श्रीगणेश लेखमाला २०२३ - माझा खत प्रकल्प

निमी's picture
निमी in लेखमाला
21 Sep 2023 - 2:24 pm

माझा खत प्रकल्प

घरातील ओल्या कचऱ्याचं सुंदर गांडूळ खत होतं, हे मला माहीत असूनही त्याचा योग येत नव्हता. खत करण्यासंबंधी एक-दोन छोट्या पुस्तिका वाचनात आल्या होत्या. गांडूळ हा प्राणी तसा अगदी निरुपद्रवी, पण अतिउपयोगी. आवाज नाही, रडारड केकाटणं नाही, खाण्यापिण्याची तक्रार नाही, बाळंतपणसुद्धा अगदी बिनबोभाट. नर-मादी असा भेदभाव नाही. प्रजननाचा ठरावीक काळ नाही.. मादीला भुलवणं, इतर नरांशी स्पर्धा करत हिंसा करणं नाही. तसा अगदी सोपा, सुटसुटीत जीव. तरीही 'गांडूळ' म्हटलं की काहीतरी वळवळल्यासारखं वाटायचं आणि ते खत करणं लांबणीवर पडायचं. गांडूळ हा शब्द का कुणास ठाऊक फारसा देखणा नाही, आणि उच्चारतानाही भारदस्त वाटत नाही. उगीचच काहीतरी घाण वाटतं. तरीही एकदा हा प्रयोग करायचा असं ठरवलं. माझ्या मैत्रिणीने - अलकाने त्यासाठीचं सगळं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तिने मला मोफत प्रशिक्षण, एक-दोन शेणी आणि काही गांडुळंसुद्धा मोफत देण्याचं आनंदाने मान्य केलं.

"हे पाहा, आधी एका बादलीत किंवा डब्यात रोजचा कचरा गोळा करायला लाग. कचरा जमून चांगला कुजला पाहिजे" असा सल्ला दिला. झालं.. कचऱ्यासाठी मी खास मोठा डबा केला. घरातील सर्वांना सांगितलं, "सर्व ओला व सुका जैविक कचरा, जो कुजू शकतो, तो ह्या डब्यातच टाका." भाजीच्या पेंड्या निवडतानाच्या काड्या, मटार-पावट्याच्या शेंगांची फोलपटं, कांदा-लसणाच्या सालीसह कागद, चहाचा चोथा, नारळाच्या शेंड्या, फळांच्या साली डब्यात जमू लागल्या. पाहता पाहता डबाभर केरकचरा सहज जमा झाला. ठरल्या दिवशी सकाळी अलका आली. कुजलेला कचरा पाहून खूश झाली. खतासाठीच्या बादलीला भोकं पाडून त्यात विटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या कशा भरायच्या ते सांगून दुपारी स्वतः गांडुळांसह येण्याचं आश्वासन देऊन गेली. मुलीच्या मदतीने मी विटांचे तुकडे करून, शेंड्या घालून बादली भरून तयार करून ठेवली.

आमची जेवणं करून अलकाची वाट पाहत होते. अलका ठरल्यावेळी आलीच. माझा कुजलेला कचरा पुरेसा जमा झाला असल्याने बादलीत तो घालून वर शेण्या, पाणी आणि तिच्या घरी सुखासमाधानाने नांदणाऱ्या गांडुळांना प्रवास घडवून माझ्या घरी सोडलं. "यांना मुंग्या लागू देऊ नकोस" असं बजावून सांगून ती गेली. दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मी खताच्या बादलीकडे गेले. काळ्या मुंग्यांची भली मोठी रांग लागली होती. अरे देवा...! पहिलीच गांडुळं हुतात्मा झाली की काय असं वाटलं.. पण नाही! पाणी आणि लक्ष्मण रेघेने मुंग्यांनी काढता पाय घेतला.

