हॉरर

Primary tabs

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
17 Aug 2019 - 11:23 pm

हॉरर
----------------------------------------------------------------------------------------------------------------
एक कर्णकर्कश्श किंकाळी पूर्ण थिएटरमध्ये घुमली !
लोक दचकले .
माझ्या शेजारचाही दचकला .एक प्रौढ गृहस्थ.
लोकांना त्या हिरॉईनची भयकुंठित अवस्था बघवत नव्हती . हिरॉईन दिसायला एकदमच कडक होती. नवीन. लोकांना अल्पावधीतच ती लय आवडायला लागली होती .
पडद्यावर हॉरर चित्रपट चालू होता . टुकार ! ती हिरॉइन सोडता.
हॉरर कमी आणि कॉमेडीच जास्त होता साला ! पार्श्वसंगीत मात्र लय भारी होतं. ते काढलं तर टॉम अँड जेरी बरं वाटलं असतं.
पण पिक्चर बंडल असला तरी ' हॉरर होता. मला जाम आवडतात असे हॉरर सिनेमे पहायला. मी सहसा चुकवत नाहीच .
पार्श्वसंगीताचा दणका मारा कानावर झाला की शेजारचा दचकायचा .बाकी तो हसत होता.
शेवटी तर तो झोपलाच .
सिनेमा संपला. लोक हळूहळू गेले. तरीही हा झोपलेलाच .मला वाटलं, गेला की काय - हार्ट अटॅकने ! पण सिनेमा बघून हार्ट अटॅक यायला तो तेवढा डेंजर तर पाहिजे ना.
सगळं थिएटर खाली झालं. डोअरकिपरने त्याला उठवलं. उठला एकदाचा. आम्ही बाहेर पडलो. तो चालायला लागला मी त्याच्या मागे. आवारात आता एक कुत्रंही नव्हतं .
तो रात्रीचा शो होता .साडेबाराला सुटलेला .बाहेर गार वारं सुटलेलं. अंधार.
तो चालत पुलाकडे निघाला .पूलही शांत. निर्मनुष्य .खाली नदीचं शांत वाहणारं पाणी.
मी त्याला आवाज दिला तसा तो थांबला .
' नमस्कार ', मी म्हणालो .
‘नमस्कार ‘,तोही म्हणाला .मी त्याच्या शेजारी बसलो होतो ते त्याने ओळखलं होतं.
‘कसा वाटलं सिनेमा ?’ मी विचारलं .
‘बंडल! लयच बंडल ! अहो , हॉरर बघायला मजा येते म्हणून बघतो मी .एक वेगळा प्रकार. हाणामाऱ्या आणि लव्हस्टोरी बघण्यापेक्षा . भुतं-बितं खरी थोडीच असतात!’...
असं म्हणल्यावर -
मी एकदम त्याच्या नजरेसमोर क्षणार्धात गायब झालो . खराच !
तो क्षणभर पाहतच राहिला. मग त्याने मागे -पुढे पाहिलं.
अख्खा पूल रिकामा होता .कोणीच दिसत नव्हतं.
तसा तो झीट येऊन जागेवरच खाली पडला .
‘साला! अशी भुतांची हेटाळणी मी सहन तरी कशी करणार? …
---------------------------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे
BIP499@HOTMAIL.COM

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

18 Aug 2019 - 12:07 am | जॉनविक्क

ज्योति अळवणी's picture

18 Aug 2019 - 9:11 pm | ज्योति अळवणी

Expected

जव्हेरगंज's picture

18 Aug 2019 - 9:27 pm | जव्हेरगंज

जबरी!
जमलीये!!

बिपीन सुरेश सांगळे's picture

18 Aug 2019 - 10:43 pm | बिपीन सुरेश सांगळे

ज्योतिजी
जॉनविक्कजी
सहमत आणि आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

18 Aug 2019 - 10:46 pm | बिपीन सुरेश सांगळे

जव्हेरगंज
आभार
या कथेवर मात्र उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत . मला स्वतःला ठरवणं थोडं अवघड वाटतेय .

शेवट अपेक्षेप्रमाणेच निघाला. बाकी फुलवलेय चांगली.

टर्मीनेटर's picture

19 Aug 2019 - 3:42 pm | टर्मीनेटर

कथा आवडली.