मावळतीची दिशा....
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
निसटल्या क्षणांना पुन्हा धरावे
पारंब्या वरती झुलता झुलता
पदराखाली पुन्हा लपावे
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे
आठवणीतले विस्मृत चेहरे पुन्हा एकदा तरी दिसावे
डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्यावरले धुके पुसावे
हुरहुरत्या त्या कातरवेळी ,कधी कुणाची वाट बघावी
दुरून बघता ओंजळीतली, प्राजक्ताची फुले दिसावी
किती मिळाली किती गळाली, मनात आता खंत नसावी
मात्र मागणे एकच ,मावळतीची दिशा पूर्व असावी!!
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे