साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)
प्रिय ताई,
माझ्या डोक्यातून (भूत कॉस्टींगचे...) काही उतरत नाही. आता तर सगळेच जण भुतांबद्दल न भिता काहीतरी लिहीत आहे. म्हणून मी पण माझ्या घंद्यातून वेळ काढून हे पत्र लिहून तुझा वर्तमानपत्रातून जाहीर सल्ला मागत आहे. तु इतर टाईमपास सल्ल्याप्रमाणे मला सल्ला देणार नाही ही अपेक्षा बाळगून आहे. असो. (मला माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राची पाल्हाळ लावायची सवय लागली आहे. आता दिवाळीपर्यंत देवळात तो माझ्याशेजारीच बसणार आहे. ईंग्रजी शब्द मारून तो जास्त कमाई करतो. (हे हल्ली असे होते.) तर पुन्हा असो.)
आता भादवा संपला, म्हणजेच पित्तरपाटाही संपला. परत जेवणात कॉस्ट कटिंग करावी लागत आहे. मी नेहमी जाड जाड जिन्स पँन्ट घालतो. माझ्या लाईफस्टाईल मध्ये अजून काही कॉस्ट कटिंग करता येईल का असे माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राला विचारले असता त्याने कपडे धूण्यावर जास्त मेहनत न घेण्यास सांगितले. असेही मला घंद्यासाठी कपडे मळकेच घालावे लागतात. त्याचे मी बर्याचदा एकतो तरी पण आपला सल्ला घ्यावासा वाटला म्हणून हे पत्र लिहीत आहे.
तर जिन्स कपडे न धुतले न ईस्त्री केले तर पैसे वाचतात का? माझ्या आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राने पण असेच काहीतरी वेबसाईटीवर वाचले होते असे तो म्हणत होता. ताई, तुझा काय सल्ला आहे?
ताईचा सल्ला:
अरे दादा, तु फारच चांगला सल्ला मागितला आहेस. तुझ्या विचारण्याने अनेक लोकांचाही फायदा होईल. अरे परदेशात जिन्स शर्ट, पॅन्ट, जिन्स कपडे महीना महीना न धुण्याची व ईस्त्री न करण्याची फॅशनच आली आहे. तसेच युनायटेड नेशन्स एन्व्हारमेंट प्रोग्राम ने (United Nation Environment Program= UNEP) तर यावर एक अॅड्व्हर्टाईज पण तयार केली आहे. ती तू तुझ्या आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राबरोबर बघ. हि बघ त्याची लिंक. http://www.youtube.com/watch?v=vYprgHH7Zrw हि पण बघ. http://www.grist.org/article/un-says-dont-iron-your-jeans आणि हि पण बघ http://udtacheetah.targetgenx.com/never-wash-your-jeans/
अरे, या मुळे पाणी, विज तुझी मेहनत वाचेल. तुझ्या धंद्याला हे फार गरजेचेच आहे. त्यामूळे पर्यावरणावरचा ताण वाचेल. तू हा सल्ला तुझ्या ईतर मित्रांनापण दे, म्हणजे काहितरी समाजीक काम केल्याचे पुण्य तुझ्या पदरात पडेल.
असेच काही प्रश्न तुला पडलेले असतील तर बेधडक विचार. अरे हे वर्तमानपत्रातील "ताईचा साप्ताहिक सल्ला" हे सदर तर तुमच्यासाठीच सुरू केले ना? यात नाव पण गुप्त ठेवले जाते.
विचारशील ना पुढचा सल्ला? जरूर विचार. ( आमचे संपादक तात्या हे सदर बंद करायचा विचार करत आहे, त्यामूळे तु तर आठवड्याला काहितरी जरूर विचारत जा.)
तुझीच ताई.
प्रतिक्रिया
23 Sep 2009 - 11:07 am | अवलिया
तुम्ही आधी कोणत्या संकेतस्थळावर ताईचा की काकुचा सल्ला द्यायचे हो?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 12:30 pm | पाषाणभेद
आधी एका रशीयन देवदेवस्की या संकेतस्थळावर ताईचा सल्ला द्यायचो, म्हणून देवळाच्या स्थळावर बसण्याची वेळ आली तरी वळ जात नाही अजून. मधून मधून उकळी येतेच.
आणि आहो जावो करू नका.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
23 Sep 2009 - 2:54 pm | पाषाणभेद
प्रकाटाआ
23 Sep 2009 - 3:46 pm | JAGOMOHANPYARE
प्रिय ताई,
तुला कसे विचारू मला समजत नाही आहे... माझा प्रश्न खूप नाजूक आहे... मिपावर हल्ली लोक भुतोळ्या लिहित आहेत..... ... तू कॉस्टिन्गच्या भुताबाबत बोलते आहेस, पण मला भुताचेच कॉस्टिन्ग करून हवे आहे...
१. एक भूत असणारी भुतोळी लिहायला साधारण किती कॉस्ट लागते.
२. भुतोळीमध्ये वड, पिम्पळ, सागवान, लिम्ब यापैकी कोणते झाड वापरावे?
३. खवीस, हडळ, भूत, आग्या वेताळ यापैकी स्वस्त पर्याय कुठला?
एका खवीसीवर एक हडळ एकाच कथेत फ्री देणे चान्गले की एक ख्वेसाची व एक हडळीची अशा दोन कथा पाडणे चान्गले?
