फुलपाखरू
ऐन पावसाळ्यातला माळशेज घाट. बाकीचे मित्र मैत्रिणी इथे तिथे पांगले होते . मस्त हिरव्यागार धुक्यात ती आणि मी दोघे चाललो होतो. एका जलाशयाच्या काठच्या दगडावर जागा बघून आम्ही दोघे बसलो. त्या पाण्यावर पण धुक्याचा हलकासा तवंग पसरला होता. अचानक ते धुकं दाट होऊन आमच्या अवतीभोवती पसरलं . दुरून पावसाचा आवाज ऐकू येत होता. मंजुळ पाय वाजवत तो पाऊस हलकेच जवळ येऊन आम्हाला मिठीत घेतो. त्या गर्द धुक्याच्या मिठीमध्ये मी, ती, तो जलाशय आणि फक्त आमच्या करता पडत असलेला पाऊस. ती माझ्या जवळ होती पण आणि नव्हती सुद्धा. एकमेकांच्या हृदयाची धडधड त्या पावसाच्या आवाजात मिसळून गेली होती.