पाहू

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
13 Dec 2023 - 3:53 pm

एकदा भेटून पाहू
ये पुन्हा बोलून पाहू

मागचे विसरुन सारे
भूमिका बदलून पाहू

क्रोध, मत्सर, मद वगैरे
षडरिपू टाळून पाहू

पावतो बाप्पा म्हणे हा
चल नवस बोलून पाहू

बस जरा साथीस 'नाहिद'
ही गझल गाऊन पाहू

gazalगझल

रॉबी डिसिल्वा-एका मनस्वी कलाकाराचा प्रवास(ऐसी अक्षरे....मेळवीन-१३)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
11 Dec 2023 - 3:08 pm

A

लेखिका वीणा गवाणकर यांच्या सहज सोप्या भाषेतल्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एका आंतरराष्ट्रीय भारतीय कलाकाराची ओळख करून देणारे पुस्तक!

मुक्तकआस्वाद

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

निओ's picture
निओ in जनातलं, मनातलं
9 Dec 2023 - 8:00 pm

अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही.
मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं.

कथामुक्तकविडंबनविनोदचित्रपटप्रकटनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाअनुभवमतविरंगुळा

वडोदरा - एकता पुतळा एक धावती भेट

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
9 Dec 2023 - 2:55 pm

वडोदरा - एकता पुतळा एक धावती भेट

नर्मदा नदीवरील Sardar Sarovar Dam धरण गुजरात सरकारचा प्रकल्प आहे आणि धरण भिंती पुढील जमीन परिसर एकता पुतळा (Statue of unity) प्रकल्पासाठी राखीव केला आहे. तो केंद्र सरकारकडे आहे.

हे धरण उभारताना किती विरोध झाला हे सर्वांना माहीत आहेच.

प्रारब्ध - ४

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
8 Dec 2023 - 4:21 am

हयग्रीव ला जाग आली तेंव्हा कदाचित अंधार होता किंवा त्याच्या डोळ्यांना काळोख दिसत असावा. पण नाही, आकाशांत चांदणे दिसत होते. सर्वांग ठणकत होते. कुठेतरी बाजूला आग असावी कारण त्यातून उडालेल्या ठिणग्या हवेतून जात होत्या. तो जमिनीवर पडला असावा. इतक्यांत त्याला एक चेहेरा दिसला. नाही, त्याची छकुली नव्हती, पोरगा नव्हता. कुणीतरी दुसराच. काळे कपडे घातलेला थोडासा उग्र. हयग्रीव ने उठायचा प्रयत्न कला पण त्याला जमले नाही.

kathaa

तो मुशाफर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Dec 2023 - 3:35 pm

तो मुशाफर मध्यरात्री चांदण्यांशी बोलतो
नश्वराच्या तागडीने शाश्वताला तोलतो

दीर्घिकांच्या अंतरंगी अग्नि जो कल्लोळतो
आणुनी त्या भूवरी तो मृगजळाने शिंपतो

स्थूलसूक्ष्मातील सीमा जेथ होते धूसर
त्या तिथे थबकून थोडा, द्वैत सगळे मिटवितो

चेतनेची स्पंदणारी नाळ जिथुनी उगवते
त्या जडाच्या जटिल प्रांती प्राणफुंकर घालतो

शोधिले मी त्यास जळिस्थळी, काष्ठी आणि पत्थरी
शोध माझा दर्पणी प्रतिबिंब बघुनी संपतो

मुक्त कवितामुक्तक

वार्तालाप: कर्माची फळे आणि आधि भौतिक ताप

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
7 Dec 2023 - 2:22 pm

श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी असतात.

धर्मसमाजविचारमत

आजचा मेन्यू -३

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
7 Dec 2023 - 11:35 am

शेवग्याच्या पानांच्या पाककृती खुप दिवसांपासुन करायच्या होत्या.शेवग्याचा झाड कल्पवृक्ष प्रमाणेच झाल आहे.सांबरमध्ये शेवग्याच्या शेंगाशिवाय मज्जा नाही.वरपायला तर आवडतातच पण औषधही आहेत.आता कुठे याच्या पानांविषयी/पाल्याविषयी मी जागरूक झालेय.अतिशय कोवळे,सहज स्वच्छ होणारे हिरवेगार आहेत.याच्या तीन सोप्या पाकृ!
१.शेवगा पानांची पोडी/गन पावडर
२.शेवगा पानांचे थालिपीठ
३.शेवगा पानांची भाजी

A

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली

अहिरावण's picture
अहिरावण in जनातलं, मनातलं
6 Dec 2023 - 10:27 am

डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.
संविधानाचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, अग्रणी सामाजिक सुधारक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली !

जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय भिम !!

समाजजीवनमानप्रकटन