसाहेबांनी अगोदर पाक कलाकारांना विरोध केला ,आता म्हणतात प्रत्येकी पाच कोटी द्या अन घ्या?
नक्की काय धोरण ?

खटपट्या's picture

23 Oct 2016 - 12:14 pm | खटपट्या

ठाकरे आणि महाराजांची तुलना करुन तुम्ही आमच्या भावना दुखावताय.....

सचु कुळकर्णी's picture

23 Oct 2016 - 1:10 pm | सचु कुळकर्णी

अय हितेस चड्डीत रहायच क्काय !
कुठल्याही चर्चा कुठेही नेउ नकोस.
तुझ्याकडे एका वेळेस अनेक आय डी असतात ईथे आमचा एकमेव आय डी ब्लॉक झाला की द्राविडीप्राणायम करावा लागतो. प्लीज ईथे महाराजांचा उल्लेख अनावश्यक होता.

मदनबाण's picture

23 Oct 2016 - 11:12 pm | मदनबाण

chitraa - Sun, 23/10/2016 - 09:52

इतका थर्ड ग्रेड प्रतिसाद वाचनात आला नव्हता, अश्या आयडीजचा बंदवस्त आता तरी व्हावा ही अपेक्षा !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अय्यो पापम... :- Yevadu

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2016 - 11:34 pm | श्रीगुरुजी

अश्या आयडीच्या थर्ड ग्रेड प्रतिसादांंना टाळ्या पिटणारे सदस्य सुद्धा इथे आहेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 12:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

हा, आता टक्याच्या धाग्याची लिंकही टाकून द्या कसे गुर्जी! मुद्दे सुचले नाहीत की ऍड होमिनेम करायचे हे बरे नव्हे , सायबर सेल ने डिजिटल भाटांस नीट ट्रेनिंग दिलेले दिसत नाही देवा, =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 12:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाकी कुठल्या सदस्याने मोगाच्या थर्ड ग्रेड प्रतिसादाला टाळ्या पिटल्या आहेत हे दाखवून द्या हे उघड चॅलेंज देतो मी तुम्हाला, बीजेपी विरोधी ते सगळे थर्ड ग्रेड असे तुम्हाला वाटत असल्यास तो तुमचा प्रश्न आहे, तुमची रोजी रोटी बीजेपी चालवत असेल आमची नाही. तेव्हा तोंड सांभाळून बोलायचं हि विनंती.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 12:50 pm | श्रीगुरुजी

मोगाच्या थर्ड ग्रेड प्रतिसादाला टाळ्या पिटून ट्रोलिंगला प्रोत्साहन दिले गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. ती पाहण्यासाठी स्वत:च शोध घ्यावा ही नम्र विनंती. जर तुम्ही तसे करत नसाल तर 'खाई त्याला खवखवे' या वाक्प्रचाराला अनुसरून तुम्हाला माझा प्रतिसाद अंगावर ओढवून घेण्याची गरज नाही कारण माझ्या प्रतिसादात मी कोणाचेच नाव घेतलेले नाही.

आणि अजून एक. माझी रोजी रोटी मीच चालवितो. माझी रोजी रोटी चालविण्यासाठी मला कोणत्याही पक्षाची गरज नव्हती, नाही आणि नसेल. भाजप किंवा इतर कोणताही पक्ष किंवा संघटना माझी रोजी रोटी चालवित नाही. हे यापूर्वीच सांगून झाले आहे. ते समजलं नसेल तर मी फक्त कीव करू शकतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 12:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

धन्यवाद

आशु जोग's picture

23 Oct 2016 - 12:11 pm | आशु जोग

मनसेला नेमकं धोरण नाही

राज सोडून दुसरा प्रवक्ता नाही

म्हणून मनसे पुढे जात नाही

पैसा's picture

23 Oct 2016 - 12:34 pm | पैसा

पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्‍या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची?

