घर पाहतो बांधून : १
गावी स्वतःचं, स्वतः घडवलेलं एक घर असावं अशी खूप इच्छा होती.
घरांबद्दल मी खूप वाचत आलो. अगदी अलिकडचं उदा. द्यायचं तर नंदा खर्यांच्या नागपूरच्या घराबद्दल त्यांच्या 'ऐवजी' या आत्मचरित्रात्मक पुस्तकात वाचलं. त्याआधी माधव आचवलांपासून ते गणेश मतकरी अशा अनेक लोकांचे घराबद्दलचे लेखन मी वाचलं आहे. काहींची अगदी किशोरवयीन उत्साहाने कात्रणंही जपून ठेवली आहेत.
कोल्हापुरात असताना माझ्या वास्तव्याशेजारी एक सुंदर बंगला होता. मी त्या बंगल्याच्या बागेकडे, कुंपणावर सोडलेल्या वेलींकडे जातायेता आवर्जून खूप वेळ पाहत असे. मालकांचे नाव गर्दे अंकल. गर्दे अंकल नामांकित आर्किटेक्ट. माझी काकू ब्युटी पार्लरच्या होतकरू दिवसांमध्ये त्यांच्या पायांना मालीश करायला जाऊ लागली. काकूकरवी मला त्यांच्या घरी प्रवेश मिळाला.
घरात चंद्रप्रकाश सांडावा म्हणून आतल्या जिन्यावरती पारदर्शक छत बसवून घेणारा अवलिया माणूस. स्वतःचं घर असल्याने अर्थातच विट न विट विचारपूर्वक रचलेली. स्थापत्याविषयी माझी जिज्ञासा जागृत झाली आणि मग मी जमेल तशी पुस्तकं, मिडिया, अनेकाविध परदेशी कार्यक्रम यांचा फडशा पाडत गेलो.
गर्दे अंकल यांना म्हशीची चित्रं काढायचा छंद होता. माझ्यात एक डंबलडोर/गँडाल्फ दडून बसल्याने मला असे (अत्रंगी) लोक पटकन आवडून जातात. त्यांचे-माझे बरेचसे इंटरेस्ट जुळत असल्याने मी त्यांच्या घरी जायचा चान्स चुकवत नसे. गर्दे अंकल यांनी मला एकदा त्यांच्या घराबद्दलचा स्थापत्यविचार विस्ताराने समजावून सांगितला. त्यामुळे, आणि पूर्वीच्या माझ्या उपजत किड्यांमुळे अवकाश, आकार अशा अनेक गोष्टींवर इतक्या खोलवर विचार करावा लागतो हे उमगत गेलं. मी दहावीचा अभ्यास सोडून माझ्या भविष्यातल्या घराचे फ्रंट, टॉप, साईड विव्ह्युज काढत बसे त्या वेडेपणाला खरेतर अजून जोरकस चालना मिळाली. आजही बरोब्बर मोक्याच्या वेळेस मी घरांचे आउटलाइन्स काढत बसतो.
मी कुटुंबाच्या प्रेशरला शरण जाऊन पुण्यात फ्लॅट घेतला. त्या फ्लॅटमध्ये २ वर्षे राहिलोही. तरीही त्या फ्लॅटला मला कधीही घर म्हणावेसे वाटले नाही. फ्लॅट वाईट नाही. पण मला तिथे (डीएसकेछाप म्हणा हवं तर) घरपण जाणवलं नाही.
स्वतःचं घर असणं हा एक कर्तबगारी सिद्ध करण्याचा प्रकार आहे. मला त्यात आता बिल्कूल स्वारस्य नाही. ते करून झालं. मला माझं एक घर फक्त माझ्या स्वतःच्या आर्किटेक्ट होण्याच्या खाजेपायी बांधून पाहायचं आहे. मला त्यात आनंद मिळतो.
