नमस्कार,
मराठी वाकप्रचार आणि म्हणींमध्ये बर्याच ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्राणी वाचक उल्लेख येतात आणि दुसर्र्या बाजुची व्यक्ती आमचा प्राणी वाचक उल्लेख केला गेला आमच्या भावना दुखावल्या गेल्या असे म्हणू शकते.असे काही वेळा इतर रूपकांमुळेही होऊ शकते.दुसर्र्या बाजूस मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांना लिहिणार्या व्यक्तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सांभाळावयाचे असते.
१)"वा अबकडराव वा !!! सौ चुहे खाकर बिल्ली हज चाली ...? हळक्षज्ञराव ह्यांना उपदेश सांगण्या आगोदर आपण आत्म परीक्षण केले का ? " - हि एका तिसर्या व्यक्तीची प्रतिक्रीया ज्यावरून वाद झाला
: या उदाहरणात लेखक म्हणू इच्छितो की, तुम्हीही तेच केलत मग दुसर्र्या व्यक्तीस उपदेश का ? या वादविवादात अबकडरावांनी प्राणी वाचक उल्लेख झाला आणि मी दुखावले आहे आणि तिसर्र्या व्यक्तीचे खाते बॅनकरा अशी मागणी केली.अबकडराव माझ्या ओळखीचे गृहस्थ असून सुद्धा तो दबाव मी मान्य केला नाही.यात लिहिणार्याचा मुख्य उद्देश प्राणी वाचक नसावा त्या अर्थी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बुज राखली जावयास हवी तर मी ते खाते इतर व्यवस्थापकांचाही सल्ला घेतला आणि बॅन केले नाही. पण प्राणी वाचक उल्लेख पुढे चालून टाळावेत असा नवा संकेत बनवला
अ) उपरोक्त वाक्प्रचारातील प्राणी वाचक उल्लेख असांसदीय समजावा का ?
ब) मला माझ्या व्यवस्थापकीय निर्णयाचे तट्स्थ मुल्यांकन करून हवे आहे.
२) नंतर काही महिन्यांनंतर उपरोक्त वाद विवादातील हळक्षज्ञ रावांशी वेगळ्या कारणाने माझा विवाद झाला विवादात मी खालील वाक्य एके ठिकाणी वापरले
"::सशाची गोष्ट आहे झाडाचे पान पडले कि आभाळ कोसळले म्हणावयाची आम्ही ही आपल्या या लांडगा आला मनोवृत्ती कडे दुर्ळक्ष करतो."
:यावर वरील वाक्यात हळक्षज्ञरावांनी मी त्यांना लांडगा असा उल्लेख केला असा आक्षेप घेतला.मी त्याचे स्पष्टीकरण "पहिल्या सशाच्या गोष्टीचे रूपक पुरेसे स्पष्ट आहेच, संकट एकदम लहान असतानाही त्याला मोठे म्हणावयाचे असा त्याचा अर्थ होतो.दुसऱ्या रूपकात संकट न येताच संकट आले म्हणावयाचे असा अर्थ होतो. दुसऱ्या रूपकात 'संकट आले', म्हणणारे माझे मित्रवर्य आहेत आणि संकट किंवा शब्दाचा अर्थ ताणावयाचाच झाला तर माझी कृती किंवा मी स्वत: 'लांडगा' ठरतो.मी मला स्वत:ला लांडगा म्हटले असेल तर माझ्या मित्रवर्यांना तत्वत: आक्षेप असण्याचे कारण मला समजलेले नाही." असे दिले ( हा आक्षेप घेण्यापुर्वीही हळक्षज्ञरावांना मी संवाद साधून गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न वगैरे केले होते पण तो भाग वेगळा आहे.)
:अ) उपरोक्त रुपकांचे उपयोग असांसदीय स्वरूपाचे आहेत का ?
:ब) मी संबंधीत सदस्याची समजूत कशी काढावी ? कि मी स्वतः यात खरोखर चुकलो आहे जे मला अद्याप समजे नाही ?