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Oct 2016 - 1:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर फंडचे सुद्धा वार्षिक बजेट सहज २५ कोटी असेल हो, ही काय भिकारी पंचायत लावली आहे लेकाच्यांनी आर्मीच्या नावं देव जाणे ह्या पुंड लोकांनी

अभिजीत अवलिया's picture

23 Oct 2016 - 10:04 pm | अभिजीत अवलिया

एक नंबर बंडल व्यक्ती आहे ती. नुसता मूर्खपणा.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 12:58 pm | श्रीगुरुजी

अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर फंडचे सुद्धा वार्षिक बजेट सहज २५ कोटी असेल हो, ही काय भिकारी पंचायत लावली आहे लेकाच्यांनी आर्मीच्या नावं देव जाणे ह्या पुंड लोकांनी

काहीतरी चुकीची माहिती असावी. या बातमीप्रमाणे हा निधी फक्त २ महिन्यांपूर्वी ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू झाला व मागील २ महिन्यात त्यात आजतगायत फक्त १ कोटी ४० लाख रूपये आलेले आहेत. जर करण जोहर त्यात ५ कोटी रूपये टाकणार असेल तर सध्याच्या शिलकीच्या तुलनेत ही खूपच मोठी रक्कम होते. तसेच निधी फक्त २ महिन्यांपूर्वीच सुरू झाल्याने निधीचे वार्षिक बजेट २५ कोटी इतके असेल असे वाटत नाही कारण निधीला अजून १/४ वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 3:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

लिंक उघडत नाहीये, परत द्यावीत ही नम्र विनंती, वाचून प्रतिसाद देतो लिंक.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 4:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला दिसतो आहे, तुम्ही म्हणता आहात त्या फंड बद्दल मी बोलत नाहीये, तर मी आर्मी वाईव्ज वेल्फेयर असोसिएशन बद्दल बोलतोय, १९६६ मध्ये स्थापन झालेल्या ह्या संघटनेची अध्यक्ष जो तत्कालीन चीफ ऑफ आर्मी स्टाफ असतो त्याची पत्नी असते, ह्यांचे कार्य फक्त पैसे गोळा करणे नाही तर अगदी युद्ध विधवांना (त्यांना वीरनारी म्हणले जाते) व्यवसाय शिक्षण देणे ते इन सर्व्हिस आर्मी पर्सोनेलला मानवी हक्क उल्लंघन कायद्याच्या केसेस मध्ये कायदेशीर मदत वगैरे पुरवणे इतके उत्तुंग आहे, माझा प्रतिसाद परत वाचा त्यात मी आर्मी वाईव्जबद्दल बोलतोय, नवीन फंड नुसार नाही, तसेही ह्या नव्या फंडाचे प्रयोजन कळलेले नाही कारण,
१. वर मी आर्मी वाईव्जचे योगदान मांडले आहेच
२. नॅशनल ट्राय सर्व्हिसेस फ्लॅग डे किंवा झंडा दिवसला गोळा होणारे सगळे पैसे आर्मी वेल्फेयर मध्ये लावले जातात
३. प्रधानमंत्री कोष सुद्धा असतो बहुदा एक रक्षा विभागाला वाहिलेला (ह्या बद्दल ऐकीव माहिती आहे, तरी हा ऑप्शन बाद ठरवला तरी हरकत नाही)

माझ्या प्रतिसादाचे सार,

करण जौहरच्या ५ कोटी न काय होणार आहे ? इथे आर्मीवाल्यांच्या बायका अन दुर्दैवी विधवाच कोटी कोटी रुपयात वर्गणी काढून शांतपणे करायचे ते काम करत असतात. त्यातही ते मांडवली खंडणीचे पैसे आर्मीवाले घेतील का नाही ही शंकाच आहे. असो.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 8:49 pm | श्रीगुरुजी

आपण दोघे दोन वेगवेगळ्या निधीबद्दल बोलत आहोत. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार करण ज्या निधीला ५ कोटी रूपये देणार आहे तो निधी जेमतेम २ महिन्यांपूर्वी सुरू झालेला आहे. तुम्ही ज्या निधीबद्दल सांगत आहात तो पूर्ण वेगळा आहे.

श्रीगुरुजी's picture

24 Oct 2016 - 2:40 pm | श्रीगुरुजी

पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्‍या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची?

