ज्याचे करावे भले..
मी आजवर अनेकजणांना आर्थिक आणि इतरही मदत केली आहे. मला बऱ्याच वेळा यश आले पण जास्त वेळा वाईट अनुभव आले. त्यातले नमुन्यादाखल अगदी थोडे किस्से सांगावेसे वाटतात.
मी आजवर अनेकजणांना आर्थिक आणि इतरही मदत केली आहे. मला बऱ्याच वेळा यश आले पण जास्त वेळा वाईट अनुभव आले. त्यातले नमुन्यादाखल अगदी थोडे किस्से सांगावेसे वाटतात.
घात (कथा)
आषाढाच्या सरी थांबायचे नाव घेत नव्हत्या. तरी अश्या पर्जन्यकाळात कान्होजी जेधे लगबगीने राजगडाच्या पायर्या चढत होते. पाली दरवाज्याने आत येउन त्यांनी तातडीने सदर गाठली आणि आत सांगावा दिला. पहारेकर्याच्या वर्दीनंतर कान्होजी अंग पुसून आत गेले आणि राजांना मुजरा घालून सदरेवर टेकले.
"इतक्या तातडीने येणे केलेत कान्होजी काका ! काही विशेष ?" राजांनी पृच्छा केली.
एक दिवस आम्हाला गोड बातमी मिळाली. आम्ही दोघेही खूष होतो. माझी नोकरी सुरूच होती. नवरा जमेल तशी माझी कळजी घेत होता. आता माझा दवाखान्याचा, खाण्यापिण्याचा वगैरे खर्च वाढला होता. पण नवरा काही कमी पडू देत नव्हता. त्याचीही खरेतर ओढाताण सुरू होती. मंदीमुळे बरेच दिवस पगारवाढ झाली नव्हती. तरीही आम्ही काटकसरीने पण आनंदाने राहत होतो. पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागले, तशी मला चिंता भेडसावू लागली. कारण आईवडिल अलिकडे महिना दिडमहिना फोनसुध्दा करत नव्हते, माझ्या तब्येतीची विचारपूस तर दूरच राहिली.
'पार काळाझारंय पोरगा! पण काय करायचं आता? ती म्हणते शिकलेलाय! मग कसंतरी उरकून टाकायचं, जाऊदे मरूदे एकदाचं!' आई माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत, मला तिडिक जाणवेल इतक्या तुच्छतेने, बाहेरच्या खोलीत बसून शेजारच्या काकूला सांगत होती. मी आत पोळ्या करताकरता ऐकत होते. मला आईचा राग करावा की, कीव करावी की, स्वतःच्या नशिबाला दोष द्यावा हेच कळेना! अन माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले!

- डॉ. सुधीर रा. देवरे
सांग दर्पणा...
एका अगदी प्रिय दुकानात चक्कर मारताना अतीव सुंदर आरसा दिसला,एकदम स्वच्छ चकचकीत आणि सागवानी लाकडाची सुंदर किनार.मन थबकलं तिथंच,मनात विचार करूनही त्या क्षणी घरात योग्य जागा सापडेना त्याच्यासाठी. मग पुन्हा येण्याचा निश्चय करून वळले.
शास्त्रात शिकवलंय की आरसा ही एक प्रकाश परावर्तित करणारी चमकदार वस्तू असते. प्रतिमा छोटी किंवा मोठी करायला अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र आरसेदेखील वापरले जातात.इतकी गद्य व्याख्या पण आपल्या आयुष्यातले आरसे किती काव्य घेऊन येतात.
पाटीलने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तिथे आधी पासूनच दोन कॉन्स्टेबल उभे होते. "काय रे, कश्याला हात तर नाही लावला ना?" घोरपडे ने गाडीत बसूनच विचारले. "नाय sir" कॉन्स्टेबल ने उत्तर दिले. पाटील आणि घोरपडे गाडीतून उतरले. "कुठेय?" घोरपडे ने रस्त्याच्या कडेला थुंकत विचारले. "त्या झाडाकडे..." कॉन्स्टेबल ने झाडाकडे खुणावत सांगितले. "पाटील, बघा जरा जाऊन" पाटील, रस्त्या शेजारील झुडपे ओलांडत झाडाकडे जाऊ लागला. "अजुन काय काय सापडलं?" घोरपडे विचारपूस करू लागला. "ही एक अॅक्टिवा आणि purse. हे लायसेन्स आणि आधार कार्ड मिळालं त्यातून" एका कॉन्स्टेबल ने लायसेन्स आणि आधार कार्ड घोरपडे ला दिलं.
२०१७ साली शिक्षणासाठी मी पुण्यात आलो.शहर अनोळखी नव्हतं पण नवीन होत,त्यात पहिल्या वीस दिवसात मी माझ्या खोलीत एकटाच होतो,त्यामुळे खूप विचित्र वाटायच,रडायला यायचं.त्यात मला कोणाशी मैत्री करायला जरा जास्तच वेळ लागतो,म्हणून घराची आणि मित्रांची सारखी आठवण यायची.
पण हळूहळू मी त्या वातावरणात रुळू लागलो,मित्रही बनत गेले,पण शेवटी हाॅस्टेल आणि घर यांच्यात फरक तर असणारच ना.त्यात मला भूक सहन करणे म्हणजे अशक्य.तसा मी हाॅटेल मॅनेजमेंटच्या काॅलेजात असल्यामुळे दुपारच्या जेवणाची व्यवस्था काॅलेजमधचयेच असायची.१२:५० ला आम्ही डायनिंग हाॅलकडे जायचो,तिथे रांगेतून ताट घेऊन टेबलवर जाऊन बसायच.