राजन नागेन्द्रा
आज राजन नागेन्द्रा जोडीतले राजन निर्वतले अशी बातमी आहे. त्या आधी एस पी बालासुब्रह्मण्यम गेले. स्वर्गात असा काय अचानक दुष्काळ पडला आहे की सुमधूर गाण्यांनी कान तृप्त करणारे हे स्वर्गिय लोक देव वर घेऊन चालला आहे.
आज राजन नागेन्द्रा जोडीतले राजन निर्वतले अशी बातमी आहे. त्या आधी एस पी बालासुब्रह्मण्यम गेले. स्वर्गात असा काय अचानक दुष्काळ पडला आहे की सुमधूर गाण्यांनी कान तृप्त करणारे हे स्वर्गिय लोक देव वर घेऊन चालला आहे.
*माणुसकी*
बदलापूर स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पहात उभी होते. दादर ला जायचं होतं. एका मैत्रिणीकडे सगळ्याच जमणार होतो, जवळजवळ चार वर्षांनी भेटून अख्खी रात्र गप्पा, गाणी असा बेत होता. एक मैत्रिण दादर स्टेशनवरच भेटणार होती. खुप उत्साही वाटत होतं सगळ्या भेटणार म्हणून.
तेवढ्यात बदलापूर लोकल आलीच. लेडीजच्या मधल्या डब्यातून सगळी बायकांची गर्दी चिवचिवत बडबड करत उतरली. मग चढणा-या बायका, मुली घाई न करता सावकाश चढल्या. मी हल्ली नोकरी सोडल्यापासून प्रवास करत नाही लोकलने. त्यामुळे अशी ही दुपारची वेळ मला फारच आवडली होती प्रवासासाठी.
माझा डबा
आपलं बायकांचं कसं असतं ना..अपल्या घरातल्या चमच्यांपासून डबे, वाट्या, ताटं, ताटल्या सगळ्यांत जीव गुंतलेला असतो. त्यातून सगळं स्वतः घेतलेलं असलं तर जास्तच आणि माहेरहून मिळालेलं असेल तर मग विचारायलाच नको.
आणि ह्यातलं काही कोणाला दिलं गेलं तर परत मिळेपर्यंत जीव कित्ती कासावीस झालेला असतो नाही? झालं असं..
घरटं
त्या दिवशी खिडकीतुन बाहेर सहज लक्ष गेलं तेव्हा जाणवलं...समोरच्या झाडावर फांद्यांच्या बेचक्यात घरटं दिसतय कोणाचंतरी..मोठ्या खोल बशीसारखं होतं ते वाळलेल्या काड्या- कुड्यांचं. दिवसभरात मुद्दाम अधुनमधून बघितल्यावर एक-दोनदा कावळा (किंवा कावळी) त्या घरट्यावर बसलेला दिसला. म्हणजे या वेळी कावळ्याने बांधलं वाटतं घरटं..चिमण्यांची असतातच घरटी, एक-दोनदा बुलबुल आणि सूर्यपक्ष्याचं पण घरटं होतं या झाडावर. चला म्हणजे आता एक छान चाळा मिळाला . अधुनमधून निरिक्षण करण्यात छान वेळ जाईल. उन्हाच्या शांत दुपारी हा निरीक्षणाचा छंद खुप आनंद देतो मनाला.
गंप्या ची वसाहत
"भारत माता की जय ..." "भारत माता की जय " कचेरीच्या चारी बाजूने लोक गोळा झाले होते. क्षणाक्षणाला गर्दी आणि त्याचे रौद्ररूप वाढत चालले होते. जॉर्जचा एक शिपाई आधीच मरून पडला होता. त्याच्या मरणाला कारणीभूत ठरलेला दगड त्याचाच बाजूला रक्ताने लडबडलेला होता. कचेरीच्या मुख्य दरवाज्यावर लाथाडलेल्याचा आवाज येत होता. जॉर्जची नजर त्या दरवाज्यावर खिळून होती. शिपायांनीही आपापल्या बंदूका दरवाज्याकडे रोखल्या. अखेरीस तो दरवाजा तुटतो न तुटतो तोवर लोकांचा एक गट आत घुसला आणि शिपायांनी नेम साधला. शिपाई बंदूक पुन्हा तयार करेपर्यंत लोकांचा दुसरा गट आत घुसला. त्यांनी त्या शिपायांच्या बंदुका हुसकावल्या.
झोपाळ्याचा कुरकुरणारा आवाज अजूनही अंगणातून येत होता. मध्यानापासून आता सांजवेळ होत आली तरी गोपाळराव अजूनही झोपाळ्यावर तसेच बसले होते. झोपाळ्याच्या नक्षीदार लाकडी खांबावर मुंग्यांची रांग थबकत चालत होती. गोपाळराव मात्र आपल्या धोतराकडे रोखून बघत बसले होते.धोतरावरचा परवाचा दौतीचा निळा डाग अजूनही तसाच होता. त्या डागाशेजारीच आज नवीन डाग पडला होता. गर्द लाल रंगाचा तो उठून दिसत होता. खांबावरची एक मुंगी गोपाळरावांच्या हाताला डसली आणि त्याची तंद्री मोडली.
अफझलखानः-
अफझलखान हा मुळचा अब्दुल्लाखान.एका भटारीण बाईचा मुलगा.पण आपल्या अंगभुत गुणाने आणि पराक्रमाने तो मोठा झालेला होता. अफझलखान हि त्याला विजापुर दरबाराने दिलेली पदवी होती. स्वभावाने अत्यंत क्रुर असा हा ईसम.कपट आणि दगाबाजी हि त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच होती. ज्या शहाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून बसवपट्टणची लढाई जिंकली त्या शहाजी राजांना जिंजीच्या वेढ्यात कैद करताना त्याचे हात जराही थरथरले नाहीत.
*दोन घडीचा डाव...*
- डॉ. सुधीर रा. देवरे