चप्पल . .

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
12 Aug 2024 - 11:07 pm

चप्पलच्या दुकानातंही आत
चपला काढून शिरावं लागतं .
धर्म नावाचं मूल्य मनात,
असं खो Sssलपर्यंत जिरावं लागतं

नुसतच," हे असं कसं !? "
असं म्हणून भागत नाही .
एकट्यानीच जगायचं . . ?,
तर मग
यापेक्षा काहीच लागत नाही .

पण टोळीत जगणार ना तुम्ही ?
मग द्यायला हवी हमी .
पत्ते आवडत नसले खेळायला,
तरी जमवावी लागेल रम्मी !

जिंदगीचा डाव शिकायला
मनाविरुद्ध वागावं लागतं .
चप्पलच्या दुकानातंही आत
चपला काढून शिरावं लागतं .

अव्यक्तकविता माझीशांतरससंस्कृतीसमाजजीवनमान

साक्षीला दिवस आहे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
12 Aug 2024 - 9:05 pm

साक्षीला दिवस आहे

दिवस आहे साक्षिला की मी न लटिकें बोलतो
एक उन्नत काजवा बघ भानुला भेवाडतो

दावितो लोकांत मी आहेस की सत्शील तू
त्याचसाठी झाकलेली मूठ पुन्हा झाकतो

आपला सन्मान असतो आपणच राखायचा
तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो

तारतम्य लागले जर हेलकावे खायला
भोवतीच्या फडतुसांना दूरदेशी हाकतो

योग्यतेला योग्यतेने पारखावी योग्यता
अभय येथे पारखी तर लाळघोटू शोधतो

- गंगाधर मुटे 'अभय'
======
बारा/आठ/चोवीस

अभय-काव्यअभय-गझलअभय-लेखनकवितागझल

चंदू चँपियन- जिद्द, संघर्ष, प्रतिकूलता आणि यशाचा प्रवास

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
12 Aug 2024 - 1:55 pm

चंदू चँपियन- जिद्द, संघर्ष, प्रतिकूलता आणि यशाचा प्रवास

भारताच्या पहिल्या पॅरालिंपिक्समधील सुवर्णपदक विजेत्याची कहाणी

✪ ९ गोळ्या लागूनही आणि अर्ध शरीर लुळं पडूनही केलेला जिद्दीचा प्रवास
✪ १९५२ मध्ये खाशाबा जाधवांकडून मिळालेल्या प्रेरणेची १९७२ मध्ये सुवर्ण झळाळी
✪ सांगली जिल्ह्यातल्या मुरलीकांत पेटकरांची अविश्वसनीय झेप
✪ “मुझे उस हर एक के लिए लड़ना है जो चँपियन बनना चाहता है!”
✪ "पैर तो मछली को भी नही होते हैं!”
✪ अतिशय उत्तम पटकथा, मांडणी व चित्रण
✪ इतका मोठा पराक्रम परंतु लोक विसरून गेले

व्यक्तिचित्रणचित्रपटसमीक्षाबातमी

कायगाव टोका -प्रवरासंगम

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
12 Aug 2024 - 12:19 pm

A
भूयस्तु शरमुद‍्धृत्य कुपितस्तत्र राघवः।
सूर्यरश्मिप्रतीकाशं ज्वलन्तमरिमर्दनम्॥ १३॥

संधाय सुदृढे चापे विकृष्य बलवद‍्बली।
तमेव मृगमुद्दिश्य श्वसन्तमिव पन्नगम्॥ १४॥

मुमोच ज्वलितं दीप्तमस्त्रं ब्रह्मविनिर्मितम्।
शरीरं मृगरूपस्य विनिर्भिद्य शरोत्तमः॥ १५॥

प्रवासआस्वाद

BIV-१

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
11 Aug 2024 - 7:24 pm

गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वाहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी.
एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक.
“हलो, अनंत, मी परब. आठवतंय?”
लोक धावपळ करत होते. त्यांची दबलेल्या आवाजातली कुजबुज.
मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या पाच मिनिटात दरदरून घाम सुटला. एका स्त्रीचा करारी आवाज ऐकू येत होता,

कथा

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ -- भालाफेक

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
10 Aug 2024 - 11:45 pm

देशासाठी पहिलंच सुवर्णपदक व मैदानी खेळातील पहिलं पदक, दक्षिण आशियातून मैदानी खेळातील आतापर्यंतचं केवळ दुसरं podium finish आणि ९२.९७ मीटरचं नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड करून, अर्शद नदीमने पाकिस्तानसाठी काल इतिहास रचला. काहीशी अपरंपरागत धाव असूनही, अर्शद नदीमने बाहूबळाच्या जोरावर, अगदी दुसऱ्याच प्रयत्नात, कोणालाच अपेक्षित नसेल अशी, ऐतिहासीक कामगिरी केली. एवढंच नव्हे, तर अगदी शेवटच्या, सहाव्या प्रयत्नातही, अशक्य भासणारा ९० मीटरचा टप्पा परत एकदा सहज पार करून, एकाच स्पर्धेत दोन प्रयत्नात अशी कामगिरी करणारा, आतापर्यंतचा तो एकमेव खेळाडू ठरला.

क्रीडालेख