जेव्हा तुझ्या बटांना (कथा)
केतनने नेहमीप्रमाणे हाय टाकलं. जाईने उत्तर दिलं. तीही ऑनलाईन होती. बरेच दिवस ते ऑनलाईन बोलत होते. जाईची ब-यापैकी माहिती त्याला कळली होती. तिच्या आवडीनिवडी कळल्या होत्या. तिला एकदा पाहायचं होतं. मनात तुंबलेला प्रश्न विचारायचा होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर केतनने विचारलं.
"कधी भेटायचं ?"
"भेटू रे."