श्रोडिंगरची मांजर, एनटॅन्गल्मेंट आणि भारतीय मतपेटी

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
29 May 2024 - 3:17 am

क्वांटम फिजिक्समध्ये श्रोडिंगरची मांजर हा एक अतिशय प्रसिद्ध असा वैचारिक प्रयोग आहे. तुम्ही समजा एखाद्या मांजरीला एका बॉक्समध्ये बंद केले आणि त्यामध्ये जहाल विष यादृच्छिकपणे (randomly) सोडले जाईल अशी व्यवस्था केली तर बॉक्स उघडे पर्यंत ती मांजर जिवंत आहे की मृत हे कळणार नाही. म्हणजे जोपर्यंत आपण बॉक्स उघडत नाही आणि मांजरीचे निरीक्षण करत नाही तोपर्यंत मांजर एकाच वेळी मृत आणि जिवंत आहे. क्वांटम फिजिक्समध्ये ह्या अवस्थेला सुपर पोझिशन असे म्हणतात. (Superposition is the ability of a quantum system to be in multiple states at the same time until it is measured)

मुक्तकलेख

भाकरीचे पीठ

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 10:35 pm

कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.

व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.

कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.

- पाभे

कथामुक्तकसमाजशेतीमौजमजालेख

बाजारगप्पा-भाग-१

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 6:12 pm

खुलासा

सर्वप्रथम मी सेबी अधिकृत सल्लागार नाही. दुसरे म्हणजे या लेखात व्यक्त झालेली ही सर्व माझी व्यक्तिगत मते व अनुभव आहेत. यावर आधारीत जर काही केले तर ते आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर आणि ट्रेडींग मध्ये असलेल्या धोक्याची जाणीव ठेउन करावेत. तुमच्या निर्णयांची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच राहील. तर आता हात झटकुन झाल्यानंतर मी हातवारे करत तुम्हांस माझे अनुभव शेअर करतो कदाचित कोणांस उपयोग झाला तर होइल.

मांडणीअनुभव

तू फुलत रहा...

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 10:51 am

१०-१२ वर्षांपूर्वी एका प्रदर्शनातून आम्ही 'ॲडेनिअम 'चं एक झाड आणलं.छोटीशी बाल्कनी  फुलांनी बहरून गेली आहे अशी स्वप्नं कायमच पडायची.पण बागकामासाठी लागणारं ज्ञान, त्यासाठी खर्च करावा लागणारा‌ वेळ, इत्यादी इत्यादी गोष्टींच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे फारशी काळजी घ्यावी लागणार नाही आणि बोन्साय.. (म्हणजे मुळातच मोठं झालेलं झाड . हो म्हणजे नवजात शिशु संगोपन करावं लागणार नाही!), या वैशिष्ट्यांमुळे खरं तर हे झाड आम्ही आणलं. शिवाय मी चाफाप्रेमी. त्यामुळे चाफ्याशी साधर्म्य असलेलं , वर्षभर फुलणारं हे  बोन्साय मनात भरलंच! आणि खरं सांगते ,या झाडाने आम्हाला अपार आनंद दिला.

जीवनमानप्रकटन

आदिमाय

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
26 May 2024 - 9:19 am

तप्त तडिताघाताची
दीर्घ मेघगर्जनेची
मत्त सागरगाजेची
जातकुळी एक ना?

मोरपिसाच्या डोळ्याची
खोल पाणभोवर्‍याची
गूढ कृष्णविवराची
जातकुळी एक ना?

अगणित अभ्रिकांची
शतकोटी शक्यतांची
अनंताच्या उद्गमाची
आदिमाय एक ना?

कवितामुक्तक

A Midsummer Night's Dream.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 1:20 am

A Midsummer Night's Dream
संध्याकाळचे पाच वाजले कि माझी पाउलं शेट्टीच्या हॉटेलकडे वळतात. शेट्टीच्या हॉटेलमध्ये माझे एक खास टेबल आहे. शेट्टीला हे माहित आहे. मी येईपर्यंत तो त्या टेबलावर रिझर्वडची पट्टी लावून ठेवतो. त्या टेबलावरून मला रस्त्यावरची रहदारी पहायला आवडते. तसेच हॉटेलात बसलेल्या काही लोकांचेही दर्शन होते. त्यांना पाहून विचारांची गाडी स्वैर धावू लागते. किती शिकला असेल, कुठे नोकरी करत असेल, आपल्या आयुष्यात हा सुखी समाधानी असेल का?
ह्या विचारांना काही अंत नाही.

कथा

इच्छापत्र

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
24 May 2024 - 7:48 am

लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली
जशी झुळूक वार्‍याची, ग्रिष्माच्या काहीली

लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण
गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं

ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा
गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा

लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा
बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.

आयुष्यआयुष्याच्या वाटेवरकवळीकविता

निवडणूक, ऋषि सुनकांची

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
23 May 2024 - 4:23 pm

मंडळी पाश्चात्य देशीयांची दुसर्‍या देशांबद्दल सामान्य ज्ञान जुजबी असूनही भारता सारख्या असंख्य देशांच्या अंतर्गत राजकारणात यांची विद्यापीठे, प्रसार माध्यमे एन जी ओ, राजकारणी आणि त्यामागे असलेली शातीर मल्टीनॅशनल व्यावसायिक गणिते -आपले ठेवायचे झाकुन दुसर्‍याचे बघायचे वाकून- अशा स्वरूपात प्रचंड नाक खुपसत असतात. वसाहतवादाचा सुंभ जळाला तरी पिळ जात नाही. भारतीयांचे सामान्य ज्ञान अधिक असूनही परकीयांच्या घरात नाक खुपसण्यात कमी पडतो

समाजबातमी

रे.....!

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
21 May 2024 - 9:42 am

रे!!
रे तसा रोजच असतो सभोवताली
पण कधीतरी अचानक गवसतो.
आणि बघताबघता जीवाभावाचा रुहानी होतो.
रेषेसारखा जरी सरळ असला तरी तसा गडी थोडा तिरपागडीच.
म्हणजे रुढी रिवाजांच्या चौकटी न मानणारा.
भूत भविष्याचं ओझं न वाहणारा,
मोकळा, सुटसुटीत, आखीव रेखीव रे!
कधी, आलं अंगावर घेतलं शिंगावर असा रांगडा ,
कधीकधी तर ऋषीसारखा स्थितप्रज्ञ तर कधी, राजमान्य राजश्री वगैरे वगैरे!
पण रे ला पहायचं ते गं सोबत!
एका रे ची तिथं किती ती रुपं!
गं भोवती रिमझिमणारा, रुंजी घालणारा रुमानी रे!
गं ला नखशिखांत राजवर्खी रंगात खुलवणारा रंगीन रे!

मुक्तक