३) मराठी विकिवर सदस्यांच्या आपापसातील विवादांनंतर प्राण्यांना लावली जाणारी विशेषणे चर्चेत वापरली गेल्यास काही सदस्य गट दुखवाले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन "पाळीव प्राण्यांना लावली जाणारी विशेषणे सदस्यांबद्दल वापरली जाऊ नयेत" हा संकेत तत्वतः स्विकारला आणि सरळ प्राणि विषयक उल्लेखांवर बंधने घातली आहेतच पण मराठीतील नेमके कोणते वाक्प्रचार आणि म्हणी अप्रत्यक्षरीत्या प्राणीवाचक उल्लेख ठरून असांसदीय ठरतात आणि नेमके कोणते वाक्प्रचार आणि म्हणींना कठोर टिका करता यावी म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण प्राप्त व्हावयास हवे.खाली मला माहीत असलेल्या म्हणीची यादी देत आहे
:यादी :"मला कुठे गं नेशी"," गेले तीर्था"," अडला हरी पाय धरी","अती शहाणा ","म्हणे माझी धार काढा"," एका कानावर पगडी","ऋषीपंचमीचा","बसायला आणि फांदी मोडायला","द्राक्षे आंबट","शापाने गाय मरत नाही"," दांत शोधण्यासारखे","काकडीला राजी","...भारी उड्या मारी","गुळाची चव काय?"," लाथांचा सुकाळ","वाचली गीता", "कालचा गोंधळ बरा होता",गोगल गाय पोटात पाय","व्याह्यांनी धाडलं","सन्याश्याला फाशी","....उलट्या बोंबा"," मनात चांदणे"," लढाई आणि नुसती बडाई"," दुध देईल काय?","जावयाचं पोर","नाही लंगोटी आणि मला म्हणा दिपुटी"," तुला न मला घाल .."," दाम करी काम"," न डाग पखालीला","अन कोल्हं उसात"," धरलं तर चावतंय","सोडलं तर पळतंय"," गेला आणि हिवाने मेला","उठुन बघायचं"," नको तिथं बोटं घालू नये"," घातलेच तर वास घेत बसू नये",""शेण खायला","घातला पाला गार लागला अजून घाला"," नेशीण तर पैठणी"," पाण्यात ..... वर मोल","पिंडीवर बसला म्हणून ... गय","गेला अन् झोपा केला", "फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली"," हात पाय पसरी","भरवशाच्या ........ टोणगा"," भीक नको पण .... आवर","वाळले कि पडायचेच","मला नं तुला","माझीच लाल","हातात कोलीथ","दाढी हातभर","सटवीला नव्हता नवरा","रिकामा सुतार","आमंत्रण जेवल्याबिगर खोटे","लोका सांगे ब्रम्हज्ञान","वराती मागून","बिऱ्हाड पाठीवर","धाव कुंपणापर्यंत","पाठ मऊ","शेपूट वाकडे|राहिलं"
उपरोक्त यादीत शक्य तिथे म्हणीचा एक भाग टाळला आहे.पूर्ण म्हणी मराठी विकिक्वोटच्या या धाग्यावर उपलब्ध आहेत.
अ)कोणते वाक्प्रचार आणि म्हणी अप्रत्यक्षरीत्या प्राणीवाचक उल्लेख ठरून असांसदीय ठरतात
ब) नेमके कोणते वाक्प्रचार आणि म्हणींना कठोर टिका करता यावी म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण प्राप्त व्हावयास हवे.
यातील ज्या म्हणींचे उपयोग असांसादीय ठरवले जातील त्यांच्या उपयोगावर बंदी घालणे सोपे जाइल.
कणखर मराठी मित्राचा प्रतिसाद मराठमोळे पणाची चुणूक दाखवतानाच आंतरजालावरील संसदीय सभ्यतेच्या परिघाच्या अपेक्षा कशा सांभाळायच्या हा मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांपुढचा हा प्रश्नांच्या अनुषंगाने "कठोर टीकात्मक लेखन", सभ्यतेच्या (संसदीय) मर्यादेत पुर्णतः राहून आणि व्यक्तिगत रोख टाळून कसे करावे ? अशी एक चर्चा मिपावर सहाएक महिन्यांपुर्वी केली आहे आणि आपणा सर्व मिपाकरांचा चर्चेस चांगला मनःपुर्वक प्रतिसाद मिळाला होता त्या बद्दल धन्यवाद.
आंतरजालावरील संसदीय सभ्यतेच्या परिघाच्या अपेक्षा कशा सांभाळाव्यात ह्या मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांपुढच्या प्रश्नांच्या मालिकेतील अजून काही वेगळे प्रश्न मी आपणा सर्वांचे मत जाणून घेण्या करता सादर केले आहेत.
आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो. सबब, निरनिराळ्या विषयांवरील चर्चाप्रस्तावांचे इथे स्वागत आहे. येथे होणार्या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे!
चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.शुद्धलेखन चिकित्साकरण्यास वेळ देऊ शकलो नाही या बद्दल क्षमस्व.
प्रतिक्रिया
21 Aug 2013 - 10:22 pm | पैसा
नाही. कारण इथे थेट "तू गाढव आहेस्/तू रेडा आहेस" असे काही म्हटलेले नाही.