अनेक लोक घर बांधताना किंवा फ्लॅट सजवताना नको तिथं पैसा घालतात. उदा. आजकाल सगळीकडे साथीसारखा पसरलेला फाल्स सिलिंग नामक भयंकर प्रकार. म्हणजे घराच्या खिडक्यांना उत्तम दर्जाच्या जाळ्या नसातात किंवा एकदम कामचलावू दर्जाचे बाथरूम फिटिंग्ज असतात पण सातशे चाळीस एलईडी लावलेले राजस्थानी फर्निचरवाल्याच्या डिजाईन बुकातले कलाकुसरीची परमावधी असलेले एक फाल्स सिलिंग आणि त्याला चिकटून असलेला एक किंवा दोन करकरणारे पंखे मात्र दिवाणखान्याची शोभा 'वाढवत' असतो. भारतीय हवामानाचा, किड्या कुड्यांचा फारसा विचार न करता, झुरळांच्या प्रजातीच्या रक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी केलेले किचन कट्ट्याखालील किचन कॅबिनेट. अर्थात काही गोष्टी आता गरजेच्या होऊन गेलेल्या आहेत. स्पेसही आक्रसत गेलेली आहे. त्यामुळे प्रसंगी झुरळं सहन करून असे किचन कॅबिनेट केले जातात. खैर, त्यावर पुन्हा कधीतरी.
मला एक घर बांधून पाहायचे आहे. म्हणजे मी काही गर्दे अंकल सारखा नामांकित आर्किटेक्ट नाही. पैसे पडून असलेला मिनिमिलिस्टही नाही. उपयोजिता हा माझ्या घराचा, घरातल्या गोष्टींचा एक महत्त्वाचा गुण असणार आहे. पण उपयोजितेच्या नावाखाली मला ट्रान्सफॉर्मरसाखे एकशेवीस आकार बदलणारे फर्निचरसुद्धा करायचे नाही. मी आतापावेतो पाहिलेल्या अनेक घरांचा, इंटिरियरचा प्रभाव नक्कीच असेल. असे एक घर मला, माझ्या मालकीच्या जागेवर बांधायचे आहे. मी त्याला "मुक्तछंद" किंवा "साजणवेळा" असले भामटं दिखाऊ नावही देणार नाही. त्यात उगाच पूर्वीच्या वाड्यांना होते तसे फॅन्सी दरवाजे, पूर्वीच्या वाड्यांत होते तशा तुळया किंवा सदरा, पूर्वीच्या वाड्यांत होती तशी तुळशी वृंदावने, पूर्वीच्या वाड्यांत होती म्हणून मध्ये चौकोन मोकळी जागा, पूर्वीच्या वाड्यांत होते म्हणून लटकते कमोड, पूर्वीच्या वाड्यांत होत्या म्हणून जागोजागी समया आणि लामणदिवे वगैरे नको त्या इम्प्रॅक्टिकल गोष्टी करणार नाही.
एका बेसिक स्केच पासून सुरु करणार. प्रगती जशी होईल तशी मांडत राहणार. किती काळ लागेल सांगता येणार नाही. किती अडचणी येतील तेही ठाऊक नाही.
जागा कुठे तेही फायनल नाही. इथून सुरुवात आहे. पाहू.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खुप छान!
वास्तुशांती...
उत्सुकता वाढली आहे.
लॉरी बेकर किडा चावलाय का?
आजकाल सगळीकडे साथीसारखा
सहमत आहे...
हम्म...
गावात आपण उपरेच समजल्या जातो ....
सावधानशी सहमत.
आजकाल सगळीकडे साथीसारखा
+१
ज्जे बात ,
मस्तच.
रोचक आहे तुमचा विचार, स्वतः
खूप शुभेच्छा आणि आपल्या
एक वेगळाच लेखनप्रयोग. रोचक.
अरेवा
मस्त लेख
आपली हि रचना आणि निर्मिती ची
काही मुद्दे
थोडे स्वानुभव
गर्दे अंकल यांना म्हशीची
मला अनिल अवचटांची आठवण झाली.
त्यात काय?
लिहिताना हुसेन बॅक ऑफ द
शुभेच्छा
तुमच्या घरासाठी जागा मी देऊ शकतो.
सुंदर लेख अण्णा !
💖
कसलाही आव न आणता केलेले सांगितलेके मनोगत मनापासुन आवडले !अगदी पटेश.
अभिनंदन व सदिच्छा!
धन्यवाद : रुमाल
आमच्या वडिलांचे मुंबईतील घर
तूमचे घर तुमच्या दृष्टीने