मिसळपाववरचं शिफारस करण्यायोग्य साहित्य

इरामयी's picture
इरामयी in जनातलं, मनातलं
31 Jul 2019 - 9:15 pm

गेले काही दिवस मिसळपाव धुंडाळत असताना असं लक्षात आलं की मिसळपाववर केवढं वैविध्यपूर्ण आणि सुंदर लेखन झालेलं आहे!

आज २०१९ मध्ये पूर्वीचं चांगलं लेखन हुडकून काढणं हे खूप कठीण आहे. या ट्रायल अँड एरर पद्धतीने शोधताना बरेच उत्तम लेख, काव्य, मालिका निसटून जाण्याचीच शक्यताच जास्त.

त्यामुळे हा नवा धागा. मिसळपाववर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लोकप्रिय लेखनाची एका ठिकाणी यादी करता येऊ शकेल का? मिसळपाववर असलेल्या जुन्या जाणत्या सदस्यांना एक प्रामाणिक आवाहन.

आपल्याला आवडलेल्या आपल्या आठवणीतल्या मिसळपाववर गाजलेल्या उत्तमोत्तम साहित्याचे (लेख, काव्य, चर्चा, कलाकृती, आदी सर्व) आपण आपल्या प्रतिसादांत दुवे द्यावेत ही विनंती.

आपल्याला आवडलेले पूर्वी प्रसिद्ध झालेले साहित्य हे केवळ मिसळपाववरचेच असावे आणि ते आपल्या दृष्टीने तरी शिफारस करण्याजोगे असावे ही विनंती आहे.

यामुळे मिसळपाववर नवीन सदस्यांसाठी एक अभिजात आणि लोकप्रिय साहित्याचा एक उपयुक्त इन्डेक्स उपलब्ध होईल.

धन्यवाद!

हे ठिकाणप्रकटनसद्भावनाआस्वादशिफारस

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

31 Jul 2019 - 9:22 pm | यशोधरा

मिपा पुस्तकं हा विभाग वाचा, मिपा विशेषांक हा विभाग वाचा. इथून सुरुवात करा. :)

होय. अण्वस्त्रांबाबतची फसवणूक आत्ता वाचत आहे. धन्यवाद!

स्थळावर जे जे सदस्य मान्यवर म्हणून गणले जातात त्यांच्या वाचनखुणा उचकायच्या ते नियमीत ज्यांच्या खरडींना उत्तरे देतात त्यांच्या वाचनखुणा उचकायच्या व त्यांनी लिहलेले लेखहि बघायचे (रच्याकने धिस इज हॉ गुगल रँकिंग वर्क्स ऑटोमेटिकली)

सस्नेह's picture

31 Jul 2019 - 9:50 pm | सस्नेह

http://www.misalpav.com/node/23847
हे पहा. इथे बरेच काही सापडेल.

विजुभाऊ's picture

1 Aug 2019 - 6:00 am | विजुभाऊ

सुरवात मिपावरच्या सर्वात हिट्ट धाग्याने करुया

http://www.misalpav.com/node/6332

इरामयी's picture

1 Aug 2019 - 8:25 am | इरामयी

हे नक्की काय आहे ?! !!

अनपेक्षित !

:)

प्रचेतस's picture

1 Aug 2019 - 8:16 am | प्रचेतस

गवि आणि प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ह्यांचे सर्वच साहित्य वाचनीय आहे. गणपाशेठच्या पाककृती तर खासच.

इरामयी's picture

1 Aug 2019 - 8:24 am | इरामयी

धन्यवाद!

गवि आणि प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ह्यांचे सर्वच साहित्य वाचनीय आहे. गणपाशेठच्या पाककृती तर खासच.

यात काही काळेबेरे नसावे ना सर?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2019 - 11:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझं नाव वगळून फक्त तुमचंच नाव लिहिलं असतं तर समजू शकलो असतो. पण, माझ्या नाव लिहिण्याबाबत शुद्ध खोडसाळपणा दिसतो.
गविसेठ, उत्तम लिहितातच त्यात काही वाद नाही.

प्रचेतसचं उत्तम लेखन.

वल्ली उर्फ प्रचेतस उत्तम लेखन करायचे. चहा पोह्यांचा व्यग्रतेमुळे ते व्यस्त आहेत असं कळतं.

-दिलीप बिरुटे

इरामयी's picture

1 Aug 2019 - 12:39 pm | इरामयी

धन्यवाद!

गणपाशेठ, दिपककुवेत यांनी झारा केव्हाच टांगलाय.

महासंग्राम's picture

1 Aug 2019 - 10:14 am | महासंग्राम

सोत्रिंच्या कॉकटेल रेसिपी भारीयेत नुसतं वाचूनच नशा चढते

माझे सादर धागे सुपर हिट होते
बाकी सदस्यांनी उडवूं टाकले
खेकडा मनोवृत्ती

इरामयी's picture

1 Aug 2019 - 12:39 pm | इरामयी

धन्यवाद!

http://www.misalpav.com/node/२३८४७

इथे भरपूर धाग्यांच्या लिंक आहेत, पण सांभाळून उघडा काही जखमेवरच्या खपल्या उडू शकतात

इरामयी's picture

1 Aug 2019 - 12:38 pm | इरामयी

धन्यवाद मंदारराव!

