आरक्षण एकाला मिळाले आहे आणि दुसरा त्याच्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्याच्या जागी नोकरीला लागतो. विचित्र वाटले ना. पण हे सत्य आहे. आरक्षणाची ही चोरी होते आणि तीही "डंके के जोर पर".
सरकारी नोकरी लागून मला तीन चार वर्ष झाले असतील. एक दिवस चार्टर बस मध्ये एका बाबू ने ही कहाणी सांगितली. त्यांच्या कार्यालयात काम करणारा एक शिपाई सुशील (काल्पनिक नाव) एका रविवारी, आपल्या नातलगला भेटायला डीटीसी बसने गेला. जिथे तो उतरला, त्या बस स्टॉप जवळ एक चर्च होते. तिथे त्याला सतीश (काल्पनिक नाव) दिसला. दोघांनी एका दुसऱ्याला नमस्कार चमत्कार केला. सुशील ने सतीशला विचारले, तू इथे चर्च बाहेर काय करतो आहे. सतीश म्हणाला, मी इसाई आहे. दर रविवारी, प्रार्थनेसाठी इथे येतो.
सोमवारी ऑफिस मध्ये आल्यावर सुशीलच्या लक्षात आले. सतीशची क्लार्क पदावर नियुक्ती एससी कोट्यातून झाली होती. सुशील ही एससी होता. तो गेल्या तीन चार वर्षापासून एसएससीची क्लार्क ग्रेडीची परीक्षा देत होता, पण त्याच्या हाती निराशा येत होती. सरकारी भरतीत इसाई लोकांना आरक्षण नाही, हेही सुशीलला माहीत होते. आपण नापास झालो त्याचे कारण सतीश सारखे आरक्षण चोर आहेत, याची त्याला खात्री झाली. त्याची तळपायातील आग मस्तकात गेली. तो सतीशची तक्रार करायला प्रशासनिक अधिकाऱ्याच्या चेंबर मध्ये गेला. तो म्हणाला सर, सुशील हा एससी नाही, इसाई आहे. अधिकाऱ्याने विचारले, हे तुला कुणी सांगितले. सुशील म्हणाला, स्वतः सतीश ने मला हे सांगितले. तुम्ही म्हणाल तर मी लिखित तक्रार करायला तैयार आहे. त्याची इन्क्वायरी करून त्याला नोकरीतून बरखास्त करा. अधिकारी सुशीलला समजावत म्हणाला, चर्च जाणे, गळ्यात क्रॉस घालणे, घरात मदर मेरीची मूर्ती ठेवल्याने कोणी इसाई होत नाही. सरकारी कागदावर तो एससी आहे. जोपर्यंत तो सरकारी कागदावर तो एससी आहे, तो पर्यंत आपण काहीही करू शकत नाही. परीक्षा देताना सतीश कागदावर एससी होता. हेच सत्य आहे. सुशील ने ओळखीच्या दलित नेत्यांना ही याबद्दल माहिती दिली पण त्याचा हाती निराशा आली.
ही तर झाली चाळीस वर्षांपूर्वीची कथा. आज पर्यंत लाखो दलितांचे धर्म परिवर्तन झाले आहे. पण सरकारी नौकरीसाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कागदावर ते आज ही दलित हिंदू आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एकाही दलित नेत्याने या आरक्षण चोरीचा कधी विरोध केलेला मला तरी स्मरणात नाही. आता तर धर्मांतरित कर्मचारी नौकरी लागल्या नंतर डंके की चोट पर आपण मसीह आहोत सांगतात. २६ डिसेंबर नंतर केक घेऊन कार्यालयात येतात. हिंदू दलित कर्मचारी विवश होऊन हा तमाशा बघतात. गेल्या काही वर्षांत कॅनडा आणि इतर देशातून येणार्या पैश्यांच्या जोरावर पंजाबत तर अंदाजे पाच ते दहा लक्ष सिख इसाई झाले आहेत पण कागदावर ते सिखच आहेत. या शिवाय इतर जातीचे लोक ही सरकारी नौकरी साठी खोटे कागद तैयार करून आरक्षणाचा लाभ घेतात. पण कुणी तक्रार केली तर त्यांच्या पकडल्या जाण्याची थोडी फार संभावना असते. सरकारचे म्हणाल तर, अजून तरी आरक्षण चोरी बाबत कठोर कायदा बनलेला नाही.
बाकी वेगळा विषय. फक्त दलित नव्हे तर इतर जातींचे लाखो लोग धर्म परिवर्तन केल्या नंतर ही सरकारी कागदांवर आणि सार्वजनिक जीवनात हिंदू राहतात. यात अनेक नेता ही असतील. क्रिफ्टो क्रिश्चन हा शब्द या लोकांसाठीच वापरला आहे.
प्रतिक्रिया
9 Nov 2024 - 1:26 pm | विवेकपटाईत
मला वाटले होते या ज्वलंत समस्या वर बुद्धिवादी मिसळपावकर प्रतिसाद देतील. पण बहुतेकांना ही समस्या समस्या वाटत नसावी. किंवा असेही असू शकते प्रतिसाद दिला तर ते प्रतिगामी ठरतील.
9 Nov 2024 - 6:00 pm | टर्मीनेटर
धागाच एवढा बकवास आहे की काय लोकांनी प्रतिसादावे....
9 Nov 2024 - 8:52 pm | कानडाऊ योगेशु
तसे नसावे.विषयच फार स्फोटक आहे. काहीही लिहु गेले तर कुणाच्या ना कुणाच्या तरी विरोधात जाणारच.
9 Nov 2024 - 5:32 pm | धर्मराजमुटके
आम्ही ना दलित ना इसाई ना ब्राह्मण ! त्यामुळे आमच्यासाठी ही ज्वलंत समस्या नव्हे.
कॉलेज च्या दिवसात आरक्षणामुळे आपल्यावर अन्याय होतो आहे ही भावना तीव्र होती पण मग ती हळूहळू मरण पावली. आता मनोज जरांगे आम्हालाही आरक्षण मिळवून देणार आहेत असे ऐकले आहेत मात्र तोपर्यंत आमची हाडे मसणात गेलेली असतील. (मला मराठा असूनही आरक्षण नको आहे).
हिंदुस्थानात यावच्चंद्रदिवाकरो आरक्षण राहणार आहे कारण ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांची ७० वर्षात देखील प्रगती झालेली नाही आणी अजून ७००० वर्ष पण प्रगती होईल की नाही याबद्दल शंकाच आहे.
असो.
लिहित रहा !
9 Nov 2024 - 6:27 pm | अमरेंद्र बाहुबली
हिंदुस्थानात यावच्चंद्रदिवाकरो आरक्षण राहणार आहे आपला नेता लायक नाही हे माहित असूनही लोक त्याला
पाठींबा देतील, अगदी नोकरीला ऑस्ट्रेलिया, उसगाव, युरोपात जातील पण, विशिष्ट नेता आपल्या जातीचा म्हणून त्याच्यासाठी सोमीवर धुमाकूळ घालतील, नी विरोधातिलक नेत्यांना शिव्या देतील तोपर्यंत तरी आरक्षण राहणार/रहायला हवे.
9 Nov 2024 - 6:29 pm | अमरेंद्र बाहुबली
सरकारी नोकरीच्या मखमली गादीवरून उठून नी हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येऊन लोक रस्त्यावर उतरतील आणी लढतील तरच काहीतरी परिवर्तन घडवता येईल. उदा. अरविंद केजरीवाल.