दिवा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
23 Sep 2024 - 7:49 am

चंद्राची धग क्षीण होत सरता
घेरून ये गारवा
रात्रीचा तम प्राशुनी घुमतसे
वृक्षातळी पारवा

तेजाचे ऋण फेडण्यास भटके
तार्‍यांसवे काजवा
जीर्णाचे अवशेष येथ कुठले
उन्मेष जेथे नवा

प्रज्ञेचे स्थल-काल अक्ष हटता
भोवंडल्या नेणिवा
अस्ताचे भय भास्करास कुठले
जो चेतनांचा दिवा

कविता

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

24 Sep 2024 - 9:16 am | प्रसाद गोडबोले

चंद्राची धग ?

आर यु किडिंग मी ? श्या पहिल्याच घासाला दाताखाली खडा लागल्यासारखं झालं.

बाकी भोंवंडल्या नेणीवा वगैरे नेहमी प्रमाणे बाऊंन्स असल्याने ... असोच.