रविवार भटकंती - सायकल वर तिकोना पेठ - एक तिडंबन

Yogesh Sawant's picture
Yogesh Sawant in भटकंती
27 Sep 2022 - 9:48 am

पेरणा - उन्हाळी भटकंती - कोरीगड तैलबैला आणि राजमाची (पण यावेळी एनफिल्ड वर)

माझी जुनी सायकल अजूनही चांगली चालते तरीसुद्धा मला डोंगरात चालवता येईल अशी मरीन सॅन क्यूएनटिन १ सायकल ऍमेझॉन वरून न मागवता शोरूममधूनच घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळीच समोरच्या डोंगरावर चालवून आलो.

Mountain Biking
हा फोटो त्या दिवशीच काढलेला आहे. तुम्ही आज बघताय.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
27 Sep 2022 - 7:54 am

सरोगेट पार्टनर आणि बॉडी वर्क थेरपी

आरोग्यशिक्षणलेखसल्लाप्रश्नोत्तरेआरोग्य

विजेची गोष्ट ८: डेव्हिची ठिणगी - एडिस्वानचा दिवा, प्लॅंक ला दिसला मार्ग नवा

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
26 Sep 2022 - 11:06 pm

समईची वात जळते, स्वतः:ला तेलात भिजवून घेते आणि जळत जळत आजूबाजूच्या अंधाराला जाळते. आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपल्या अवतीभवती अंधाराला फिरकू देत नाही. तेच मशालीतल्या वातीचं, पणतीतल्या, मेणबत्तीतल्या वातीचं.. हे स्वतः जळणं, स्वतः: ला त्रास करून घेऊन आजूबाजूला आनंद देणं तसं सृष्टीत सर्वत्रच दिसतं.. स्वतः:चं सारं अग्नीला वाहून, इदं न मम म्हणजे हे माझं नाही असं म्हणत स्वतः कडचं उत्तम समाजाला देणं आणि त्या निःस्वार्थात स्वतः उजळून जाणं यापेक्षा एखादा माणूस स्वतः चं अधिक चांगलं असं काय करू शकतो?

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
26 Sep 2022 - 3:13 pm

ढवळ्या शेजारी पवळा बांधला
वाण नाही पण गुण लागला

पेरणा

एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्‍यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या.

समाजऔषधोपचारविचारअनुभवमतआरोग्यविरंगुळा

वर्ल्ड टूरिसम डे - निमित्त प्रदर्शन - माझा फोटो

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in मिपा कलादालन
26 Sep 2022 - 2:08 pm

हे सांगायला आनंद होत आहे कि शेखर कपूर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार्‍या प्रदर्शनात माझा "वारी" फोटो प्रदर्शित होणार आहे . जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या प्रदर्शनात माहितीपट, व्लॉग, छायाचित्रे असतील. परभन्ना फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले आहे.

स्थळ - नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे
वेळ - सकाळी 10 ते दुपारी 2
तारीख - 27 सप्टेंबर 2022

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
26 Sep 2022 - 1:14 pm

पेरणा

कोण शिकवते कळ्यांना
कसे, केव्हां उमलायचे
कोण शिकवते पानांना
केव्हां कसे गळायचे

ऋतुराज वसंत येता
झाडे बहरून येती
निसर्ग चक्र फिरता
होती फुले कळ्यांची

श्वानास कसे कळते
मास भादव्याचा आला
खरचं गरज आहे का?
हे सर्व शिकवावयाची
बुद्धिमान मानवाला!!!

जानुके आपुली
आदम आणी ह्व्वाची
स्वर्गातूनच शिकून आली
कला फळे चाखायची

उकळीकैच्याकैकविताजाणिवमुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदओली चटणी

आजच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्व

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
26 Sep 2022 - 8:46 am

वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये जोडीदार निवडताना केलेली चूक, स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या काही लैंगिक समस्या, कामजीवनविषयक अभ्यासाचा अभाव यांचा समावेश होतो. या सगळ्यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय ठरतो. जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी हे यातून समजते. तसेच सेक्स मधील विविधता, वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स यांचीही माहिती मिळते.

आरोग्यविचारलेखसल्लामाहिती

कला आणि संस्कृती चाहत्यांसाठी झपुर्झा म्युझियम

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
25 Sep 2022 - 4:50 pm

पुण्यातील शिवाजीनगर येथून 22 किमी आणि खडकवासला धरणापासून 8 किमी अंतरावर कुडजे गावात "झपुर्झा" हे कला व संस्कृती संग्रहालय वसलेले आहे. आपण इतिहास, कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम बघायलाच हवे.

पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल तर इथेही तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. मी 24 सप्टेंबर 2022 या तारखेला ह्या म्युझियमला भेट दिली. येथे एकूण 10 कलादालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत. तसेच एक एम्फीथिएटर आहे. तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते.

संस्कृतीकलाआस्वादसमीक्षा