कोणाचे खाते बॅन केले नाहीत त्याबद्दल अभिनंदन. पण त्याचवेळी अशा म्हणी वापरण्यावर बंदी घातली असेल तर ते मला बरोबर वाटत नाही. अशा म्हणींच्या पाठी काही कथा असतात आणि त्यातले तात्पर्य एवढ्याच स्वरूपात त्या घ्यायच्या असतात. इथे लाक्षणिक अर्थ महत्त्वाचा, वाच्यार्थ लागू होत नाही, जर दुसर्या सदस्यावर थेट शाब्दिक हल्ले केले नसतील तर.
समजा मला एखाद्याने असे म्हटले की, "तुला काही सांगून फायदा नाही, गाढवापुढे वाचली गीता इ. इ." तर त्याचा अर्थ "मला गाढव म्हटले आहे" असा मी तरी घेणार नाही. अर्थात हा प्रत्येकाच्या संवेदनाशीलतेचा प्रश्न आहे. इतर कोणाला ते खूप जास्त लागू शकेल. पण जर तिसर्या कोणाबद्दल चौथ्या सदस्याने अशी तक्रार केली तर वेळ काळ परिस्थिती पाहून इतर संपादक सल्लागारांबरोबर चर्चा करून मिपावर काय तो निर्णय घेतला जातो.
तुम्ही दिलेल्या यादीतील बहुसंख्य म्हणी अगदी खमंग असल्या तरी असांसदीय नाहीत. अशा म्हणी आपली भाषा समृद्ध करतात. मिपावर काही दिवसांपूर्वी असांसदीय भाषा/शिव्या याबद्दल एक जोरदार चर्चा झाली होती,
http://www.misalpav.com/node/24569
आणि त्यात माझे जे मत होते तेच इथेही कायम आहे. की जी भाषा आपण घरात बोलू शकणार नाही ती एखाद्या संस्थळावर वापरू नये. कोणी असेही म्हणतील की सगळ्याच गोष्टी आपण आईबापांसमोर करत नाही, मग घरी सभ्य राहून इथे शिव्या दिल्या तर काय बिघडलं? बिघडत काहीच नाही. पण त्या सगळ्या गोष्टी आपण चव्हाट्यावरही करत नाही. स्त्रिया आणि पुरुष अशी मिश्र उपस्थिती असलेलया सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेचे जे संकेत आहेत ते किमान पाळावेत अशी अपेक्षा आहे.
http://www.misalpav.com/node/298
http://www.misalpav.com/node/11148
http://www.misalpav.in/node/15135
इथेही वेळोवेळी असभ्य असांसदीय भाषा याबद्दल चर्चा झाल्या आहेत.
केवळ प्राण्यांचा उल्लेख असलेल्या म्हणी आहेत म्हणून त्यावर बंदी घालणे योग्य नाही, पण कोणालाही थेट शिव्या देणे, अश्लील शेरे मारणे हे मात्र नक्कीच असांसदीय आहे. तुम्ही व्यवस्थापक असाल तर प्रत्येक वेळी प्रसंग आणि त्यात भाग घेणार्या व्यक्ती या दोन गोष्टींचा विचार करूनच तारतम्याने काय तो निर्णय घ्यावा.
22 Aug 2013 - 8:15 am | माहितगार
अशा म्हणींच्या पाठी काही कथा असतात आणि त्यातले तात्पर्य एवढ्याच स्वरूपात त्या घ्यायच्या असतात. इथे लाक्षणिक अर्थ महत्त्वाचा, वाच्यार्थ लागू होत नाही, जर दुसर्या सदस्यावर थेट शाब्दिक हल्ले केले नसतील तर.
:धन्यवाद, माझे व्यक्तीगत मतही असेच आहे.पण काळानुसार भाषेत वापरलेल्या शब्दांचे वाक्यांचे अर्थ व्यक्ती आणि समाज परत्वे बदलू शकतात. काही मोजक्या व्यक्तिच वाच्यार्थ गृहीत धरताहेत का? नवीन पिढीचा स्वतःच्याच भाषेशी कमी होत चाललेल्या परीचयामुळे भावना दुखावल्या जाताहेत.का भाषिक बदलच घडतो आहे ह्याचाही अदमास यावा असा या चर्चेचा उद्देश आहे.आणि आपल्या प्रतिसादामुळे उद्दीष्ट साध्य करण्यात भरीव मदत होते आहे.
त्याचवेळी अशा म्हणी वापरण्यावर बंदी घातली असेल तर ते मला बरोबर वाटत नाही.