कचरा वर-खाली करून हवा खेळती कशी करायची, ते आठ दिवसांनी अलकानेच दाखवलं. गांडुळं मजेत असल्याने अलकाही हसली आणि परत गेली. चार दिवसांनी आपणही पाहावं कचरा वर-खाली करून, असं वाटल्याने मी कचऱ्यात हात घातला. गांडुळं गायब! चार दिवसांपूर्वी तर भरपूर होती. 'कुठे गेली सगळी? आता अलकाला काय सांगायचं? साधी गांडुळं पाळायला जमत नाहीत आपल्याला.. छे..छे. काय हे.. दोन मुलींना काय सांभाळणार आपण!' असे विचार मनात आले. आणि इतक्यात.. काय आश्चर्य! आणखी खोल हात घातल्यावर 'गांडूळ संमेलन' असल्यासारखी अनेक गांडुळं एकत्र होती. इतकंच काय.. अनेक जीव तर प्रजोत्पादनाच्या कामात अगदी मग्न असताना मी हे पाप केलं होतं. त्याच क्षणी मला महाभारतातल्या पंडू राजाची आठवण झाली. अनवधानाने त्यानेही कुण्या ऋषीला हरणाच्या रूपात त्या अवस्थेत मारलं असल्याने शाप दिला होता. माद्री आणि पंडूराजाचा झालेला शेवटही आठवला. 'उगीचच या खत प्रकल्पात हात घातला' असं वाटायला लागलं. रात्री तर नवऱ्याकडे पाहतानाही उगीचच धडधडायला लागले. मी दुसऱ्या खोलीत झोपून गेले.

सकाळी उठल्याबरोबर आणखी थोडा कुजलेला कचरा अर्थात गांडुळांचा खाऊ आणि पाणी घेऊन गेले. बादलीला नमस्कार करत सगळ्या गांडुळांची माफी मागितली. झाला प्रकार अनवधानाने घडला असल्याचंही सांगितलं. आमिष, प्रसाद म्हणून कचरा, पाणी घातलं. काहीही ढवळाढवळ न करता त्यांना सुखाने प्रजा वाढवण्याचं आवाहन केलं. मी पूर्वसूचना देऊनच त्यांच्या एकांतात.. तेही केवळ त्यांच्या हितासाठी लक्ष घालेन असं वचनही दिलं. गांडुळं माझ्यावर प्रसन्न झाली. भरभरून वाढणाऱ्या प्रजेने, त्यांच्या मुला-नातवंडांनी बादलीतील कचऱ्याचं खतरूपी सोनं केलं होतं. त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आणि त्या सर्वांच्याच यशस्वी वाटचालीसाठी कचऱ्याची दुसरी बादलीही तयार आहे आणि मी, माझा खत प्रकल्प, माझ्या नवऱ्यासह आनंदात.. समाधानात नांदत आहे.

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

बापरे! भारी प्रकर्ण दिसतंय!

कर्नलतपस्वी's picture

21 Sep 2023 - 4:22 pm | कर्नलतपस्वी

छंद आहे पण गांडूळ खत वापरत नाही.

लेख वाचताना सुर पारंब्या खेळतोय असे वाटले.

महाभारत, पंडू,माद्री ते गांडूळ खत केव्हढे मोठे आंदोलन, बाप रे. मस्तच.

सकारात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद .गांडूळ खत तयार होताना घरातील सर्व बायोडिग्रेडेबल वेस्ट वापरले जाऊन बेस्ट खत होते..शून्य कचरा संकल्पना अजून जमलेली नाही.. पण ओला कचरा 90% वापरला जातो. पर्यावरण पूरक म्हणून आवडला मला हा प्रकल्प.

कर्नलतपस्वी's picture

21 Sep 2023 - 4:22 pm | कर्नलतपस्वी

छंद आहे पण गांडूळ खत वापरत नाही.

लेख वाचताना सुर पारंब्या खेळतोय असे वाटले.

महाभारत, पंडू,माद्री ते गांडूळ खत केव्हढे मोठे आंदोलन, बाप रे. मस्तच.

स्वधर्म's picture

21 Sep 2023 - 6:34 pm | स्वधर्म

असे छोटे छोटे प्रकल्प करणं प्रेरणादायक आहे. प्रकल्पाला खूप खूप शुभेच्छा.

मला स्वतःला खरंच असे छोटे मोठे प्रकल्प करायला मनापासून आवडते. धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल.

अहिरावण's picture

21 Sep 2023 - 7:58 pm | अहिरावण

बराच मोकळा वेळ दिसतोय... चांगलय.. सत्कारणी लावत आहात.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आवड असली की सवड मिळते तसे काहीसे झाले आहे.

प्रयोग चालू द्या. सह्याद्री चानेलवर आमची माती आमची माणसं कार्यक्रम किंवा डीडी किसान इत्यादी कार्यक्रम पाहिल्यास खत कसं करायचं याची कल्पना येईल.
जागा लागते.

