व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
1 Jan 2024 - 6:46 pm

*व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४*

*कट्टर भाजप समर्थक* :

मुक्तकजीवनमानप्रकटनविचार

आवळी-जावळी, ‘आवळी-आवळी',.. इत्यादी !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 Jan 2024 - 12:18 pm

२०२४ : आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक आरोग्यपूर्ण शुभेच्छा !.
*********************************

गेल्या पंधरवड्यात अमेरिकेतील 32 वर्षीय Kelsey Hatcher यांनी एका विशेष प्रकारच्या ‘जुळ्या’ मुलींना जन्म दिल्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. या बाईंना चक्क दोन गर्भाशये असून त्या प्रत्येक गर्भाशयात एक मुलगी अशा प्रकारचे त्यांचे हे गरोदरपण होते.

जीवनमानआरोग्य

म्युच्युअल फंड गुंतवणूक: माझा अनुभव

ईंद्रधनु's picture
ईंद्रधनु in जनातलं, मनातलं
29 Dec 2023 - 12:17 pm

म्युच्युअल फंड या विषयावर सोशल मिडिया आणि युट्युब यावर खूप माहिती मिळत असते. काहींच्या मते हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे तर काही याला खूप नावं ठेवतात आणि स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवुन त्यात जास्त फायदा कसा आहे ते सांगतात. या सर्व मत-मतान्तरात मी माझा अनुभव सांगतो.

अर्थव्यवहारगुंतवणूकअनुभवमत

राजमा गस्सी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
28 Dec 2023 - 11:37 am

गस्सी
गुगलला विचारले असता त्याने गस्सी म्हणजे "थिक करी" असं सांगितलं आहे :)
तर दक्षिण भारतात इडली, डोशासाठी वापरल्या जाणाऱ्या पोडीची तर मी फॅन झालेच आहे. अगदी डबा भरून ठेवते, लेकीला भातावर कधी चटणी तेल म्हणूनही आवडते. यात डाळी वापरल्या जातात, हे आवडतं. त्याचाच एक पुढचा पदार्थ समजला, गस्सी भाजी. यात मसाला ताजा बनवून वापरल्या गेल्याने चविष्ट पदार्थ होतो. मी राजमा वापरला. गस्सीसाठी हरभरे, वाटाणे, चवळी असे भिजवून, शिजवून वापरले जाऊ शकतात.
साहित्य -

थंडीतली खाद्ययात्रा.

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
28 Dec 2023 - 9:33 am

थंडी हा माझा आवडता ऋतू आहे,असं मी मागच्या लेखात म्हटलंच आहे. थंडीमध्ये आणखीही एक मज्जा असते. ती म्हणजे थंडीतली खाद्ययात्रा!

मांडणीप्रकटनविचार

इच्छापूर्ती

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
27 Dec 2023 - 12:37 pm

स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, इच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू समयी त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही.

कथाआस्वाद

देव

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
26 Dec 2023 - 8:15 pm

देव होता, देव आहे, असेल पुन्हा
भावनेच्या ओलाव्यातून रुजेल पुन्हा.

कधी माणसाच्या अंतरंगातून डोकावतो आभाळाच्या सावलीतून पाहील पुन्हा.

नेमके फासे तो फेकतो नेहमी इथे
नेटके दान नशिबी तो देईल पुन्हा .

भक्तिभाव जेव्हा उचंबळून येतो
सुगंध बनून मनातून फुलेल पुन्हा.

माणसाने माणसाशी माणसासम वागणे
माणसातूनच देव जन्माला येईल पुन्हा.

शब्द होता कान्ह्याने गीतेतून पेरला
आज नाही तर उद्या जन्म घेईल पुन्हा.

----अभय बापट

मुक्त कविताकविता

इंदूर - छप्पन दुकान आणि सराफ्याची खाद्य भ्रमंती

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
26 Dec 2023 - 12:53 pm

अगदी नुकतेच इंदूर भटकंती झाली. मांडू, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर सर्व काही पाहिले. पण खास आकर्षण होते ते छप्पन दुकान आणि रात्रीच्या सराफ्याचे. छप्पन दुकान हा छप्पन गाळ्यांचा समुच्चय. छप्पन दुकान दिवसभर सुरु असते. शेवटचे १/२ कपड्यांचे गाळे वगळता इतर सर्व खादाडीचीच दुकाने आहेत. इथले सर्वाधिक खास म्हणजे विजय चाट हाऊस, जॉनी हॉट डॉग आणि बाबू नारियल क्रश.

इंदुरीविरंगुळा

क्षितिजाचे कुंपण

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
25 Dec 2023 - 12:13 pm

बालपण......

साखर झोपेच्या वळणावर
अंदोलत स्वप्न हिंदोळ्यावर
बांग कुणाची येता कानी
विरून गेली सारी कहाणी

तरूणपण......

विझल्या साऱ्या चांदणठिणग्या
बघा बघा ती पहाटफुटणी
छोट्या टीचभर खळगीसाठी
धरावी आता वाट ही कुठली

दगड मातीच्या रस्त्यामधूनी
दिसेल काही अमोघ अद्भूत
धावत होतो उर फुटोस्तर
हाती आले मृगजळ सुंदर

म्हातारपण......

झाली आता चांदणसंध्या
चक्क कळाले भ्रमनिरास होणे
ओलांडून क्षितिजाचे कुंपण
उरले फक्त मार्गस्थ होणे

आयुष्याच्या वाटेवरइशाराचाहूलजाणिवजीवनदृष्टीकोनकविता