कवितेचा शब्द शब्द

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
24 Jun 2024 - 12:38 pm

प्रपाताने थेंबुट्यास
कमी कधी लेखू नये
पिंडी वसते ब्रह्मांड
कदापि विसरू नये

महापुरात लव्हाळी
वाचतील? खात्री नाही
लवचिकतेचा ताठा
लव्हाळ्याने धरू नये

आरशाने आरशात
प्रतिबिंब पाहू नये
अनंताने कोंदटसे
सान्तपण लेवू नये

कवितेचा शब्द शब्द
ओळ बनण्याच्या आधी
दोन ओळींच्या मधल्या
अनाघ्राता स्पर्शू नये

मुक्तक

पलंग..नव्हे मृत्यूचा सापळा

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
22 Jun 2024 - 4:21 pm

माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच संपलं होतं आणि माझ्या एका इंग्लिश मित्रासोबत मी पॅरिस मध्ये रहायला आलो होतो.आम्ही दोघेही तरुण होतो आणि आमच्या सध्याच्या वास्तव्याच्या या रंगतदार शहरात मनमुराद जगत होतो.‌ लुव्र म्युझियम च्या अगदी समोर असलेल्या  "पॅले रोयाल" मध्ये आम्ही रहात होतो. एका रात्री आम्ही  आसपास फिरता फिरता ,आज ' टाइमपास'  कसा करावा  याचा विचार करत होतो.माझा दोस्त म्हणाला,  ‌चल "फ्रॅस्कॅटी" त जाऊ.( फ्रॅस्कॅटी हा १९व्या शतकातील, पॅरिस मधील एक प्रख्यात कॅफे व सोशल क्लब होता. तिथे उच्चभ्रू वर्गातील पुरूष व स्त्रिया येत.

कथाभाषांतर

गोष्टी कृष्णाच्या १

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
22 Jun 2024 - 12:05 pm

मला आवडतात गोष्टी वाचायला.आणि त्याजर मुळापर्यंत नेणाऱ्या असतील तर मनोरंजक वाटतात.
संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी लेखक प्रा. डॉ.राम बिवलकर यांच्या पुस्तकातील जेवढा उमगेल तो गोषवारा देते.
फोटो -कृष्णा @मथुरा
अ

कथासंदर्भ

अज्ञाताचे लेख-चित्रकथी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in मिपा कलादालन
21 Jun 2024 - 9:07 pm

सुरक्शा ह मुख्य मुद्दा.
१-b1
बाहेरच्या बाजुने घरट्यासाठी निवडलेली जागा.
२-b2
आतल्या बाजुने घरटे.
३-b3
२२ एप्रिल २४,सुरूवात
४-b4

माझी योगचर्या

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Jun 2024 - 6:38 pm

भुजंगासनाची
माझी रीत न्यारी
डसेन जिव्हारी
नकळत ॥१॥

शीर्षासन तर
माझे आवडते
नको ते उलटे
पाहतो मी ॥२॥

"धनुरा"सनाची
सवय लाविली
"मशाल" फेकली
दूरवर ॥३॥

सध्या "पद्मा"सन
घालतो मुकाट
ED चे झेंगट
कोणा हवे? ॥४॥

अभंगइडीधोरणमुक्तकराजकारणमौजमजा

डार्कलँड

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
20 Jun 2024 - 10:37 pm

तो ऑफिसात कामात गढून गेला होता. अशावेळी येऊन कुणी व्यत्यय आणला असता तर त्याला ते आवडण्यासारखे नव्हते. पण जग कुणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही. आपण खूप मारे ठरवतो कि आज “हे” करायचं आणि नेमके त्यावेळी “ते” येऊन मध्ये तडमडते.
व्यत्ययची आठवण झाली आणि तो आलाच.
पांडू –म्हणजे- ऑफिसचा हरकाम्या प्यून. तो आला आणि त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. पांडू काही बोलायच्या आधीच तो म्हणाला,
“मला भेटायला कोणीतरी आलं आहे ना. मला माहित आहे. त्यांना सांग थोडा वेळ थांबा म्हणून.”

कथा

तीळाचे लाडू

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
20 Jun 2024 - 12:34 pm

लाडू करायचे म्हटलं की साजूक तूप पाहिजेच हा समज खजूर वापराने दूर झालाय.खजूर वापरल्यामुळे लाडूंची चवही सुंदर होते आणि वळायलाही झटपट होतात.

जीवाची सावली ....सलील कुलकर्णी

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
20 Jun 2024 - 7:12 am

सलील कुलकर्णी हा केवळ गायक. संगीतकार नाही तर त्या बरोबर तो जे निरूपण करतो ते फार विचार करण्यासारखे असते .. हि त्याची मुलाखत नक्की बघा
https://www.youtube.com/watch?v=uDVVpe2MRbE
या शिवाय त्यांचे स्वतःचे यु ट्युब वरील "कवितेचे गाणे होताना" हा आर्यक्रम पण सुंदर आहे नक्की बघा

थकलेला बाप हि कविता गाणे आठवत असले , त्याच पथंडीतले हे गाणे .. विषस म्हणजे याचा कवी सलील स्वतःच आहेत
https://www.youtube.com/watch?v=r2I4oDckZic