गंप्या ची वसाहत
गंप्या ची शहराजवळ वडिलोपार्जित शेती होती शहर वाढत गेल्यानेजमीनीच्या किमती वाढल्या होत्या.गंप्याने आपल्या मित्रां सोबत शेतीच्या जागी वसाहत करण्या चे ठरवले.
जमीनी जवळून एक नदि वाहत होती,काठावर बरीच झाडे,हिरवळ होती,जमीनी चा एक भाग खडकाळ, टेकडी सारखा होता.
गंप्या ने त्याच्या ईंजीनियर मित्रा कडून संपूर्ण जमीनी चा नकाशा तयार करवून घेतला व,वेगवेगळ्या आकाराचे प्लॉट पाडले.
आपली वसाहत नाविंन्यपूर्ण असावी म्हणून, प्लॉट फक्त मराठी लोकांनाच त्यांच्या आडणावा प्रमाणे द्यायचे ठरले
भरपूर झाडी गवताळ भागाचे प्लॉट मोरे,साळुंके,कोकीळ,,पारवे गरूड तसेच लांडगे,कोल्हे,हरणे वाघ तर नदि काठचे,मगर,हंस,बगळे,मुंगी,नागराज यांना द्यायचे ठरले.
टेकडी सारख्या उंच भागावर,देवळे,पुजारी,देव,ऋषी,तपस्वी, गोसावी यांना दिले.
गाजरे,वांगे,मुळे,भेंडे,भोपळे,फूले,कापसे यांना जमीनीच्या मध्य भागी असलेल्या सपाट भागा चे प्लॉट दिले, जमीनीचा खडकाळ असलेल्या भागात लोखंडे,तांबे,पीतळे,चांदे तर वसाहती च्या शेवटच्या भागात पुंडे,गुंड यांना दिले.
वसाहतीतील मध्य भागी असलेला मोठा प्लॉट काळे,गोरे,सावळे या तीन मित्रांनी मिळून घेतला होता,काळ्यांच्या मुलीने गोऱ्यां च्यामुलाशी प्रेम विवाह केला होता
त्यांची मुले मात्र सावळी होती.
वसाहती च्या प्रवेश दरवाजा जवळ चे प्लॉट फाटक भाले,टोके,राखे यांना दिले.
वसाहती ची कामे पूर्ण झाली,लोकांनी भराभर घरे बांधली व लोक राहू लागले.
सेवानिवृत्त झालेले गरूड रोज पहाटे उठून घराच्या उंच गच्चिवर योगासने करत पण त्यांचे सर्व लक्ष शेजारी राहणाऱ्या,कोकीळ व कावळे यांचे कडे असे.कविता कोकीळ पहाटे घराच्या गॅलरीत उभे राहून आपल्या गोड आवाजात भावगीते गात असे, शेजारचे कावळे मान हलवत तिच्या कडे एकटक बघत बसत.
हरणे विधूर होते, ते न चुकता विधवा असलेल्या गवते बाईंकडे हजेरी लावत व त्यांचा घराच्या लॉन मध्ये फिरत,वांगे व भोपळे यांचे सख्य होते पण मुळे मात्र त्यांच्या पासून दूर राहत.
लांडगे,कोल्हे सदा खिदळत असतं,वाघ मात्र वाघमाऱ्यां ना घाबरून असायचे.तांबे,पितळे,लोखंडे यांचे त्रिकुट सदैव टेकडीवर गप्पा मारत बसायचे.
हंस,मगर हे, वसाहतीतील तरण पुष्करात सदानकदा पोहत असायचे,बगळे मात्र काठावर एका पायावर उभे राहून ध्यान करत.मोरे यांनी नृत्याचे क्लास काढले होते, गायतोंडे व पोळ बरोबर फिरायला जायचे. नागराज यांचे पासुन सर्व दूरच राहत, ते केव्हा टोचून बोलतील याचा नेम नसे.
मुंगी, मुंगळे कोणाच्याही घरात अगदी स्वयंपाकघरात डोकावून कुठे काय ठेवले आहे हे बघण्याची वाईट खोड होती.