४. पान्ढर्या कपड्यातली मेणबत्त्यावाली बाईसाठी मेणबत्ती कुठल्या कम्पनीची वापरावी? तिचा ( म्हणजे मेणबतीचा ! आयला, भुतीणीला तरी सोडा की राव!) घेर किती असावा?
तुझा..
भूतपापेश्वर..
23 Sep 2009 - 6:15 pm | पाषाणभेद
अरे भूतपापेश्वर दादा,
"असेच काही प्रश्न तुला पडलेले असतील तर बेधडक विचार. अरे हे वर्तमानपत्रातील "ताईचा साप्ताहिक सल्ला" हे सदर तर तुमच्यासाठीच सुरू केले ना? यात नाव पण गुप्त ठेवले जाते."
हे तू वाचले नाहीस का?
तसेच ३०० च्या वर वाचनाचे हे सदर असतांना याला आजकाल प्रतिसाद येत नाही. लोक फक्त वाचून जातात व प्रतिसाद काही देत नाही. मुंबईत अपघातानंतर कसे लगेच तेथून काढता पाय घेतात व चालू लागतात तसे लोक फक्त हे सदर वाचतात व चालू पडतात. पण ते लाजतात व या सदरात आपले नाव टाकत नाही.
त्यांच्या मनातही असले नाजूक व गोडगोड प्रश्न विचारायचे असतात पण लोकलाजेस्तव विचारत नाही. संपादक तात्या माझा फोन नं. पण देवू देत नाही.
म्हणून मी हे सदर बंद करायचा विचार करत आहे, त्यामूळे तु काहितरी विचारले आहे त्या बद्दल धन्यवाद. (मला प्रश्न विचारणार्या एका भिकार्याची पाल्हाळ लावायची सवय लागली आहे. ) असो.
एक सांगते, मी कॉस्टिन्गच्या भुताबाबत बोलते नाही. मला तो प्रश्न विचारलेला होता.
आता तुझे प्रश्न व माझी उत्तरे:
१. एक भूत असणारी भुतोळी लिहायला साधारण किती कॉस्ट लागते.
उत्तर: हा प्रश्न येथे लागू नाही. त्या साठी मिपावरील सदर वापरावे. तेथे भुतोळी लिहीणारे तसेच बाहेरचे बघणारे मांत्रीक आहेत.
२. भुतोळीमध्ये वड, पिम्पळ, सागवान, लिम्ब यापैकी कोणते झाड वापरावे?
उत्तर: हा प्रश्न मी आउटसोर्स केला आहे. त्याचे उत्तर आल्यास मी तेथे उत्तर लिहीन.
३. खवीस, हडळ, भूत, आग्या वेताळ यापैकी स्वस्त पर्याय कुठला?एका खवीसीवर एक हडळ एकाच कथेत फ्री देणे चान्गले की एक ख्वेसाची व एक हडळीची अशा दोन कथा पाडणे चान्गले?
उत्तर: अताशा भुते बाजारात एकास एक फ्री भेटतात. एक कुटूंब असेल तर हडळ, नवरा भूत, मूंजा, सासू-सासरे भुत ईतके एकाचवेळी तयार असतात. त्यामुळे थोडा रेट जास्त पडल्यासही हे परवडते. मिपावरचे बरेच जण हा घाउक पर्याय स्विकारतात. आम्ही या घंद्यात नाही पण ह्या प्रश्नासाठी कंत्राटदारांना विचारले आहे.
४. पान्ढर्या कपड्यातली मेणबत्त्यावाली बाईसाठी मेणबत्ती कुठल्या कम्पनीची वापरावी? तिचा ( म्हणजे मेणबतीचा ! आयला, भुतीणीला तरी सोडा की राव!) घेर किती असावा?
उत्तर: मेणबत्ती "दो मछली" या कंपनीची असल्यास उत्तम. तसे आमचे या कंपनीशी काही व्यावसाईक संबंध नाही, पण कंत्राटदारांकडल्या एका एकाकी तरूण विधवा हडळिला विचारले आहे. "दो मछली" या कंपनी वाले साईझमध्ये कट मारत नाही असे तिच्याकडून समजले. घेर व लांबी योग्य असते. तसेच ती इमर्जंसीत कामात येते असे तीचे मत आहे. (लाईट गेल्यास.)
बाकी तुला रे मेणबत्तीची काय गरज लब्बाडा? अं? नाही घेर वैग्रे वैगे विचातोस म्हणून विचारले हो. काही गडबड नाही ना रे तुझ्यात.
प्रश्न खूप नाजूक नाजूक विचारतो आहेस हल्ली.
धिर सोडू नकोस. हिंमत धर व काही अडले तर प्रश्न विचार.
फक्त तुझीच,
सार्वजनीक सामुपदेशक ताई.
-----------------------------------
23 Sep 2009 - 3:55 pm | सखाराम_गटणे™
भुताला मारायला चांडीच्या गोळ्या का वापरतात?
24 Sep 2009 - 7:44 am | पाषाणभेद
दादा,
प्रश्न फारच त्रोटक आहे. सविस्तर लिहीलेस की उत्तर देता येईल.
फक्त तुझीच अन तुझीच ,
सार्वजनीक सामुपदेशक ताई.