धुळवड
गणेशचतुर्थी प्रमाणेच कोकणातील आणखी एक मोठा आणि जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजे 'होळी'. थंडीचे दिवस संपत आल्यावर कोकणी माणसाला शिमग्याची ओढ लागते. 'होळी' या शहरी शब्दापेक्षा 'शिमगा' हा शब्दच कोकणच्या मातीला जुळून जातो. एकंदरीत कोकणापेक्षा तळकोकणातील शिमग्याची प्रथा थोडीशी वेगळी आहे. फाल्गुन पोर्णिमेपासून चालू होणारा हा सण तळकोकणामध्ये साधारणता ५, ७ किंवा ९ दिवस चालतो. पोर्णिमे दिवशी घरोघरी गोड जेवण बनवले जाते. पुरण पोळ्या किंवा शिरवाळे आणि गोड रस हे जेवणाचे पदार्थ असतात. म्हणूनच त्याला 'होळी रे होळी पुरणाची पोळी' असेही म्हटले जाते. शहरामध्ये रंगपंचमी असते तर कोकणातल्या लोकांची 'धुळवड' असते.