गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ८ कॉफी
प्रियांसी
खूप काही सांगायचंय पण लिहितात येत नाहीये आज.
आपल्या आवडत्या व्यक्तीचा परिचय करून घ्यावा की हळूहळू ओळखावं त्याला? व्यक्तिमत्व हळूहळू उमलले, अलगत उलगडले की जास्त भावेल, नाही का? giftbox सारखं. आकार केवढाही असला तरी आत काय असेल याची उत्सुकता कायम राखणारा. गम्मत म्हणजे देणारा आणि घेणारा दोघेही तितकेच उतावीळ, उत्सुक, अस्वस्थ!! देणारा फारच विचार करून देतो आणि मग अस्वस्थ होतो आवडेल की नाही.
एक गिफ्ट योजलय तुझ्यासाठो . आणि बघ ना gift च्या नुसत्या विचारांनी हृदयाचे ठोके वाढले. तू ते अलगद उघडताना दिसतेयस. किती रोमांचकारी क्षण असेल तो.