वाक्प्रचार, म्हणी,रूपकातील प्राणीवाचक उल्लेखांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असांसदीयतेच्या नेमक्या सीमारेखा
नमस्कार,
मराठी वाकप्रचार आणि म्हणींमध्ये बर्याच ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्राणी वाचक उल्लेख येतात आणि दुसर्र्या बाजुची व्यक्ती आमचा प्राणी वाचक उल्लेख केला गेला आमच्या भावना दुखावल्या गेल्या असे म्हणू शकते.असे काही वेळा इतर रूपकांमुळेही होऊ शकते.दुसर्र्या बाजूस मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांना लिहिणार्या व्यक्तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सांभाळावयाचे असते.
१)"वा अबकडराव वा !!! सौ चुहे खाकर बिल्ली हज चाली ...? हळक्षज्ञराव ह्यांना उपदेश सांगण्या आगोदर आपण आत्म परीक्षण केले का ? " - हि एका तिसर्या व्यक्तीची प्रतिक्रीया ज्यावरून वाद झाला