आली जरी रात सजणी...
आली जरी रात सजणी पण नभी हे चांदणे
तुझिया मनातील गुज मज सांगती तव कंकणे.
हा गार वारा बिलगता झाकता तू लोचने
हे मेघ ही बरसले तव पाहता ते लाजणे.
का डोलती या लता? ही वाट झाली धुंद का?
तू चालता छेडताती सुर तुझी ती पैंजणे.
डोळ्यात डोळे मिसळुनी तू मला गे पाहता
नाही जरी बोललो हृदयात या झंकारणे.
रेंगाळतो दीस माझा रूसुनी बसताच तू
तेव्हा मला आवडे ना ते तुझे गे वागणे.
.
.
दीपक पवार.