माझ्याकडे जागाही नाही आणि बागही मोठी नाही.. गॅलरी मधील मर्यादित जागेत मला हे जमले आहे..म्हणून इतकाच व्याप करते.

स्नेहा.K.'s picture

21 Sep 2023 - 9:32 pm | स्नेहा.K.

गांडूळ खत हा कमी जागेत, कमी त्रासात आणि कमी खर्चात घरातील ओला कचरा जिरवण्याचा उत्तम मार्ग आहे.
अकरावी किंवा बारावीला असताना पर्यावरण विषयाचा प्रकल्प म्हणून छोट्या प्रमाणात घरी गांडूळ खत प्रकल्प केला होता. त्याचा इतका उत्तम रिझल्ट मिळाला की, नंतर घरचा सगळाच ओला कचरा त्यात जिरवून ते गांडूळ खत घरच्याच शेतीत वापरणे, पुढे काही वर्षे चालूच होते.

लोकांना समजावं म्हणून आता बायोडिग्रेडेबल गोष्टींना 'कचरा' म्हणावं लागतं..खरोखर अनेक उत्तम पर्याय आहेत.. आवश्यकता आहे ती थोडी इच्छा, थोडी शक्ती आणि थोडी इच्छाशक्ती!!

Bhakti's picture

21 Sep 2023 - 9:52 pm | Bhakti

कौतुक!
याला vermiculture /environment biotechnology म्हणतात.माझीही खुप इच्छा आहे,असे वेगवेगळे बागकाम प्रयोग करण्याची, लवकर सुरू होवो!

तुमच्या खत प्रकल्पाला शुभेच्छा.. स्वतःसाठीच एक तारीख निश्चित करा, त्याच्या आत हे काम झाले पाहिजे असे स्वतःलाच सांगा.. नक्की होईल.

सौंदाळा's picture

22 Sep 2023 - 5:45 pm | सौंदाळा

एखादा फोटो पाहिजे होता.
चांगला झालेला दिसतोय प्रकल्प. शुभेच्छा

अहिरावण's picture

22 Sep 2023 - 7:09 pm | अहिरावण

हा घ्या !!!!
gandula

आव्वा.. तुम्ही खरंच फोटो शोधून छान टाकलाय.

धन्यवाद.. खरंच प्रकल्प छान झाला आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Sep 2023 - 7:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

गांडुळे पावली म्हणायची!! लेख छानच लिहिलाय.

रच्याकने- एकदा मी पण हा प्रकल्प सुरु केला होता. फक्त कचरा टाकत होतो. १-२ वर्षे त्या डब्याकडे दुर्लक्ष झाले, घरचे ओरडायला लागले. मग होते तितके खत काढुन प्रकल्प बंद केला.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. मलाही घरच्यांचे बोलणे ऐकावे लागते. परंतु थोडे गांडूळांकडे लक्ष देऊन थोडे घरच्यांकडे दुर्लक्ष करावी लागते.

धर्मराजमुटके's picture

22 Sep 2023 - 8:28 pm | धर्मराजमुटके

छान प्रकल्प !
गांडूळ खत कळाले.
कोंबडखत काय प्रकार असतो ? कचर्‍यात कोंबड्या सोडायच्या की कोंबड्यांचा कचरा करुन त्याचे खत करायचे ?

सांगली कोल्हापूर भागामध्ये काही ठिकाणी घरगुती स्वरूपातही कोंबड्या पाळल्या जातात. ज्यांच्या मोठ्या पोल्ट्री आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर नष्ट करावे लागणारे घटक आणि कोंबड्यांमधून पिसांसारख्ये अनेक अवयव हे सेंद्रिय असल्याने त्याचे उत्तम खत तयार होते. त्यामध्ये उष्मांक जास्त असल्याचेही जाणकार सांगतात. रासायनिक खतांना जोड म्हणून शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत वापरले जाते.

शेतकरी एका बाजूला शेड काढून त्यात खत करतात.

कचऱ्याचा ढिगारा पुढेपुढे ओतत जातात. पहिला कचरा खाऊन संपला की गांडुळे पुढे नव्या कचऱ्यात सरकतात. मग मागचा खत झालेला ढिगारा उपसून चाळून खत विकतात. ही सोपी पद्धत वाटते.तसं बंद बादलीत जमवणे अवघड आहे. किंवा एक बादली खत तयार झाले की मग दुसऱ्या नव्या कचऱ्यात ती गांडुळे पहिल्या बादलीतून काढून सोडणे आले आणि ते बाल्कनीत करणे खटाटोप आहे.