इरामयी's picture

1 Aug 2019 - 12:42 pm | इरामयी

ह्म्म!
http://www.misalpav.com/node/२३८४७
पेज नॉट फाऊंड!

ओके. आकडा रोमन लिपीत लिहिला की उघडतं.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Aug 2019 - 1:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मी नेहमी पाहिलय, बर्‍याच वेळा जेव्हा कोणी नविन मिपाकर चांगल्या धाग्यांविषयी विचारतात, तेव्हा फारच क्वचित कवितांचा उल्लेख होता. (मोकलाया सोडून, तो ही दंगा घालायच्या उद्देशाने, त्याला आक्षेप नाहीच्चे :) ).
पण मिपा वर क्रांती तै, प्राजु तै, गणेशा, शरदिनी, रामदास काका, आणि ज्ञानोबांचे पैजार यांची विडंबने, मेवे यांच्या फार सुंदर कविता आहेत मिपावर.
त्याही वाचाव्या अशी विनंती मी करतो.

खुद्द तुझ्या कवितांचा मी पंखा आहेच मिका. बेष्ट असतात. कधीकधी फार काळ त्रास देणारीही एखादी लिहितोस. कुठे फेडशील ही पापं? ;-)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Aug 2019 - 1:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कुठे फेडशील ही पापं?

हे लिहून तुम्ही केलीली पाप जिथे तुम्ही जाऊन फेडणार आहात तिथेच ;)

चला, मी, मिकाशेठ, प्रचु, प्राडॉ आणि गणपा यांनी एकमेकां साह्य करुन परस्परांच्या रिक्षा उत्तम फिरवल्या. प्लॅन यशस्वी.
सर्वांचे आभार. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2019 - 1:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) बेक्कार फुटलो. आणि मनातल्या मनात सारखा हस्तर सॉरी हसतोय.

कसं सुचतं सर तुम्हाला. फ्रेंड रिक्वेष्ट पाठवू का ?;)

-दिलीप बिरुटे
(गविसरांच्या लेखनाचा चाहता)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Aug 2019 - 2:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

लैच बक्कार.. :ड :ड

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Aug 2019 - 1:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

क्रांती तै च्या कविता: http://www.misalpav.com/user/3804/authored
आणी हो, आमचा चाणाक्य राहिलाच, इथे त्याच लिखाणं

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Aug 2019 - 1:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

प्राजु तै च्या कविता: http://www.misalpav.com/user/121/authored

जगप्रवासी's picture

1 Aug 2019 - 4:06 pm | जगप्रवासी

कंजूस काकांनी बऱ्याच भटकंती लेखांची एकत्र यादी बनवली आहे जी कोणालाही उपयोगी पडू शकते

दुवा - https://misalpav.com/node/37993

एक जुने मिपाकर आहेत चाफा, माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. त्यांच्या रहस्यकथा/गूढकथा छान आहेत पण त्यांच्या लेखांचे दुवे सापडत नाहीयेत, सापडले की देतो.

इरामयी's picture

3 Aug 2019 - 5:52 am | इरामयी

It's a reservoir!

धन्यवाद! सर्वांना धन्यवाद. ही शिदोरी खूप दिवस पुरेल.

किल्लेदारांचे फोटू.. https://www.misalpav.com/user/10168/authored

अश्फाक's picture

1 Aug 2019 - 8:03 pm | अश्फाक

रामदास
यांचे सर्व लिखान

अभ्या..'s picture

1 Aug 2019 - 8:10 pm | अभ्या..

मिपाचे नंबर 44961 लेखक यांचेही लिखाण वाचा.
;)

हस्तर's picture

2 Aug 2019 - 1:29 pm | हस्तर

परा
मोजी
सगळे विसरले

सर्वांना धन्यवाद. ही शिदोरी खूप दिवस पुरेल.

मृत्युन्जय's picture

3 Aug 2019 - 3:29 pm | मृत्युन्जय

फारएन्ड यांची सर्व चित्रपट परीक्षणे न चुकता वाचा. फार धम्माल करमणूक आहे ती. शिवाय पराने लिहिलेले सुपरहिट चित्रप्ट देश्द्रोही चे परिक्षण देखील नक्की वाचा.

रामदास काकांचे शिंपीणीचे घरटे, काटेकोरांटीची फुले हे तर आविस्मरणीय, अशक्य सुंदर,

काही काळापुर्वी असाच एक धागा आला होता. त्यात बरीच माहिती मिळेल. धागा इथे वाचता येइलः
https://www.misalpav.com/node/19057