( दाराआडचा वास )
कुबट वास दाराआडुन पडतो आहे बाहेर
किती बाहेर?
यत्र तत्र सर्वत्र , नाकाच्या आर पार
नाकातले केस जळून जात आहेत , जळत आहेत
किती वेळ ?
पोटातले ढवळतंय, येतेय बाहेर, कोण आहे तिथे आत
कुणी तरी एक बसला आहे स्तब्ध....
करत असेल का तो ही त्या भयानक वासाचा विचार?
जळत असतील का त्याचेही नाकातले केस
दरवाज्याबाहेर , दरवाज्याच्या पलीकडे?
कुणी उभाही राहू शकत नाही , त्या वासाशिवाय ...
मग मी माझे नाक घट्ट दाबून , आलेली कळही दाबून ,
डोळे आणि डोळ्यात जीव आणि पाणी घेऊन
शांतपणे उभा राहतो....