गांडूळ खत जमिनीवर करता येत नाही कारण आपण वाढवलेली जोपासलेली गांडुळे जमिनीत निघून जातात. म्हणून गांडूळ खताला हवा खेळती असणारे परंतु बंद पृष्ठभाग लागतो.. बादलीत करताना मला तरी खटाटोप फारसा वाटत नाही परंतु खत तयार झाल्यावर गांडुळे नवीन बादलीत सोडायचे थोडे काम करावे लागते हे मान्य..

विटांचे चर बांधतात. गोठ्यातील शेण,गवतकाडी,ओला पाला वगैरे टाकून गोणपाटाने झाकून हलके पाणी मारून ओलावा ठेवतात. वरून शेडची सावली असतेच. पाऊस,ऊन लागत नाही. बरोबर करतात. गांडूळे पळणार नाहीत अशी बांधणी असते.

मुक्त विहारि's picture

23 Sep 2023 - 5:16 pm | मुक्त विहारि

मस्तच

रंगीला रतन's picture

23 Sep 2023 - 10:06 pm | रंगीला रतन

मस्त लेख.

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2023 - 5:46 pm | चौथा कोनाडा

व्वा, खत प्रकल्पाचा अनुभव खुसखुशीत लेखनात मांडलाय तो आवडला !
लेखन शैली लैच हसवून गेली ! क्या बात हैं ! लिहिते रहा !

आगामी प्रकल्पास आणी पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत !

टर्मीनेटर's picture

25 Sep 2023 - 12:25 pm | टर्मीनेटर

छान लेख! आवडला👍
तुमच्या खत प्रकल्पाला शुभेच्छा!
गांडुळांना तुम्ही खाद्य म्हणुन जो माल-मसाला घालताय त्यात उन्हात सुकवलेल्या अंड्याच्या टरफलांच्या चुऱ्याचा देखिल समावेश करा असे सुचवतो. त्याचे दोन फायदे होतात, एक म्हणजे तयार होणाऱ्या गांडुळ खतात कॅल्शिअमचे प्रमाण वाढेल आणि दुसरे म्हणजे त्याच्या सेवनाने गांडुळांची चयापचय क्रिया सुधारुन त्यांची वाढ (शारीरिक वाढ आणि संख्या दोन्ही) चांगली होइल आणि पुढच्या टप्प्यात 'व्हर्मीवॉश' मिळवण्याचाही प्रयत्न करा.
धन्यवाद.

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .टरफल वाळवून चुरा करून घातली असे कधी केले नाही.. खाली पाणी जमा होते ते वर्मी वॉश का? ते मात्र नियमित झाडांच्या पानांवर मुळांवर घालते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2023 - 1:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. खत प्रकल्प आवडला. आमच्या महाविद्यालयात गांडुळ खताचा प्रकल्प राबवल्या जातो. लहान पॉकेट्समधे भूसभूशीत माती भरुन छोटे पॉकेट्स कधी कधी काही विशेष उपक्रमात विकायला ठेवतात. टपोरे गांडुळ आहेत, ही गांडुळं मी गळासा लावून मासे पकडण्याच्या हेतुने आणली होती, पण ती गांडुळं जगली नाहीत. आता या लेखामुळे पुन्हा एकदा गांडुळ आणून ती आपल्या रोपवाटीकेत ठेवून वाढवावी असा विचार मनात आला आहे. महाविद्यालयाती गांडुळ प्रकल्पाचा फोटो धाग्यात टाकेनच.

पुढीले लेखनासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

टपोरे गांडुळ आहेत, ही गांडुळं मी गळासा लावून मासे पकडण्याच्या हेतुने आणली होती

गावला का मग एक तरी मासा?

ते मासा नव्हे तर मासोळीसाठी गळ लावून बसतात असे ऐकिवात होते मात्र त्यांच्या गळाला मासोळी कधीच लागत नाही असे सूत्रांकडून समजते.

गवि's picture

26 Sep 2023 - 1:42 pm | गवि

ओह नो..

पण त्यासाठी गांडुळे? ईईई sss

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2023 - 1:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>गावला का मग एक तरी मासा?

