तू जीव माझा -
तू प्राण माझा -
घ्यावया
नच होतीस आली
मालूम होते मला
शौच्यालयात घुसता
मग सावरून बसता
मोबाइलात रमता
आलीस तू अवचिता
जवळि जवळ येता
मग कडकडून डसता
मम उष्ण रक्त प्रशिता
मेरा चैन-वैन सब लुटिता
वाजवून टाळिका
मी जीव तुझा - मी प्राण तुझा
- हरिला -
अल्विदा मच्छरिनी -
अल्विदा.
प्रतिक्रिया
29 Mar 2021 - 6:41 pm | प्रचेतस
कहर =))
29 Mar 2021 - 9:51 pm | खेडूत
:))
म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!
30 Mar 2021 - 6:05 pm | चित्रगुप्त
@ प्रचेतस, खेडूत
अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.
30 Mar 2021 - 6:46 pm | चौकटराजा
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! )))))
आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!
30 Mar 2021 - 7:01 pm | चित्रगुप्त
@चौकटराजा
चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार.
कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले :
'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन :
अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके
29 Mar 2021 - 10:03 pm | शशिकांत ओक
मस्त रचले गेले आहे.
पिपात पडलेल्या उंदराच्या काव्यातील आर्तता जाणवली.
29 Mar 2021 - 11:27 pm | गणेशा
वाजवून टाळिका
मी जीव तुझा - मी प्राण तुझा
- हरिला -
अल्विदा मच्छरिनी -
अल्विदा.
हा हा हा
भारी
30 Mar 2021 - 6:08 pm | चित्रगुप्त
@ शशिकांत ओक, गणेशा
बाष्कळ लेखनाचीसुद्धा दखल घेतल्याबद्दल अनेक आभार.
30 Mar 2021 - 12:29 am | खिलजि
अन घनघोर आशय
परमानंदी जीव घेणे
ईश्वराला मान्य आहे
ढकलता ढकलता मच्छर मारणे
हीपण एक कला आहे
30 Mar 2021 - 6:13 pm | चित्रगुप्त
@ खिलजी
तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.
30 Mar 2021 - 11:27 am | ज्ञानोबाचे पैजार
तेवढं तिकडे बसून,
मोबाईल हातात धरुन,
पाण्यात न पाडता,
टाळी कशी वाजवायची?
त्याचा व्हिडिओ टाका
"टच" स्क्रिन मोबाईल
कसा वापरायचा?
ते ही शिकवा,
अनेक गरजू लोकांचे
आशिर्वाद मिळतील
पैजारबुवा,
30 Mar 2021 - 6:34 pm | चित्रगुप्त
@ पैजारबुवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड"

मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा:
आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.
30 Mar 2021 - 6:50 pm | टवाळ कार्टा
=))
1 Apr 2021 - 6:58 am | तुषार काळभोर
अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते.
घाईघाईत क्लिक केलं अन्....
साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!
1 Apr 2021 - 9:04 pm | राघव
भारीच..
बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))
17 Dec 2022 - 11:38 am | कर्नलतपस्वी
अवचिता गुणगुणू
ङंकिता कळवळू
मी म्हणे गोपाळू
कोठूनी आली गे
सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.
18 Dec 2022 - 2:45 am | चित्रगुप्त
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत.
'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला.
मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक.
आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक.
'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा:
कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी
कंपूबालिका, कंपूचालिका
कंपूचारिणी, कंपूविचरिणी,
कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका
कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी
कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी
कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता
कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी
कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी,
कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी
कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना
कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी
कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता
कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी
कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता
कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा
तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी:
मग स्मरून 'हरि'ला -
वाजवून टाळिका -
मी जीव तुझा - मी प्राण तुझा -
'हरिला'
- अल्विदा मच्छरिनी
- अल्विदा !
18 Dec 2022 - 12:21 pm | शशिकांत ओक
व्यंग काव्य रंगले...

कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे...
आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे
पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो...
मग फवार्याशी झगडुनी जीव देतो...
किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ...
हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार...
मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार
आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार
म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा...
जहन्नम मधेही असे आमची शाखा
18 Dec 2022 - 1:51 pm | चित्रगुप्त
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.
18 Dec 2022 - 2:31 pm | शशिकांत ओक
आणि चावायच्या आधी कुठे झोप घेतात? जगतात किती दिवस?
15 Apr 2025 - 5:51 pm | चित्रगुप्त
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review:
This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor.
Would you like me to add or modify anything in this review?
एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?
19 Apr 2025 - 5:32 pm | शशिकांत ओक
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे!
या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात.
"किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे.
पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात!
"आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे.
कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो.
एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!