चुकलेला नेम - अंतिम भाग

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
7 Oct 2020 - 6:14 pm

"भारत माता की जय ..." "भारत माता की जय " कचेरीच्या चारी बाजूने लोक गोळा झाले होते. क्षणाक्षणाला गर्दी आणि त्याचे रौद्ररूप वाढत चालले होते. जॉर्जचा एक शिपाई आधीच मरून पडला होता. त्याच्या मरणाला कारणीभूत ठरलेला दगड त्याचाच बाजूला रक्ताने लडबडलेला होता. कचेरीच्या मुख्य दरवाज्यावर लाथाडलेल्याचा आवाज येत होता. जॉर्जची नजर त्या दरवाज्यावर खिळून होती. शिपायांनीही आपापल्या बंदूका दरवाज्याकडे रोखल्या. अखेरीस तो दरवाजा तुटतो न तुटतो तोवर लोकांचा एक गट आत घुसला आणि शिपायांनी नेम साधला. शिपाई बंदूक पुन्हा तयार करेपर्यंत लोकांचा दुसरा गट आत घुसला. त्यांनी त्या शिपायांच्या बंदुका हुसकावल्या. केवळ जॉर्ज आपली पिस्तुल घेऊन मागे उभा होता. तो गोळ्या झाडणार इतक्यात "थांबा " अशी आरोळी कचेरीत घुमली.

जॉर्जने चमकून दरवाज्याकडे पाहिले. गोपाळराव जॉर्जकडे पिस्तुल रोखून उभे होते. आजूबाजूच्या लोकांकडे पहात गोपाळराव गरजले ," ह्या जॉर्जला जिवंत ठेवा. आपल्याला इतके वर्ष लुबाडले याने. आता तो सगळा खजिना याच्याकडून वसूल करायचा आहे. तुम्ही या शिपायांना घेऊन बाहेर जा. मी या जॉर्जकडून त्याच्या खजिन्याची माहिती घेतो. " कमावलेला आवाज , नजरेतली जरब याचा तात्काळ परिणाम त्या लोकांवर झाला. शिपायांना खेचत लोक बाहेर घेऊन गेले. आता त्या कचोरीत केवळ जॉर्ज आणि गोपाळराव दोघेच उभे होते. अजूनही जॉर्ज आपली पिस्तूल गोपाळरावांवर रोखून उभा होता. " जॉर्ज मला एकवेळ मारशील पण बाहेर एवढा मोठा जमाव जमला आहे. आज तुझे मरण ठरलेले आहे. खाली कर ते पिस्तुल. " " कशासाठी हे सगळे ? " जॉर्ज विचारता झाला.

"कशासाठी ? स्वातंत्र्यासाठी. तुमच्या जोखडीतून मुक्त होण्यासाठी. " " स्वातंत्र्यासाठी तू लढणार ? जर तू स्वातंत्र्यासाठी लढणारा असता , तर दरवाजा फोडल्यानंतर तू पहिल्यांदा आत आला असता. तू तुझ्या लोकांना मरू दिले आणि नंतर आत आला. " यावर गोपाळराव खळखळून हसले. " त्यांच्या आंधळ्या विश्वासाचा तो परिणाम होता. हे सगळे डावपेच मी तुम्हा इंग्रजांकडूनच शिकलो आहे. त्या लोकांसाठी हा स्वातंत्र्यसंग्राम आहे , पण माझ्यासाठी ही एक दंगल आहे. या दंगलीत बळी जाणार आहे तो तुझा. "

"आता असेही तू मरणार तर आहेस तर तुझ्या सगळ्या शंका आता मी दूर करतो. आधी मी तुमच्या भाषेवर प्रभुत्व मिळवले , तुमच्याकडे अनेक वर्ष चाकरी केली आणि तुमचा विश्वास संपादन केला. मी योग्य वेळेची वाट पहात होतो. ती वेळ आता आली आहे. "

