सय
दसरा आणि दिवाळी
दोन सणांच्या मागोमाग
बहुदा केव्हातरी ती गेली
नक्की कधी ते माहीत नाही
पण लक्ष्मीपूजनाला दुपारी
हटकून तिची सय येते....
सूर्य अस्ताला जाईपावेतो
सबंध घरभर दाटून राहते
स्वतःपेक्षा अनेकपट वजन
वाहून नेणाऱ्या मुंगीसारखं
स्वतःला खेचून बाहेर आणताना
पापण्यांमध्ये आपसूक ओल येते
नकळतपणे पाझरणारे डोळे
संध्याकाळी रोषणाईच्या तेजाने
"दिपले" म्हणून इतरांपासून
लपवण मग तसं सोपंच जातं...