अव्यक्त

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
3 Feb 2023 - 6:25 pm

मोकलाया मन बोझील माझे, विश्वास शोधत राहीलो मी
अनाकलनीय,अविश्वसनीय सारे चूपचाप बघत राहीलो मी

अष्टावधानी होतो तरिही,अनभिज्ञ राहीलो मी
ती(संधी) समोर होती,तरिही निशब्द राहीलो मी

अविरत,उद्रेक भावनांचा,सावरत राहीलो मी
बांध व्यर्थ आत्मविश्वासाचा, बांधत राहीलो मी

बाळगून उगा तमा जगाची,निरंतर अव्यक्तच राहीलो मी
भेटेल कुणी मनकवडा,निरंतर वाट पहात राहीलो मी

भ्रमनिरास झालो अंती,मग माझाच न राहीलो मी
दिव्यांग नव्हतो तरीही अव्यक्तच राहीलो मी
२७-१-२०२३

अव्यक्तकविता

ज्ञानेश्वरी आणि श्रोडिंगर्स कॅट

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
3 Feb 2023 - 2:36 am

हा तर असं आहे की आपलं बैठं काम आहे. एका जागेवर आठ आठ तास बसून कोड रन करणे , कंपनीचा जास्तीत जास्त फायदा करुन देणे, हे सर्व भारतात बसुन करत असल्याने एक्सपेन्सेस कमी करणे आणि त्या योगे मेक अमेरिका ग्रेट अगेन हाच आपला उद्देश ! हां तर हे असे सारे असल्यामुळे बसून बसून खुर्ची कितीही कम्फर्टेबल असली तरीही एवढा वेळ बसल्याने व्हायचं तेच होते आणि पाठ दुखायला लागते. हलकीशी पाठ दुखायला लागली आणि अचानक अमृतानुभव मधील श्लोक आठवला.

तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक ।
तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥

तंत्रअनुभव

काहीतरी सलत असतं...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
2 Feb 2023 - 3:55 pm

काहीतरी सलत असतं
आपणास मात्र कळत नसतं
कुणाच्यातरी आठवणीने मन
आतल्याआत जळत असतं

होवून कधी बेभान
झुलत असतो
फुलासारखं आपण सुध्दा
फुलत असतो
कुठल्याश्या भासापाठी मन सारखं पळत असतं.

असं कसं कुणावरही
आपण प्रेम करुन बसतो
पण त्याचं आपल्याकडे लक्ष नसतं
अन् आपण आयुष्यावर रुसतो
ती आपल्याला झिडकारते
किंवा तो आपल्याला झिडकारतो
कळत असून मन आपलं त्याच्याकडेच वळतं.

दीपक पवार.
https://youtu.be/vsStJxhSSDU

कविता माझीकविता

वार्तालाप : (३) नमस्कार करण्याचे फायदे

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Feb 2023 - 9:42 am

श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात:

नमस्कारास वेचावें नलगे
नमस्कारास कष्टावें नलगे
नमस्कारास कांहींच नलगे
उपकरण सामग्री. (४/६/२२)

संस्कृतीविचार

अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
2 Feb 2023 - 1:43 am

अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी
सहज फिरायला निघालो होतो
सहज मंजे मुद्दामच …
– मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे
– घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो.
नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले

– मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते.
कोs हं ? … मी कोण आहे ?
मै कौन हूँ ? व्हू आयाम ?

अदभूतआयुष्याच्या वाटेवरउकळीकविता माझीकैच्याकैकविताजिलबीभावकवितारतीबाच्या कवितालाल कानशीलकरुणसंस्कृतीनाट्यकवितामुक्तकजीवनमान

सुचलेले विषय पण हुकलेले लेखन

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 Feb 2023 - 4:04 pm

नियमित लेखनाचा छंद लागला की कालांतराने एक समस्या जाणवू लागते - लेखनासाठी नित्य नवे विषय सुचणे. आपल्या वाचन, मनन आणि निरीक्षणातून मनात अनेक ठिणग्या पडतात आणि त्यातून अनेक विषय मनात रुंजी घालतात. पण त्यातला लेखनासाठी कुठला विषय गांभीर्याने निवडावा यावर मनात बरेच दिवस द्वन्द्व होते. अशी संभ्रमावस्था बराच काळ चालते आणि मग अचानक एखादा विषय मनात विस्तारू लागतो. तो विषय आळसावर मात करून नेटाने पुढे रेटला तरच त्याचा लेख होतो. लेखकाच्या मनात घोळत असलेल्या अनेक विषयांपैकी किती विषयांचे लेखन पूर्ण होते हा एक उत्सुकतेचा विषय आहे.

समाजलेख

आणि बाकी शून्य...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
1 Feb 2023 - 11:22 am

तुझा फोन आला ना की,
चेह-यावर molar to molar हसू उमटतं..
हातातलं काम तिथंच थांबवत मी तव्याखालचा विस्तव विझवते.
केसांची बट मागे सारत स्वतःला उगा आरशात निरखते.
मग फोन घेऊन मी कोलाहलापासून दूर बाल्कनीच्या कोप-यात जाते.
आणि रिंग थांबायच्या जssस्ट आधी हॅलो म्हणते.
सुरवातीची औपचारिक चौकशी आटपून तू पटकन कामाकडे वळतोस.
माझं हसू तीन चतुर्थांश होतं..
ते बोलणं पण म्हणता म्हणता संपून जातं.
आता हसू बरोब्बर निम्मं...
मग तू म्हणतोस, "बाकी काय म्हणतेस?"
आवडलेली कविता, नावडलेलं गाणं..
पाहिलेली वाट, तुझं न येणं..

मुक्तक

महाराष्ट्र खगोल संमेलनाचा अविस्मरणीय अनुभव!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
31 Jan 2023 - 1:26 pm

✪ सेंटर फॉर सिटिझन सायन्सेस (CCS), विज्ञान भारती आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) द्वारे आयोजन
✪ तीन दिवसीय संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची व्याख्याने, सखोल चर्चा आणि संवाद
✪ जुन्या व नवीन पिढीतील खगोलप्रेमींचं एकत्रीकरण- Passing of baton
✪ आयोजक, संबंधित संस्था, व्हॉलंटीअर्सद्वारे उत्तम नियोजन आणि चोख व्यवस्था
✪ आजच्या खगोल विज्ञानात काय सुरू आहे ह्यांचे अपडेटस आणि मूलभूत संकल्पनांची उजळणी
✪ भारतातल्या संस्था व वैज्ञानिक किती मोठं योगदान देत आहेत ह्यावर प्रकाश
✪ अजस्त्र जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) ला भेट!

तंत्रविज्ञानलेखअनुभव