"मला मारायचेच होते , तर मला तेव्हाच तुझ्या माणसाकडून का मारले नाही ? तुझ्याच माणसाची माहिती तू स्वताःच मला का दिली ?." जॉर्ज अजूनही गोंधळात पडलेला होता. " माझा माणूस ? तो केवळ एक बकरा होता ज्याचा मी बळी दिला. इतक्या वर्षांच्या मेहनतीने मी पिस्तुल मिळवले. पण ते पिस्तुल खराब झाले होते. त्या पिस्तुलाने नेम धरणेच शक्य नव्हते. तेव्हा मी त्या पिस्तुलाचा वेगळ्या पद्धतीने वापर करायचे ठरवले. एका जहाल तरूणाकडे मी ते पिस्तुल दिले आणि तुला मारायला सांगितले. त्याच्याबरोबर मी माझा एक माणूसही दिला. इकडे मी तुला धोक्याची कल्पना मुद्दाम देऊन ठेवली. त्या तरूणाकडे पिस्तुल असेल अशी कल्पना अर्थात तुम्हाला असणे शक्य नव्हते. त्यांना पकडण्यासाठी तू त्या तरूणाला जवळ येऊ देशील अशी अपेक्षा होतीच. पण त्यांने गोळीबार केला आणि तुझे शिपाई तात्पुरते गोंधळले. त्या गोंधळात माझा माणूस ते पिस्तूल घेऊन पळून गेला आणि तो तरूण तिथेच मरून पडला. माझ्या माणसाने मला ती बंदूक आणून दिली.
त्या तरूणाला मी आता शहीद करून टाकले. इंग्रजाने एका तरूण मुलाला मारून टाकले यांचे भांडवल उभे केले आणि हा जमाव आता धावत आला. बंडाचा दारुगोळा आधीच भरलेला होता. मी त्यावर काडी टाकली. "

" तुला तेव्हाच तुरुंगात टाकायाला पाहिजे होते. पण तू स्वताःच हल्ल्याची माहिती दिली होती म्हणून तूला जाऊ दिले. पण जर तुला पिस्तुल मिळालीच होती तर तू कचोरीतच मला मारू शकला असता. एवढा बनाव रचण्याची काय गरज ?"

"तू सतत शिपायांच्या पहा-यात असायचा. मुख्य म्हणजे मला तूझ्या डोळ्यात भिती बघायची होती. तशीच भिती जशी मी माझ्या बहीणीच्या डोळ्यात बघितली होती. तूच तो नराधम ज्याने माझ्या बहिणाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. तो जमला नाही तेव्हा तू तिला जिवंत जाळले होते. त्याचाच बदला मी घेतोय. "

"गोपाळ , तुला उशीर झाला आहे. मला तुझ्या झोपाळ्यावर गन पावडरचा खडा सापडला होता. तेव्हाच मला शंका आली होती. मी बंड होणार हेही ग्रुहित धरले होते. आमची एक तुकडी लवकरच इथे पोहचेल. "

बाहेर गोळीबाराचा आवाज येऊ लागला होता. लोकांच्या किंकाळ्याची त्याला जोड मिळत होती. इंग्रजांची तुकडी पोहचली होती. जॉर्जने पिस्तुल गोपाळरावाकडे रोखली. गोपाळरावही आपली पिस्तुल जॉर्जकडे रोखली. तुकडी आत घुसली आणि त्यांनी गोपाळरावांना पकडले.

गोपाळरावांनी शेजारच्या सैनिकाला धक्का दिला आणि ते जॉर्जकडे धावले. जॉर्जसमोर आपला भूतकाळ दिसत होता. अपराधी भावनेने जॉर्जला व्यापून टाकले. थरथरत्या हाताने जॉर्जने गोळी झाडली पण त्याचा नेम चुकला. गोपाळरावांनी जॉर्जच्या डोळ्यात बघितले. एक अनामिक भिती जॉर्जच्या डोळ्यात दाटली होती. गोपाळरावांनी आपली पिस्तूल जॉर्जच्या छातीवर ठेवली आणि चाप ओढला. यावेळेस नेम चुकण्याची काही शक्यताच नव्हती. डाव प्रतिडावात दोघांनी एकमेकांना शह दिला होता , पण शेवटी गोपाळरावांचे धैर्य त्यांच्यासाठी धावून आले.

