काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जनातलं, मनातलं
8 Dec 2020 - 2:19 pm

हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....

वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन.....
######
जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई पियक्कड माणूस. त्यांच्या बाटलीतुन आज्जी पण प्यायची. आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. एवढे बेवडे येणार म्हणजे महीन्याचं दारूचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा गुत्तेवाला पास्कल उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही. बेवडे म्हणजे जीवाला घोर. तोंड दाबून चखण्याचा मार.

आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही. आत्या येणार म्हणजे सकाळी लवकर प्यायला मिळणार. आत्याचा नवरा मोठ्ठा पेताड. घरची दारूभट्टी. मराठवाड्यात अट्टल दारुड्याला पेताड म्हणायचे. बुधवारपेठेतल्या घरातून रस्त्यावर उभं राहीलं की चमेलीच्या घरापर्यंतचा रस्ता दिसायचा. पोरं आळीपाळीनी रस्त्यावर उभी रहायची. जीपडं येताना दिसलं की आनंदानी नाचायला सुरुवात.
बेवडे येणार म्हटल्यावर बहीणी मात्र मुक्या व्हायच्या. चार दिवसात कामानी पिट्ट्या पडायचा.

बहीणी सगळ्या आमच्यापेक्षा मोठ्या. आईच्या मदतीला सैपाकघरात. दप्तरं गुंडाळून ठेवायची. शाळेला नाही गेलं तरी चालायचं.
जीपड्यातून आजी पायउतार झाली की तिची पिशवी , गाठोडं घ्यायला आम्ही पुढे. गावठी दारूची ट्यूब एकाच्या हातात , दुसर्‍याच्या हातात इंग्लिशच्या बाटल्यांची पेटी. मग आत्याचा पेताड नवरा. सगळ्यात शेवटी आत्या उतरायची. वडील आपल्या हातानं पहिल्या धारेची पावशेर पाजून आत्याच्या नवर्‍याचं स्वागत करायचे. बाहेरच्या खोलीत सतरंजीवर मोठी माणसं ऐसपैस पसरायची.

आजी आणि आत्या मधल्या खोलीत .आम्ही पोरं आजीचं गाठोडं सोडवण्याच्या मागे. अफूची बोंडं आणि तुरीच्या शेंगा , गाजरं, मटाराच्या शेंगा, आंबट बोरं असा ऍसॉर्टेड चखणा बाहेर पडायचा. दारूच्या ट्यूबला हात लावायची डेरींग नसायची. मग आजीच मेहेरबान होऊन एकेक नौटाक कपात भरून आमच्या हातात दयायची. थंडीनी ओठ उलून गेलेले असायचे. आंबुस दारूनी ओठ चुरचुरायचे. पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
दारूचे ग्लास बाहेरच्या खोलीत गेले की पिण्यासाठीची हाकाटी सुरु व्हायची. आत्या सैपाकघराच्या बाहेरच्या उंबरठ्यावर विडी ओढत बसायची. हातात मशेरी घेऊन दात घासत बसायची. आई दादासाहेबांसाठी ताटात गरम वजडी काढायची. चखण्यासाठी वजडी. कलेजी, नळ्या असा काही प्रकार नसायचाच. दादासाहेब प्यायला बसले की बायका तात्पुरत्या बाहेर विड्या फुंकत बसायच्या.

आत्या बहीणींच्या हातात रिकामा ग्लास देऊन म्हणायची माझा पेग भरा गं पोरींनो. असली कामं करायला मुली नाराज असायच्या. पण सांगणार कुणाला?
घरात बाटली एकच. जी.एम संत्रा. आत्या फणफणायची.
काय बाई देशी दारू देता पाहुण्याला असं म्हणायची.
आपली पेटी उघडून व्हिस्कीची बाटली काढायची. पेग भरून झाल्यावर बाटली परत पेटीत जायची.
पेग भरण्यासाठी बाटली उघडली की व्हिस्कीचा सुगंध दरवळायचा. मुली उत्सुकतेनी पुढं व्हायच्या पण आत्या पटकन बाटली बंद करायची.
आता त्या वेळी नशा-पाण्यासाठी आमच्या घरात असणार काय. जी.एम संत्राची बाटली, मशेरी, तपकीर, तम्बाकुची पुडी आणि चुन्याची डबी, विडी बंडल. संपलं या पलीकडे काही नसणार .कुठल्याच घरात नसायचं.मुलींना उत्सुकता त्यातच असायची.....
###
आता पळा.....

धोरणनृत्यसंगीतवाङ्मयबालगीतविडंबनगझलउखाणेवाक्प्रचारव्युत्पत्तीसुभाषितेविनोदआईस्क्रीमउपहाराचे पदार्थकैरीचे पदार्थग्रेव्हीपारंपरिक पाककृतीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमायक्रोवेव्हराहती जागावन डिश मीलशेतीसिंधी पाककृतीफलज्योतिषशिक्षणछायाचित्रणस्थिरचित्रप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

8 Dec 2020 - 4:24 pm | आनन्दा

बोंबला...

पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

अथांग आकाश's picture

8 Dec 2020 - 5:29 pm | अथांग आकाश

+१ असेच म्हणेन!
विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!!
द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__
.

विजुभाऊ's picture

8 Dec 2020 - 8:35 pm | विजुभाऊ

हेच म्हणायचे आहे

नावातकायआहे's picture

8 Dec 2020 - 5:55 pm | नावातकायआहे

ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Dec 2020 - 10:37 am | ज्ञानोबाचे पैजार

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते.
पैजारबुवा,

विनायक प्रभू's picture

8 Dec 2020 - 6:07 pm | विनायक प्रभू

काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.

गड्डा झब्बू's picture

10 Dec 2020 - 11:59 am | गड्डा झब्बू

काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.

त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

तर्कवादी's picture

5 Feb 2022 - 11:30 pm | तर्कवादी

तुमचे विडंबन आवडले.
मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस's picture

8 Dec 2020 - 6:59 pm | कंजूस

नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि.
पण प्रयत्न बरा आहे.

मोकलायादहीदिश्या चे विडंबन करुन दाखवा.
चॅलेंज अ‍ॅक्सेप्ट करताय का?

विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे.
त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता.

त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे.

निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे
ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे
ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी
बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी
रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख
तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख
.
.
.

आणि हि लिंक...

https://www.misalpav.com/node/44300

Yogesh Sawant's picture

9 Dec 2020 - 10:23 am | Yogesh Sawant

येकच नंबर झालंय.
लिहिते राहा.

रंगीला रतन's picture

9 Dec 2020 - 10:33 am | रंगीला रतन

भन्नाट विडंबन. हहपुवा :-) :-)

सुचिता१'s picture

9 Dec 2020 - 2:03 pm | सुचिता१

नाही आवडले ... काही कलाकृती विडंबना साठी नसतात.

गड्डा झब्बू's picture

10 Dec 2020 - 12:06 pm | गड्डा झब्बू

नाही आवडले ...

चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!

काही कलाकृती विडंबना साठी नसतात.

त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही.....
रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

शामच्या आई कृतीचंही विडंबन झालं. शामची मम्मी. विडंबन जुन्या कृतीकडे घेऊन जातंच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Dec 2020 - 8:27 am | ज्ञानोबाचे पैजार

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची.

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Dec 2020 - 8:49 am | ज्ञानोबाचे पैजार

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची.

पैजारबुवा,

मराठी_माणूस's picture

10 Dec 2020 - 9:12 am | मराठी_माणूस

विडंबनाची काही ठीकाणी एक काही ठीकाणी दुसरी मतं बघुन गमत वाटली

आनन्दा's picture

10 Dec 2020 - 10:26 am | आनन्दा

बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो -

काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे..
एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो..
म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

प्रचेतस's picture

10 Dec 2020 - 10:55 am | प्रचेतस

विडंबन एकदम भन्नाट जमलंय.
मजा आली.

ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला!
काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस's picture

10 Dec 2020 - 5:35 pm | मराठी_माणूस

विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे.
इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे.
तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते.
कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

अथांग आकाश's picture

10 Dec 2020 - 7:55 pm | अथांग आकाश

हे हि बरोबर आहे! आमची जास्ती भावनिक गुंतवणूक झाली असेल त्या कथेत!!
god knows

कुमार१'s picture

11 Dec 2020 - 8:23 am | कुमार१

विडंबन छान.

टर्मीनेटर's picture

11 Dec 2020 - 10:54 am | टर्मीनेटर

पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.

गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो.
मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀
पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव!

(स्वर्गवासी) टर्मीनेटर

जव्हेरगंज's picture

14 Dec 2020 - 1:19 pm | जव्हेरगंज

=)))))))))))))))))))))))))))))))))))))

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

1 Feb 2022 - 10:23 am | ॲबसेंट माइंडेड ...

भारीच! खुप हसलो.

रंगीला रतन's picture

1 Feb 2022 - 10:48 pm | रंगीला रतन

भंकस आवडत नसेल त्यांनी विडंबन वाचू नये :=)
आपल्याला मूळ कथा आणि विडंबन दोन्ही आवडते.

चौथा कोनाडा's picture

2 Feb 2022 - 6:02 pm | चौथा कोनाडा

एक नंबर विडंबन !
+१
ज्याम हसलो, लै हसलो !
गड्डा झब्बू _/\_

कर्नलतपस्वी's picture

10 Mar 2023 - 7:45 pm | कर्नलतपस्वी

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते.

गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते.

मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो

भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा.

व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे.

मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो.

मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.