:अद्यापतरी म्हणींवर बंदी म्हणून घातलेली नाही. पण पूर्ण समाजाच्या भाषिक अर्थ समजून घेण्याच्या अथवा सांस्कृतीक वैचारीक पद्धतीत फरक पडला असल्यास काही म्हणींवर बंदी घालण्याची गरज आहे का हे या चर्चेच्या माध्यमातून तपासून घेतो आहे.
माझ्या चर्चांचा उद्देश या विषयाच्या अनुषंगाने बदलत समाजमन समजून घेणे सुद्धा आहे त्यादृष्टीने आपण दिलेले चर्चा दुवे निश्चित उपयूक्त ठरतील आणि मी ते काळजी पुर्वक अभ्यासेन. आपल्या मन मोकळ्या आणि अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
22 Aug 2013 - 2:38 am | अरुण मनोहर
अतीसंवेदनशीलतेचे चोचले.
प्राण्यांचा येवढा उहापोह, तर जातीवाचक म्हणींविषयी लिहीले तर रान पेटेल!
जाता जाता एक ज्योक-
"येवढे सगळे ज्ञान तुला दिले, पण उपयोग काय? गाढवासमोर वाचली गीता..."
"तू मला गाढव म्हणतो आहेस?"
"नाही! मी ज्ञान दिले असे सांगतो आहे!"
22 Aug 2013 - 8:20 am | माहितगार
मी निशितपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाठीराखा आहे पण आपल्या नंतरच्या प्रतिअसादात प्रभाकर पेठकरांचा
तोलून मापून शब्दप्रयोग. हा दृष्टीकोण सुद्धा लक्षात घ्यावा लागतो.मनमोकळ्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद
22 Aug 2013 - 2:52 am | प्रभाकर पेठकर
एखाद्या मुद्द्यावर, प्रसंगावर लिहीताना आक्रमक भाषेत लिहीण्यास हरकत नसावी. इथे म्हणीचा वापर मुक्त हस्ते करण्यास हरकत नसावी. कित्येकदा तशी गरजही असते. पण एखाद्या सद्स्याबद्दल बोलताना, विधान करताना, आरोप करताना सामंजस्याने सौम्य शब्दांची निवड करावी. 'समज', 'आकलनशक्ती', 'बौद्धीक पोहोच', 'बौद्धीक आवाका' आदी शब्द सांभाळून वापरावे. मी तर म्हणेन 'टाळावेत'. हीनता दर्शक प्राणिवाचक शब्द तर वर्ज्य असावेत.
22 Aug 2013 - 12:54 pm | माहितगार
मी आपल्या प्रतिसादाशी पुर्णतः सहमत आहे. 'समज', 'आकलनशक्ती', 'बौद्धीक पोहोच', 'बौद्धीक आवाका' सोबतच काहीवेळा श्रोत्याच्या वाचकाच्या एक्सपोजरच्या परिपेक्षाचाही संबंध/भाग असतो.मराठी विकिवर चर्चा पानावर सदस्यांनी आपापसात हीनता दर्शक प्राणिवाचक शब्द तर वर्ज्य असावेत हे ठरले आहे त्याची अमंलबजावणी अंशतः स्वयमेव संपादन गाळण्यातूनही होते.
त्याच वेळी मराठी विकिवरील ज्ञानकोशीय लेखातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य उच्च्कोटी राखण्याच्या दृष्टीने संपादक लेखकांना मराठी विकिवरील लेखात प्रगल्भ मजकुराची हाताळणी करावी लागू शकते.त्या अर्थाने सदस्यांचे 'समज', 'आकलनशक्ती', 'बौद्धीक पोहोच', 'बौद्धीक आवाका' एक्सपोजर आदी गोष्टीतील उणीवा सोबत प्रमाणाबाहेर अतीसंवेदनशीलता मानवणारी असेल का ?प्रकल्पाची मुक्तता मुल्य सांभाळत आणि मग अशा अतीसंवेदनशीलता व्यक्तींची समजूत कशी काढावी हा ही एक मोठा प्रश्न आहे.
22 Aug 2013 - 4:28 am | स्पंदना
स्वतःची योग्य बाजू मांडताना आपल म्हणनं जास्त प्रभावी करण्यासाठी काही म्हणी वा वाक्प्रचार वापरले जातात. त्यांचा संदर्भ जसाच्या तसा घेणे हे अनुचित आहे.
पण आपली बाजू खोटी आहे, तरीही आपण कुणालातरी उगाचच खोटे नाटे आरोप करत असतो तेंव्हा या असल्या म्हणींचा उपयोग केला तर आप्ल्या स्वतःला आणी दुसर्यांनाही तो वाक्प्रचार थेट आपल्यालाच लागू होतो आहे याची बोचरी जाणीव असतेच.
