पोपटी
हवेत गारवा आला, थंडी पडू लागली की चाहूल लागते ती पोपटी पार्टीची. पावसाळा संपुष्टा आलेला असतो पण अजुनही ओलसर असलेल्या जमीनीमुळे व हवेतील थंड अशा अनुकुल वातावरणामुळे भाज्यांचे मळे हिरवेगार होऊन त्यावर वालाच्या व विविध शेंगा, वांगी, मिरच्या, नव अलकोल भाज्यांची भरभराट होऊ लागते. आमच्या उरणमध्ये जांभळ्या कडेच्या मेदळ नावाच्या वालासारख्या चविष्ट शेंगाही ह्या सिझन मध्ये पर्वणी आणतात. बाजारपेठेतही ह्या भाज्यांच्या राशी रांगोळीप्रमाणे रचलेल्या दिसतात. ह्या भाज्या आणि थंडी ह्यांचा मिलाप झाला की पोपटी पार्टीचे आयोजन जिथे तिथे होताना दिसते.