फूले,कापसे यांचा वाती व हार करण्याचा व्यवसाय होता,ते देवळात येणाऱ्यांची वाट पहात बसत, पुजारी सतत टिव्हि बघत बसलेले असत.गुरू सतत उपदेश करत.
साळुंक्याच्या घरी सदैव कलकलाट सुरु असे, गायतोंडे गवते बाईंच्या अंगणातील दुर्वा तोडून नेत.
देवांचा,पुजेचे साहित्य,धार्मिक साहित्य,देवांच्या मूर्ती विकण्याचा व्यवसाय होता,ऋषिंचे वेस्टर्न डांन्स चे क्लास होते,मिसेस ऋषीं ब्युटि पार्लर चालवीत.गाजरे,भेंडे जेवण्या चे कॉन्ट्रॅक्ट घेत, वांग्यांची खानावळ होती, तिथली भरलेली वांगी प्रसिद्ध होती,वांग्यांची अंगाने भरलेली तरूण मुलगी
व्यवसाय सांभाळत असे त्यामुळे खानावळ खूप चालत असे
कावळे गच्चिवर उभे राहुन कोणाकडे कोण पाहुणे आले कोण यतोजातो यांकडे काक दृष्टी ने लक्ष देत.भाले,टोके कोणत्याही गोष्टी च्याअगदि टोका पर्यंत जात असत.कोल्हे ,कोणते काम कसे काढायचे याचा धुर्त पणे विचार करून आपले काम काढून घेत.गुंड व पुंडे बॅंकेच्या वसुली चे काम करायचे.
फाटक सदानकदा कुरकुर करत,त्यांचे घर वसाहती च्या प्रवेष द्वारा जवळ असल्याने वसाहतीत येणारे त्यांना लोकांच्या घराचा पत्ता विचारत त्याने ते वैतागले होते,ते नेहमी आपल्या घराचे फाटक बंद ठेवत.
गंप्या ने लोकांच्या सोईसाठी काहिच दूकाने काढली होती,तेथे देखिल आडणावा प्रमाणे व्यवसाय होत असे.
कापसे,कापडे यांचा गादि कारखाना होता, भुसारी याचे किरणा माला चे दुकान होते. शृंगारपुरे यांचे साैंदर्य प्रसाधनांचे, पुस्तके यांचे वह्या, पुस्तके व वाचनालय होते
गणपते,पेण चे गणपती विकत,मुळ्यांचे भाजीपाल्याचे दूकान होते,आंबेकरबंधु आंब्याच्या व्यवसाय करत.
अशारितीने गंप्या च्या वसाहती चे नाव संपूर्ण शहरात प्रसिद्ध झाले,सर्व गंप्या च्या कल्पकतेचे कौतुक करू लागला.
प्रतिक्रिया
8 Oct 2020 - 9:19 am | विजुभाऊ
अरे वा छान आयडिया आहे.
8 Oct 2020 - 11:13 am | Bhakti
लयी भारी :)
8 Oct 2020 - 3:23 pm | नावातकायआहे
काय झेपला नाय... :-(
8 Oct 2020 - 10:13 pm | सुचिता१
अतिशय सुमार ...
9 Oct 2020 - 11:50 am | राजेंद्र मेहेंदळे
गोग्गोड गोष्टी या नावाखाली सदर चालु करा
9 Oct 2020 - 2:50 pm | डीप डाईव्हर
कल्पना चांगली आहे पण विषय खुलवता नाही आला अस वाटल.
10 Oct 2020 - 1:09 am | शशिकांत ओक
ते नाव काय होते?
10 Oct 2020 - 12:59 pm | राजाभाउ
मुळात गंप्याचे आडनाव काय होते ? जमीनदार ?
10 Oct 2020 - 3:32 pm | बबन ताम्बे
आम्हाला खडकाळ जमिनीवर प्लॉट दिला. पैसे मात्र इतरांच्या एव्हढेच घेतले ☺☺