मागून शिपायांचा गोळीबार चालू झाला होता.

समाप्त

कथालेख

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

7 Oct 2020 - 6:31 pm | शब्दानुज

सा. सं नी अनुक्रमणिका जोडावी

कथेचा नेम चुकलाय सुरवात खूप छान केलीत. पण शेवट करताना पूर्ण नेम चुकलाय.
गोपाळ चा काय उद्देश आहे तेच कळत नाही

कपिलमुनी's picture

7 Oct 2020 - 7:41 pm | कपिलमुनी

लिव्हलय की त्यांनी

शब्दानुज's picture

7 Oct 2020 - 7:54 pm | शब्दानुज

"तू सतत शिपायांच्या पहा-यात असायचा. मुख्य म्हणजे मला तूझ्या डोळ्यात भिती बघायची होती. तशीच भिती जशी मी माझ्या बहीणीच्या डोळ्यात बघितली होती. तूच तो नराधम ज्याने माझ्या बहिणाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. तो जमला नाही तेव्हा तू तिला जिवंत जाळले होते. त्याचाच बदला मी घेतोय. "

दुर्गविहारी's picture

7 Oct 2020 - 9:59 pm | दुर्गविहारी

पहिला भाग खुपच जमून आला पण दुसर्‍या भागाने अपेक्षाभंग केला.

सॅगी's picture

7 Oct 2020 - 10:44 pm | सॅगी

त्या गोंधळात माझा माणूस ते पिस्तूल घेऊन पळून गेला आणि तो तरूण तिथेच मरून पडला.

तो तरुण नेमका कसा मेला?? पिस्तुलाचा नेम चुकु शकतो पण म्हणून गोळी मारणाराच कसा मरेल?

त्या तरूणाने जॉर्जवर ( गोरा साहेबावर) गोळी चालवली पण बंदूक खराब असल्याने त्याचा नेम बसला नाही. गोळीच्या आवाजानंतर जॉर्जच्या (गोरा साहेबाच्या ) रक्षणासाठी जे शिपाई होते त्यांनी जॉर्जच्या रक्षणार्थ
उलट गोळीबार केला त्यात तो तरूण मेला. पण जो दुसरा मारेकरी त्या तरूणासोबत होता तो मात्र ती खराब बंदूक घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला.

सॅगी's picture

7 Oct 2020 - 11:33 pm | सॅगी

आता समजले...

Gk's picture

8 Oct 2020 - 7:57 pm | Gk

छान

डीप डाईव्हर's picture

9 Oct 2020 - 3:26 pm | डीप डाईव्हर

नक्की किती भाग आहेत? मला तर दोनच दिसले आणि ते दोनच असतील तर पहिला भाग छान होता अंतिम नाही आवडला. माफ करा पण खूप त्रोटक वाटल्याने काहीच टोटल लागली नाही आणि अपेक्षाभंग झाला आहे 👎

विनिता००२'s picture

9 Oct 2020 - 3:49 pm | विनिता००२

तू कचोरीतच मला मारू शकला असता. >>> नको. मी समोश्यात मारणार :)

गोंधळ वाटला, नीट मांडणी करायला हवी होती.

महासंग्राम's picture

10 Oct 2020 - 12:11 pm | महासंग्राम

तू कचोरीतच मला मारू शकला असता

नाही कारण मला रश्श्यात बुडवून मारायचे होते

तिरथराम शर्मा
शेगाव कचोरीवाले

शानबा५१२'s picture

16 Jun 2021 - 8:34 am | शानबा५१२

:-))