मी एका दुसर्‍या धाग्यावर या विषयावर सविस्तर प्रतिसाद दिलेला आहे. सरकारला तोडगा काढावाच लागला. फडणविसांकडे दुसरा पर्यायच नव्हता. करण जोहरने पाकड्यांना चित्रपटात काम देणे कितीही संतापजनक असले तरी त्याची भूमिका कायदेशीर होती. कायदेशीर मार्गाने भारतात आलेल्या पाकड्यांना चित्रपटात काम देणे हे कायदेशीर आहे. त्यामुळे शेवटी सरकारला त्याच्या चित्रपटाला संरक्षण द्यावेच लागले असते. परंतु मनसेने हा मुद्धा प्रतिष्ठेचा केल्याने जर चित्रपट दाखविला गेला असता तर त्यातून दगडफेक, तोडफोड, दंगे, लाठीमार इ. होऊन ऐन दिवाळीमध्ये समाजात अशांतता निर्माण झाली असती. मनसेच्या काही कार्यकर्त्यांना आधीच अटक झाली होती व सरकारने चित्रपटाला संरक्षण देणार हे आधीच सांगितले होते. चित्रपट सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक करून डांबले असते तरीसुद्धा बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी अशांतता निर्माण केलीच असती. अशा परिस्थितीत मनसेला आंदोलन रद्द करण्यास लावणे व त्याचबरोबर लोकभावनेचा विचार करून करण जोहरला 'भविष्यात पाकड्यांना चित्रपटात घेणार नाही' असे जाहीररित्या सांगायला लावणे हाच सर्तोत्तम तोडगा होता. असे करण्याने शांतताभंगही टळला व लोकभावनेचाही आदर झाला. जर फक्त कायदेशीर बाजू बघून चित्रपट पोलिस संरक्षणात प्रदर्शित केला असता तर लोकभावनेचा अनादर झाला असता. जर लोकभावनेचा आदर करून चित्रपट प्रदर्शित होऊन दिला नसता तर मनसेच्या गुंडगिरीपुढे झुकल्यामुळे कायद्याचे पालन झाले नसते. अशा परिस्थितीत योग्य तो तोडगा शांततेच्या मार्गाने काढला गेला आहे.

मनसेच्या आंदोलनाला घाबरून चित्रपट प्रदर्शित होऊन न देण्याची भूमिका घेणे राज्य सरकारला शक्य नव्हते. त्याचवेळी चित्रपटाला पूर्ण संरक्षण देऊनसुद्धा तोडफोड झाली असती तर संरक्षण देण्यात कुचराई केल्याचा आरोप सरकारवर झाला असता व त्यामुळे लोकभावनेचाही अनादर झाला असता. त्यामुळे हे दोन्ही पर्याय राज्य सरकारसाठी उपलब्ध नव्हते.

बाकी ५ कोटी रूपये देणगी किंवा चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजलीचा फलक दाखविणे या तोडग्यातूनच निघालेल्या दुय्यम गोष्टी आहेत. हिंसक आंदोलन रद्द होऊन शांतताभंग टळला आणि त्यामुळे कायदापालन झाले व निदान भविष्यात तरी पाकड्यांना काम मिळणे बंद होईल या घोषणेमुळे लोकभावनेचाही विजय झाला हेच दोन महत्त्वाचे निर्णय या यशस्वी तोडग्यातून निघाले.

मराठी कथालेखक's picture

24 Oct 2016 - 4:34 pm | मराठी कथालेखक

दाऊदच्या पैशांनी सिनेमे

हा सिनेमा दाऊदच्या पैशांनी निघालाय का ? तुम्हाला कसं माहित ?

पैसा's picture

24 Oct 2016 - 5:15 pm | पैसा

सिनेमा दाऊदच्या पैशाने काढलाय असे मी म्हटलंय का? सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे. तिला पुरावे देता येणार नाहीत तसेच खोटीही म्हणता येणार नाही. उद्या कोणीही दाऊदच्या पैशाने सिनेमा काढील आणि पाच कोटी सैनिक फंडाला भीक फेकेल. ते चालेल का? म्हणजे लोक गरीबाना लुबाडतात. त्यांच्या अंगावर गाड्या घालून मारतात आणि मग सिद्धीविनायकाला देणगी देऊन सगळी पापे धुवून काढतात. अजून एक दानपेटी असेच सैनिक फंडाला समजले का काय हे खंडणीखोर?

मराठी कथालेखक's picture

24 Oct 2016 - 7:20 pm | मराठी कथालेखक

सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे.