खोडसाळ मिपाकर मित्रांनी माझ्या ’मासा गावेना’ या धाग्यावर प्रश्न विचारावेत.
चांगल्या धाग्यावर अवांतराचे दळण दळू नये ही नम्र विनंती.

-दिलीप बिरुटे

तिकडे जाऊन आलो. मासे नाही पण विनोदी प्रतिसाद खाल्ले. तुमचे फालोइंग बरेच आहे. गुरुजींनीही एक युक्ती दिली हे बरेच झाले.

अहिरावण's picture

26 Sep 2023 - 7:39 pm | अहिरावण

>>>खोडसाळ मिपाकर मित्रांनी माझ्या ’मासा गावेना’ या धाग्यावर प्रश्न विचारावेत.

मी खोडसाळ नाही. त्यामुळे इथेच विचारतो - मासोळी(ळ्या) गावल्या का?

- खो डॉ उगीच चिमटे

हेतू गांडूळांना वेळीच कळल्याने त्यांनी आधीच प्राण त्यात केला

धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल..गांडूळांनी आधीच जीवदान केले.. त्यांना बहुतेक मासेमारी करता होणाऱ्या त्यांच्या जल समाधीची कल्पना आली असावी.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. गांडूळांनी आधीच जीवदान दिले. त्यांना बहुतेक तुमच्याकडून मासेमारीसाठी जलसमाधी मिळणार याची कल्पना आली असावी.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. गांडूळांनी आधीच जीवदान दिले. त्यांना बहुतेक तुमच्याकडून मासेमारीसाठी जलसमाधी मिळणार याची कल्पना आली असावी.

सौन्दर्य's picture

26 Sep 2023 - 11:13 pm | सौन्दर्य

उपक्रम आणि लेख दोन्ही उत्तम.

टाकावुतून टिकाऊ कसे करायचे ह्याचे चांगलेच उदाहरण आहे हे.

एक प्रश्न - ह्या प्रोसेसमध्ये कुजका वास येतो का ?

खरंतर गांडूळांसाठी कुजलेला कचरा जास्त योग्य.. त्याचे खत तयार ते करतात.. खताचा खराब वास तर नाहीच.. उलट अत्यंत छान, निसर्गात येतो तसा मस्त वास येतो खताला..

घरच्यांना बहुतेक नाही येत पण शेजारणीला जरूर येतो.....

शेजारणीला तर नाहीच त्या कचऱ्याच्या बादली शेजारी बसून सुद्धा अजिबात येत नाही.. आणि हो मला सर्दी पण झालेली नाही.. कर्नल साहेबांना नाही पण अन्य कोणाच्याही मिपाकरांच्या सुपीक डोक्यातील भविष्यातील शंकेचे आधीच उत्तर दिले.

वासाची शंका तर आहेच. शंका कसली, खात्रीच आहे. विशेष करून जर गॅलरी, बाल्कनी अशा जागी हे प्रकरण ठेवले असेल तर अगदीच सज्जड शंका. आमच्या कार्यालयाच्या बेसमेंटमध्ये एका कोपऱ्यात यासदृश कचऱ्याचे खत करणारे काहीतरी खड्डारुपी आहे. ते झाकलेले असूनही पार्किंगच्या त्या भागात नाक मुठीत धरून जावे इतकी दुर्गंधी असते. उकिरड्यातून पावसाळ्यात चालत जावे तशी. कधी एकदा वाहन बाहेर काढतो असे होते. वाहनात देखील तो वास घुसून बसतो.

याहून अधिक शंका मला हे वळवळणारे जीव घरात, बाथरूम, किचन, इकडे , तिकडे पसरणे याची येते.

असे काही खत प्रकल्प वगैरे घरात नसतानाही पावसाळ्यात कुठून कोण जाणे, बाथरूम आणि इतरत्र गांडुळे प्रविष्ट होतात. असो. नकोच तो विषय. कितीही प्रयत्न केले तरी या जंतसदृश प्राण्यांशी मैत्री करता येत नाही. यक्क.

ते निसर्गात सुखाने नांदोत. शेतांना समृद्ध करोत. पण बाल्कनीत दे आर नॉट वेलकम.

प्रचेतस's picture

27 Sep 2023 - 11:14 am | प्रचेतस

त्यापेक्षा एक दोन गांडुळे पकडून गळाला लावून मासोळी गावतेय का बघा, न जाणो तुम्हाला तरी यश येईल.