तरीही वर पैसाताई म्हणाल्याप्रमाणे काही सामाजिक संकेत पाळुन भाषा वापरावी.
अर्थात येव्हढ्या तेव्हढ्यावरुन खाते बॅन करणे हे त्या व्यक्तीची हानी करणे ठरु शकते, पण सदैव टर उडवणे, हीन पातळीवर जाऊन चेष्टा करणे, टारगेट करुन सतत वेडेवाकडे प्रतिसाद देणे या गोष्टी सामाजिक स्वास्थ्य बिघडवु शकतात. अन येथे आपला समाज आंतरजालीय आहे.
22 Aug 2013 - 12:56 pm | माहितगार
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
अभ्यासपूर्ण मनममोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
22 Aug 2013 - 9:09 am | बोलघेवडा
हा लेख गम्मत म्हणून आहे कि 'शिरीयेसली ' लिहिला आहे ? अहो आपण काय संसदेत आहोत का? हे म्हणजे एखाद्या कोलेज च्या कट्ट्यावर कुणी जर फिरकी घेतली किंवा जर काही टोमणा हाणला तर आक्षेप घेण्यासारखा आहे. मिपा सारख्या हसत्या खेळत्या ठिकाणी उगीचच ते शिंचे नियम बियम बनवत बसू नका ब्बो !
एकदा ते नियम बनले कि मग एखादा चिडका बिब्बा सतत त्या नियमाच्या आडून आपल्या दुखावलेल्या भावनांना मलम चोळत बसणार. त्यापेक्षा आपण एक खायची आणि एक दुसर्याला द्यायची अश्या कट्टा खाक्यात असलेला बर !
22 Aug 2013 - 1:18 pm | माहितगार
आंतरजालीय मराठी व्यवस्थापनांपुढच्या प्रश्नांचा केवळ शिरीयेसली अभ्यास चर्चा असली तरी, मिपा वरचे नियम बनवत नाही आहे.
>>एकदा ते नियम बनले कि मग एखादा चिडका बिब्बा सतत त्या नियमाच्या आडून आपल्या दुखावलेल्या भावनांना मलम चोळत बसणार.<< हो हि चिंता खरी आहे.पण त्याच सोल्यूशन त्यांची समजूत काढून व्हावयास हवे आणि अशी समजूत कशी काढावी हा या चर्चेचा विषय आहे . >>"त्यापेक्षा आपण एक खायची आणि एक दुसर्याला द्यायची"<< हा कट्टा खाक्यात या चर्चेचा रिझल्ट म्हणून अपेक्षीत नाही. मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
22 Aug 2013 - 1:25 pm | माहितगार
काही तांत्रीक कारणामुळे माझ्या प्रतिसादातील काही वाक्ये गायब होऊन प्रकाशित झाली आहेत असे दिसते.असे << या चिन्हांच्या वापरामुळे होते आहे किंवा इतर काही कारणाने ते पहावे हि मिपा तज्ञांना विनंती.
आंतरजालीय मराठी व्यवस्थापनांपुढच्या प्रश्नांचा केवळ शिरीयेसली अभ्यास चर्चा असली तरी, मिपा वरचे नियम बनवत नाही आहे.
"एकदा ते नियम बनले कि मग एखादा चिडका बिब्बा सतत त्या नियमाच्या आडून आपल्या दुखावलेल्या भावनांना मलम चोळत बसणार." हि आंतरजालीय व्यवस्थापकांपुढची काळजीची गोष्ट आहे.त्यांची समजूत कशी काढावी याचे सनदशीर मार्ग या चर्चेतून सुचवून हवेत....."त्यापेक्षा आपण एक खायची आणि एक दुसर्याला द्यायची"... हा रिझल्ट या चर्चेतून अपेक्षीत नाही :( तरीही मनमोकळ्या प्रतिसादा करता धन्यवाद :)
27 Aug 2013 - 7:38 pm | अत्रुप्त आत्मा
@हा लेख गम्मत म्हणून आहे कि 'शिरीयेसली ' लिहिला आहे ? >>> +१ यहीच बोलने कू आया था! :)
22 Aug 2013 - 10:22 am | राही
काही म्हणी टाळाव्यातच. विशेषतः कुत्रा आणि गाढव यांचा समावेश असलेल्या म्हणी थेट प्रतिसादांत अपमानकारक वाटतात. अर्थात सरकारवर, एखाद्या धोरणावर वगैरे उपहासात्मक लिहिताना चालून जाव्यात. त्यातही काही म्हणी 'आंधळे दळतेय आणि...' अशासारख्या अगदी निरुपद्रवी असतात त्यांची हकालपट्टी नको. संदर्भानुसार अपमानमूल्य ठरवून कारवाई व्हावी. संदर्भानुसारहे महत्त्वाचे. हे नियमावलीत स्पष्टपणे अधोरेखित व्हावे. म्हणजे त्याचा प्रतिसाद ठेवला, माझा उडवला अशी भांडणे नकोत.