९० च्या दशकात हा प्रकार जास्त होता. आता हे फारसे होत नाही. आता कॉर्पोरेट कंपन्या सिनेमात पैसा ओततात.
आता बॉलीवूडमधले बहुतेक मोठे व्यहवार पांढरे असतात, मोठे स्टार्स चेकने पैसे घेतात, रग्गड टॅक्स भरतात.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Oct 2016 - 11:28 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि राजकारणाला लोक कंटाळले आहेत हेच मनसेच्या दारुण पराभवातून लक्षात येतेय.मोदींच्या प्रतिमेतून भाजप बाहेर पडला नाही तर भाजपचाही मनसे व्हायला वेळ लागणार नाही.

अभ्या..'s picture

23 Oct 2016 - 11:38 pm | अभ्या..

कम्युनिश्टांचे वेगळेच पक्षांतर्गत धोरण सोडले तर भारतातील असा कोणताही एक पक्ष सांगा जो व्यक्तीकेंद्रीत नाहीये. सगळेच एकसारख्या माळा आहेत आणि मधल्या पेंडंटवर त्यांची व्हॅल्यु आहे.
बादवे गेल्या इलेक्शनाला मनसेचे बरेच काम केले तेंव्हाच त्यांचा पोकळपणा लक्षात आलेला. जास्त चर्चा करण्यातही अर्थ नाही.

संदीप डांगे's picture

23 Oct 2016 - 11:42 pm | संदीप डांगे

तू पण...? मी पहिल्या इलेक्शनला.

दादा काम म्हणजे नॉट अ‍ॅज अ कार्यकर्ता.
मिडीया होते. प्रिंट, रेडिओ, सोशल आणि ३-४ इव्हेंट्स. पैसे घेऊन केले. :)

बोका-ए-आझम's picture

24 Oct 2016 - 7:31 am | बोका-ए-आझम

हे एक बरं केलंस भावा. राजकीय पक्षांकडून पैसे काढणं महाकठीण काम!

+++१११ अभ्यादादा, त्यावेळेचे अनुभव येऊ द्या.. अर्थात वेळ आणि ईच्छा असेल तर.

चौकटराजा's picture

24 Oct 2016 - 4:51 pm | चौकटराजा

मोदी हे जरी अगदी निष्पाप निरागस नसले तरी ते आतापर्यंतचे सर्वोत्तम नेते आहेत. ते पुष्कळसे व्यवहारी आहेत. कारण ते इतिहास, नाटक, सिनेमा यांच्यात रमणार्‍या महाराष्ट्रातून पुढे आलेले नाहीत. त्यांची तुलना राज उद्धव यांच्याशी नको. भाजपा हा मोदींच्या प्रतिमेत अडकण्यापेक्षा तो कटियार कंपनीच्या तावडीत सापडणार की कसे याची खरी समस्या आहे.

आशु जोग's picture

25 Oct 2016 - 12:15 am | आशु जोग

भाजपचाही मनसे व्हायला वेळ लागणार नाही
पटतंय

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Oct 2016 - 10:12 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मनसे म्हणजे ७०च्या दशकातली शिवसेना वाटतेय असे ह्याण्चे मत.
आधी भूमीपुत्र,मग गिरणी कामगार मग इण्दिरा गाण्धींना जोरदार विरोध मग अचानक घुमजाव करून आणीबाणीला पाठिंबा.स्वतः काहीतरी विधायक करण्यापेक्षा दुसरे पक्ष काय करता आहेत ह्याकडेच लक्ष जास्त..म्हणूनच मुंबई,ठाण्यातले खड्डे बुजवण्यापेक्षा कधी ब्रेझनेव्ह तर कधी जिमी कार्टरना 'मार्मिक' सल्ले-ईशारे शिवसेना द्यायची. मनसेचा राजकीय प्रवासही तसाच दिसतोय. दत्ताजी साळवी,प्रधान्,वामनराव महाडिक हे लोक असल्याने शिवसेना टिकली.सध्या अशा लोकांची समाजातच वानवा असल्याने मनसेचे भवितव्य कठीण दिसते.

