पावसातील उद्योग
...परवा बाहेर धोधो पाऊस कोसळत होता.. पुण्यातील तुंबलेल्या रस्त्यांमुळे बाहेर जाण्याचा प्रश्र्नच नव्हता. काही दिवसांपूर्वी मॅक्रोसाठी उभा केलेला सेट-अप तसाच ठेवला होता. फुलांचे फोटो काढून कंटाळा आला होता. तेवढ्यात नातवाच्या खेळण्यातील काही गाड्या हाती लागल्या. त्याचे फोटो काढायचे ठरवले, पण नुसते फोटो काढायचे नव्हते तर काहीतरी वेगळे... म्हणजे गाड्या खऱ्यातर वाटल्या पाहिजेत पण लोकेशनवर उभ्या आहेत असेही वाटले पाहिजे. माझ्याकडे असलेली मासिके चाळली पण योग्य अशी बॅकग्राऊंड काही सापडली नाही. तेवढ्यात मला मी काढलेले फोटो आथवले. एक होता गोकाकला काढलेला आणि दुसरा होता गुजरातमध्ये काढलेला.