अवांतर : 'सौ चूहे खा के..' या म्हणीचा अर्थ आपल्याकडच्या 'करून करून भागले आणि देवपूजेला लागले ' असा आहे. 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान...' किंवा 'आपण हसे लोकांला, ***' असा नाही.
22 Aug 2013 - 1:32 pm | माहितगार
*अवांतर : 'सौ चूहे खा के..' या म्हणीचा अर्थ आपल्याकडच्या 'करून करून भागले आणि देवपूजेला लागले ' असा आहे. 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान...' किंवा 'आपण हसे लोकांला, ***' असा नाही.
:आपण म्हणता ते बरोबर पण उपयोगकर्त्याने "लोकां सांगे ब्रह्मज्ञान...' अशा अर्थाने वापरला असावा असे इतर काँटॅक्स्ट वरून म्हणता येते.
*संदर्भानुसार अपमानमूल्य ठरवून कारवाई व्हावी. संदर्भानुसारहे महत्त्वाचे. हे नियमावलीत स्पष्टपणे अधोरेखित व्हावे. म्हणजे त्याचा प्रतिसाद ठेवला, माझा उडवला अशी भांडणे नकोत.
:आपण सुचवल्यात अशाच नेमक्या सुचवणी हव्या आहेत.म्हणींच्या संदर्भाने अशाच स्वरूपाचे विशीष्ट नेमकी सुचवण्या अजून आल्या तर स्वागतच आहे.
अभ्यासपूर्ण आणि मनमोकळ्या प्रतिसादांकरता धन्यवाद
22 Aug 2013 - 12:18 pm | दत्ता काळे
म्हणी आणि वाक्प्रचार हे भाषेचं लेणं आहे. म्हणी आणि वाक्प्रचार ह्या वाक्यार्थाला नेमकेपणा आणतात. आता तुम्ही असांसदीय म्हणता आहात तर मात्र काळजी अशी घ्यावी कि आपण ज्या वाचकवर्गासाठी लिहीतो आहोत तो वाचनाच्या बाबतीत किती परिपक्व आहे हे अगोदर समजून घ्यावे.
तुम्हाला ह्या संदर्भात जर वाचायचे असेल तर, श्रीमती दुर्गाबाई भागवतांची एका पुस्तकाला असलेली प्रस्तावना वाचा. त्या पुस्तकाचे नांव आहे " मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार"- ए.डी. मराठें नावाच्या लेखकाचं पुस्तंक आहे हे. पुस्तक असंख्य पारंपारीक म्हणींनी भरलेलं आहे. (आमच्या लायब्ररीतल्या बाईंनी हे पुस्तक मला देताना आश्चर्यचकीत चेहरा करून विचारलं- तुम्ही हे पुस्तक वाचताय ?) इतक्या अश्लिल म्हणी भरल्या आहेत त्याच्यात. पण प्रस्तावना श्रीमती दुर्गाबाई भागवतांची आहे. आणि त्यांनी ती आख्खं पुस्तक वाचून लिहीली आहे. त्यांनादेखील काही गैर वाटलं नाही.
22 Aug 2013 - 12:24 pm | बॅटमॅन
आणि आपला समाज या तथाकथित अश्लीलतेबद्दल नको तितका संवेदनाशील उगाचच झालाय. बाकीचे सोडा, अगदी ५०-६० वर्षांपर्यंत किंवा त्याच्या जरा आधी असे वाक्प्रचार स्त्रियांच्याही तोंडी सर्रास होते. आचार ओवळा झाला की विचार अधिक सोवळे होतात हा अनुभव तर नेहमीचाच आहे, त्यामुळे त्याबद्दलही काही नवल वाटत नाही.
22 Aug 2013 - 2:42 pm | विटेकर
आचार ओवळा झाला की विचार अधिक सोवळे होतात
छातीत ठोका चुकला बरं का एकदा ! " सत्य" असे भिडते की..........
22 Aug 2013 - 3:06 pm | स्पंदना
आचार ओवळा....
खरय. शबद लागायला लागतात ना!