आशु जोग's picture

24 Oct 2016 - 10:43 am | आशु जोग

अ गूड कमेंट

सामान्यनागरिक's picture

24 Oct 2016 - 11:29 am | सामान्यनागरिक

फक्त अवघड जागीच दुखणं बनायचं हाच त्यांचा उद्देश होता.
आपल्याला सत्ता मिळणार नाहीत, आणि कोणी जवळ उभे पण करणार नाही हे त्यांना माहीत होतं.
काहीही न करता , काही करण्याचे किंवा न करण्याचे पैसे घ्यायचे केवळ या साठी पक्ष स्थापन केला. नुकत्याच झालेल्या सिनेमाच्या प्रकरणाने हेच सिद्ध केले.

राज ठाकरे यांचे काय चाललेय?

उत्तरः तोडपाणी

मराठी कथालेखक's picture

24 Oct 2016 - 4:32 pm | मराठी कथालेखक

+१

सोत्रि's picture

24 Oct 2016 - 12:24 pm | सोत्रि

मनसे = ध्यस्ती सेटलमेंट

- (दिलसे) सोकाजी

गामा पैलवान's picture

24 Oct 2016 - 5:53 pm | गामा पैलवान

लोकहो,

राज ठाकऱ्यांनी तोडपाणी केले असा काही मिपाकरांचा सूर आहे. मला मात्र तसं वाटंत नाही. राज ठाकऱ्यांनी हे पैसे स्वत:साठी वा पक्षासाठी घेतले नाहीयेत. ही करण जोहरला केलेली शिक्षा आहे. त्या शिक्षेतून निर्माण होणारा पैसा हरामाचा असल्याची जनभावना आहे. म्हणून त्या पैशास कोणी हात लावायला तयार नाही, ही बाब वेगळी.

मी राज ठाकरे यांचा समर्थक व/वा चाहता नाही. पैशांचा यथोचित संबंध स्पष्ट व्हावा म्हणून माझं मत लिहितोय.

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 6:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

कुठल्या भारतीय कायद्यान्वये राज ठाकरेंनी करण जौहरला शिक्षा केली म्हणे?? ती करण्यासाठी कोणी परवानगी दिली ?? ते कुठल्या कायदेशीर अथवा घटनासिद्ध पदावर विराजमान आहेत म्हणे?

मराठी कथालेखक's picture

24 Oct 2016 - 7:15 pm | मराठी कथालेखक

+१
करण जोहरने पाकिस्तानी कलाकाराला सिनेमात घेतल हे पटत असो वा नसो, पण त्यात बेकायदा काहीच नव्हतं. राज ठाकरेला हव तर त्यानी केंद्र सरकारवर आपल्या (शून्य) खासदारांच्या मार्फत दबाव आणून असा काही कायदा करण्यास वा अधिसूचना घेण्यास भाग पाडावं.
तोडपाण्याबद्दल : त्याने स्वतःसाठी वा पक्षासाठी जे काही पैसे घेतले असतील त्याची तो जाहिरात करणार नाहीच. आता याबद्दल पुरावा नाहीये असं म्हणता येईल.. पण तरी पदरात पाडून घेतलेली प्रसिद्धी, 'आपणच काय ते देशप्रेमी आणि सैन्याची काळजी वाहणारे' अशी प्रतिमा छापणं हा ही तोडपाण्याचा प्रकार आहेच.

गामा पैलवान's picture

24 Oct 2016 - 7:15 pm | गामा पैलवान

सोन्याबापु,

बाजारात ग्राहकांचा कल न पाहता वस्तू विकायचा प्रयत्न केल्याबद्दल ही शिक्षा झाली आहे.

आ.न.,
-गा.पै.

ह्या प्रतिसादाने डोसक्यात अचाट प्रश्न उभारलेत पण विचारु पण वाटेनात. :(
गामाजी का बळंच्च्च लॉजिक फेकायलात? नसंल एखादा युक्तीवाद तर राहु द्या ना. द्या सोडून. आम्ही नाही राज ठाकरेला अशा शिक्षा देणार.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Oct 2016 - 8:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो ते अलंकारीक सोडा हो सगळे, कुठल्या अधिकाराने दिली म्हणे राज ठाकरेंनी शिक्षा? तो अधिकार कोणी दिलाय? ह्यावर काही बोला की

शिक्षा देण्याचा अधिकार राज ठा़करेंना कोणी दिला?