कर्सिव का टचपॅड ?
फिनलंडमधील पुढील शैक्षणिक वर्षापासून, कर्सिव हस्तलिपी (cursive handwriting) हा शैक्षणिक घटक, बाद होणार असून, त्याजागी शाळांना (किबोर्ड/टचपॅड वर ) टेक-टायपिंग चा पर्याय देण्यात येणार आहे. हा बदल अमेरिकेतील काही राज्यांनी त्यांच्या शैक्षणिक 'मध्यवर्ती मूल्यात'(core-values) मधे केलेल्या बदलामागोमाग फिनलंडमध्येसुद्धा येवू घातला आहे. शैक्षणिक मंडळाने सुचवलेला हा बदल, अधिकृतपणे २०१५ च्या शरदऋतूपासून कदाचित अमलात येईल असा अंदाज आहे. 'उत्कृष्ठ टायपिंग हे राष्ट्रीय उत्पादकता कौशल्यांचा ऐक महत्वाचा घटक आहे', असा, काही शैक्षणिक मंडळांच्या सदस्यांचा विश्वास आहे.