22 Aug 2013 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाह...
...आचार ओवळा झाला की विचार अधिक सोवळे होतात हा अनुभव तर नेहमीचाच आहे...
27 Aug 2013 - 7:44 pm | अत्रुप्त आत्मा
@आचार ओवळा झाला की विचार अधिक सोवळे होतात हा अनुभव तर नेहमीचाच आहे, त्यामुळे त्याबद्दलही काही नवल वाटत नाही.>>> __/\__/\__/\__
22 Aug 2013 - 1:44 pm | माहितगार
*काळजी अशी घ्यावी कि आपण ज्या वाचकवर्गासाठी लिहीतो आहोत तो वाचनाच्या बाबतीत किती परिपक्व आहे हे अगोदर समजून घ्यावे.
:वाद विवाद ज्या पद्धतीने होताहेत त्यावरून नवीन पिढीला बर्र्याच म्हणी आणि गोष्टीतील रूपक परिचय हल्ली होत नसावा.एकुणच शब्दसंग्रहाची भाषा कौशल्याची गडबड होत असावी असा अंदाज वाटतो पण नेमके पणाने सांगता येत नाही म्हणूनच अशी चर्चा लावण्याची वेळ आली.तीस चाळीस वर्षापुर्वीपर्यंततरी अशी चर्चा लावण्याची वेळ आली नसती एवढ्या प्रमाणावर म्हणींचा वापर राजरोसपणे होत असे.पण काळ बदलत आहे.
*आपण ज्या वाचकवर्गासाठी लिहीतो आहोत तो वाचनाच्या बाबतीत किती परिपक्व आहे हे अगोदर समजून घ्यावे.
:मराठी विकि ज्ञानकोश आहे ज्ञानकोशास सत्य आणि वस्तुनिष्ठता सांभाळण्याकरता प्रगल्भ विषय गांभीर्याने हाताळावेच लागतात त्याच वेळी विकि 'मुक्ततेचे बंधन' स्विकारत असल्याने प्रत्येक वाचक परीपक्व आहे का याची शाश्वती देणे अवघड अशी द्विधा स्थिती असते.अशा द्विधा परिस्थितीत एक्सपोजर नसलेल्या व्यक्तीला परिपक्वता स्तरावर नेण्याचे अथवा संवेदनशील व्यक्तीला तर्कशास्त्राप्रमाणे विचारकरावयास लावण्याचे अवघड ओझे सोबत वागवावे लागू शकते.
आपल्या सल्ल्या प्रमाणे श्रीमती दुर्गाबाई भागवतांची एका पुस्तकाला असलेली प्रस्तावना मिळवून वाचण्याचा निश्चित प्रयत्न करेन. माहिती आणि सहकार्यपूर्ण प्रतिसादाकरता धन्यवाद
22 Aug 2013 - 12:29 pm | दत्ता काळे
हो.. एक सांगायचं राहिलं. ह्या पुस्तकात प्राणी-पक्षी-किटकवाचक रुपके वापरून तयार केलेल्या/झालेल्या म्हणी आणि वाक्प्रचारपण खूप आहेत.
22 Aug 2013 - 1:51 pm | माहितगार
साधारनतः १९७७-७८ साल असेल स्कॉलरशिप परीक्षेत मराठी विषयाकरता मराठी म्हणींचा अभ्यास लागे. आमच्या घरी एका आज्जीबाईंना ओठावर सतत प्रचंड म्हणींचा संग्रह असे त्या केवळ सुनेची आठवण आली कि अत्यंत "प्रेमाने" वापरून मोकळ्या होत.पण त्यांना मी जराशा थांबा मला लिहून पाठ करावयाच्या आहेत म्हटले की त्यांना मी चेष्टा करतो आहे असे वाटून त्या बोलायचे थांबवत
22 Aug 2013 - 12:45 pm | राही
मुद्दा श्लील-अश्लीलतेचा कमी आणि मानापमान, तुच्छता दर्शवणे याचा अधिककरून असावा. सद्ध्या तरी चारचौघांत रांगडी भाषा उचित मानली जात नाही. खाजगी कट्ट्यावर किंवा मित्रपरिवारात ठीक आहे. अ.द.मराठ्यांचे पुस्तक सद्ध्या जालावर गाजते आहे खरे पण भाषेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक संदर्भमूल्य असेच त्याचे महत्त्व आहे. ती भाषा आज प्रचारात आणावी/असावी हा खटाटोप/आग्रह/अपेक्षा व्यर्थ आहे. तसे तर जुने ताम्रपट, राजाज्ञा यांवरच्या गद्धेगाळी आज चारचौघांत मोठ्याने वाचवणारही नाहीत, पण हे शिलालेख लोकांना दिसावेत आणि त्यांचा धाक निर्माण व्हावा म्हणून मुद्दाम चव्हाट्यावर उभारले गेले होते. (यात बहुतेक ठिकाणी गर्दभ आणि माता या संदर्भात सध्याच्या काळात अर्वाच्य असे गालिप्रदान असे, म्हणून ही गद्धेगाळ.)
