अंतर्गत सीमावाद (भाग-1)
अलिकडेच महाराष्ट्रातील विविध सीमावर्ती भागांमधील गावांनी आपल्याला शेजारच्या राज्यांमध्ये समाविष्ट व्हायचे आहे, असं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. स्वातंत्र्यानंतर भाषा-आधारित घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळं काही घटकराज्यांमध्ये वांशिक, धार्मिक, भाषिक असे वैविध्य मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. पुढील काळात विविध कारणांनी देशातील प्रत्येक समुदायाकडून आपल्यासाठी स्वतंत्र घटकराज्याची मागणी लावून धरली जात आहे. त्यामुळं भाषेच्या आधारावर घटकराज्यांची निर्मिती करण्याचे तत्व मागे पडले आहे.
व्यासपर्व (ऐसी अक्षरे मेळवीन-७)
व्यासपर्व –लेखिका दुर्गा भागवत
काही पुस्तकं मनमुराद अनुभवण्यासाठी मनाचं क्षितीज विस्तारलेलं पाहिजे. व्यासपर्व मनाचं कवाड विस्तारल्यावर हातात पडलं. धर्मग्रंथाला कलाकृती म्हणून अनुभवताना वीण घट्ट झालीये.
मराठी साहित्यातील व्रतस्थ दुर्गा भागवत यांनी केवळ ११० पानांमध्ये महाभारताचे व्यासांच्या मांडणीनुसार केलेले विश्लेषण शब्द सौंदर्याने सुशोभित आहे.
आली जरी रात सजणी...
आली जरी रात सजणी पण नभी हे चांदणे
तुझिया मनातील गुज मज सांगती तव कंकणे.
हा गार वारा बिलगता झाकता तू लोचने
हे मेघ ही बरसले तव पाहता ते लाजणे.
का डोलती या लता? ही वाट झाली धुंद का?
तू चालता छेडताती सुर तुझी ती पैंजणे.
डोळ्यात डोळे मिसळुनी तू मला गे पाहता
नाही जरी बोललो हृदयात या झंकारणे.
रेंगाळतो दीस माझा रूसुनी बसताच तू
तेव्हा मला आवडे ना ते तुझे गे वागणे.
.
.
दीपक पवार.
आदर्श पत्नी
आदर्श पत्नी
आयटीआरबाबत अरजंट मदत हवी आहे.
वेळेच्या आभावी त्या एररचा स्क्रीन्शॉट, फोटो ईथे अपलोड केला आहे.
असा एरर कोणी सॉल्व्ह केला आहे का (प्रश्न चिन्ह काम करत नाहीये). हा एरर सोल्व्ह होतो एक चलन तयार करुन १४०ब मध्ये त्या डिटेल्स टाकयाच्या. अगदी दहा रुपयांचे चलनही चालते.मी मेथड वापरुन बघितले आहे पण नाही झाला प्रोब्लम सॉल्व्ह.
प्लीज ईथले कोणी ह्या बाबतीत काही मदत करु शकता काय (प्रश्न चिन्ह काम करत नाहीये).
पुन्हा
कालचक्र उलटे फिरले अन्
पुन्हा जन्मलो
जुन्या चुका विसरून नव्याने
करून बसलो
काचपात्र भंगले तरीही
जोडत बसलो
मुखवट्यांस समजलो चेहरे
तिथेच फसलो
अढळपदी उल्का बघताना
जरी कोसळलो
डोळे कितिदा आले भरूनी
तरीही हसलो
बेचिराख होता होता मग
पुनश्च रुजलो
उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती तीसरा दिवस
हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा परिसर :भाग ३: कांगडा किल्ला व लोअर धर्मशाळा
आज सहलीचा दुसरा दिवस. पहाटे लवकरच जागआली. बाल्कनीतून पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य दिसत होते. इमारतीच्या गच्चीतून अजून सुंदर नजारा दिसणार होता म्हणून वर आलो. आमच्या आधीच उठलेले काही जण दूरवर सूर्योदय पॉइंटला पोहचले होते. सूर्य पाठीमागच्या डोंगरातून वर येत होता त्याची किरणे समोरच्या शिखरांवर पडून उजळायला सुरुवात झाली होती.
दे दवांचे प्याले
कितीदा ओठांवरती अव्यक्त राहिलेले
शब्द ते तुझ्या मी, डोळ्यांत वाचलेले
जायचे कुठेशी, मी चाललोय कोठे?
तुझ्या रूपाने, रूपाली, मला भारलेले
माळून दे म्हणालीस, माला तारकांची
केशी तुझ्या टपोरे, चंद्रफूल माळलेले
भेटता तुला उराशी, श्वासात आग येते
क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले
घनगर्द भावनांचा कल्लोळ माजतो ग
दे दवांचे प्याले, पाकळ्यांत साठलेले
- संदीप चांदणे