केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला- कलाडी ते मुन्नार

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
8 Jul 2024 - 8:17 pm

आधीचा भाग
1)पूर्वतयारी

"प्रेतात्म्यांची जत्रा" पुढे चालू.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
8 Jul 2024 - 6:13 pm

अरे हा एक गोष्ट सांगायची राहून गेली. नायिकेची भूमिका –मेरीची- करणाऱ्या Candace Hilligoss ह्या अभिनेत्रीला ह्या भूमिकेसाठी मेहेनताना म्हणून २००० डॉलर्स फी देण्यात आली. त्या फी वर ती प्रचंड खुश झाली. तिचा नवरा हॉटेलमधे वेटरचे काम करत होता. त्याने तत्काळ नोकरी सोडून दिली. त्याला अभिनेता म्हणून करिअर करायचे होते. त्याला लगेच ब्रॉडवे वर संधी पण मिळाली.

कथा

आपण IDIOT झालो आहोत का?

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
8 Jul 2024 - 11:10 am

नुकताच डॉक्टर्स डे साजरा झाला. डॉक्टर लोकांविषयी आपल्याकडे सर्व प्रकारच्या भावना आणि मतं आहेत. मी स्वतः डॉक्टर नाही. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक गुणवत्ता मी सिद्ध करू शकलो नाही पण माझे मित्र, मैत्रिणी आणि काही नातेवाईक डॉक्टर आहेत. मी जिथे काम करतो त्या टिम मध्ये मी सोडून सगळे डॉक्टर आहेत त्यामुळे ह्या क्षेत्रातल्या बातम्या, चर्चा रोज कानावर पडत असतात. त्यामुळे माझ्याकडे ह्या क्षेत्रातील थोडी माहिती असते.

मुक्तकप्रकटन

"प्रेतात्म्यांची जत्रा" एक सिने परीक्षण.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
8 Jul 2024 - 7:49 am

कार्निवाल ऑफ सोल्स हा एक विचित्र, अविस्मरणीय आणि विशेष म्हणजे अत्यंत कमी खर्चात बनवलेला भीती चित्रपट आहे. ही चर्चमध्ये ऑर्गन वाजवणाऱ्या एका स्त्रीची करूण कहाणी आहे. (चित्रपटात नायक नाहीये. ह्या नायिकेच्याच भोवती हा चित्रपट बेतला आहे.) तिला एका अमानवी चेहेऱ्याने पछाडले आहे. नायिका नुकतीच एका जीवघेण्या अपघातातून वाचली आहे. मरणारच होती पण वाचली. मोटारगाडीतून मैत्रीणींबरोबर प्रवास करताना तिची गाडी पुलाचा कठडा तोडून नदीत पडते. हा ह्या चित्रपटातील सुरवातीचा सीन आहे.

कथा

“साहेबांचा ताजमहाल”

rahul ghate's picture
rahul ghate in जनातलं, मनातलं
6 Jul 2024 - 12:46 pm

ऑफिस चे किस्से

उत्पादन क्षेत्रा मध्ये कामगार, माथाडी अश्या बऱ्याच घटकांचा सहभाग असतो , तसेच कनिष्ठ / वरिष्ठ व्यवस्थापक वर्ग पण खालून वर बढती घेत घेत आलेला असतो , त्यामुळे राहण्या , वागण्या, बोलण्यात थोडा अघळ पघळ पणा दिसतो, IT सारखा अत्याधुनिक कृत्रिम वातावरण नसते .
अश्या वातावरणातून काही अफलातून किस्से घडतात , अशेच काही किस्से सादर करण्याचा मानस आहे. सादर आहे त्या पैकी पहिला “साहेबांचा ताजमहाल”

कथाविचार

रॉय !!!

किल्लेदार's picture
किल्लेदार in भटकंती
6 Jul 2024 - 4:59 am

घर सोडून आता तब्बल अठ्ठावीस तास उलटले होते. तीन लांबलचक विमानप्रवास आणि वीट आणणारे त्यातले स्टॉप ओव्हर्स सोसून हातपाय दगड झाले होते. अडीच-तीन तासांचा बस प्रवास अजूनही शिल्लक होता. पुराणकाळात नारद-मुनिंना अवगत असलेल्या टेलीपोर्टेशनचा शोध अजून का बरं कुणाला लावता येऊ नये. “नारायण-नारायण!!!” म्हणत अगदी तिन्ही लोकांत नाही तरी निदान पृथ्वीलोकांत कुठेही लीलया जाऊ शकण्याची किमया विज्ञानाला लवकरच साधता यायला हवी.

केरळ कन्याकुमारी लेखमाला : पूर्वतयारी

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
5 Jul 2024 - 5:39 pm

     नमस्कार. खूप दिवसांनी मिसळ पाववरती येत आहे. निमित्त आहे आमच्या केरळ-कन्याकुमारी भटकंती लेखमालेचे....... खूप दिवसापासून केरळ माझ्या बकेट लिस्ट मध्ये होते. मिपावर केरळ वरती अनेक लेख आहेत. तसेच युट्युब वरती सुद्धा केरळ बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. माझ्या सासूबाई वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाल्या. त्यांना कुठेतरी फिरायला जायचे होते. आपण सर्वजण कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊयात याबाबतचे तू नियोजन कर असे सासूबाईंनी मला सप्टेंबर मध्ये सांगितल्यामुळे माझा आधीच तयार असलेला केरळ प्लान त्यांना सांगितला आणि आमचे दिवाळीनंतर केरळला जायचे निश्चित झाले.

२०१४ आधी आणी नंतर

पॅट्रीक जेड's picture
पॅट्रीक जेड in राजकारण
5 Jul 2024 - 11:43 am

पडले पूल, पडले छत,
२०१४ आधी पडत नव्हते का?
मेले लोक चेंगराचेंगरीत,
२०१४ आधी मरत नव्हते का?

समस्या जुनी, पण आवाज नवा,
कोण बदललं, कोण विचारेल का?
चुकीच्या हातात सत्ता दिली,
कळलं नाही, कोण भुललं का?

नवीन वाद, जुने प्रश्न,
उत्तरं मात्र राहिली तशीच.
स्वप्न दाखवून, फसवणूक झाली,
झाली चूक, जनता न शिकली.

विचार करावा आपण, मंथन करावे,
काय फरक, काय बदल घडले?
दोष देऊन संपत नाही काही,
दोष काढून, काम चालले.