22 Aug 2013 - 1:11 pm | बॅटमॅन
अर्थातच, अट्टाहास ठीक नव्हेच. पण कैकदा याबद्दल स्त्रिया/मुली अन्नेसेसरिलि आग्रही असतात असे पाहिले आहे. आणि मजा म्हंजे मराठी शिव्यांना झिडकारले तरी इंग्रजी शिव्या चालतात तुलनेने असेही पाहिले आहे. असो.
22 Aug 2013 - 3:01 pm | राही
स्त्री-पुरुष मिश्र मित्रसमुदायात मुद्दामहून क्षक्षान्त शब्द वापरायचे, अभिप्रायार्थ मुली/स्त्रियांकडे पहावयाचे आणि त्यांनी लाजून अथवा शरमेने नजर चुकवली की 'दखल्ड' (दखल घेतली गेलेला) म्हणून धन्य व्हायचे, हेही पाहिले आहे.
22 Aug 2013 - 3:08 pm | बॅटमॅन
अर्थातच. असे नमुने दोन्हीकडे सापडतात. दखल्ड होण्याचा अल्गोरिदम दोन्हीकडे वेगळा असतो थोडाफार, इतकेच. मुलांच्या घोळक्यात कूल म्हणवून घेण्यासाठी मुद्दाम विंग्रजी शिव्या देणार्याही काही कमी नाहीत.
22 Aug 2013 - 2:00 pm | माहितगार
@राही
*मुद्दा श्लील-अश्लीलतेचा कमी आणि मानापमान, तुच्छता दर्शवणे याचा अधिककरून असावा.
:होय मलाही असेच वाटते.अहंकार दुखावला जाणे आणि अशा म्हणी वाक्प्रचार रूपके भाषेत आहेत याची नवीन पिढीला कल्पना नसल्याने वापरणारे आणि प्रथमच ऐकणारे असाही भेद आहे किंवा काय अशी शंका येते.
*ती भाषा आज प्रचारात आणावी/असावी हा खटाटोप/आग्रह/अपेक्षा व्यर्थ आहे.
:होय हे समजून घेणे हाच या चर्चा प्रस्तावाचा उद्देश आहे
@बॅटमन
*मराठी शिव्यांना झिडकारले तरी इंग्रजी शिव्या चालतात तुलनेने असेही पाहिले आहे. असो.
:मला वाटते आपल्या भाषेत शीष्ट न समजले जाणारे वैचारीक स्वातंत्र्य परभाषेत उपभोगावयाचे आणि आपल्या स्वतःच्या भाषेत नको हि कदाचीत मानवी प्रवृत्ती असावी
23 Aug 2013 - 10:05 am | सुनील
म्हणूनच मराठी माणसे पॅथोलॉजी लॅबमध्ये "युरीन" आणि "स्टूल" यांची सँपल्स देतात! ;)
22 Aug 2013 - 1:07 pm | दत्ता काळे
ती भाषा आज प्रचारात आणावी/असावी हा खटाटोप/आग्रह/अपेक्षा व्यर्थ आहे. तसे तर जुने ताम्रपट, राजाज्ञा यांवरच्या गद्धेगाळी आज चारचौघांत मोठ्याने वाचवणारही नाहीत, पण हे शिलालेख लोकांना दिसावेत आणि त्यांचा धाक निर्माण व्हावा म्हणून मुद्दाम चव्हाट्यावर उभारले गेले होते. हे मान्य. मी वर म्हटलेच आहे. वाचकवर्ग किती परिपक्व आहे ह्यावर ते अवलंबून आहे. एखादी कलाकृती सादर करताना भाषेच्या मर्यादा आड येत नाही नां ? ह्यावर तो सादरकर्ताच विचार करू शकतो.
22 Aug 2013 - 1:11 pm | आतिवास
माझ्या मते प्रश्न म्हणी आणि वाक्प्रचार वापरण्याचा नसून त्यामागच्या दुस-याला 'कमी लेखण्याच्या' मनोवृत्तीचा आहे.
काही वेळा म्हणी-वाक्प्रचार वापरुनही समोरच्या व्यक्तीचा आत्मसन्मान अबाधित राखता येतो आणि काही वेळा अगदी 'सांसदीय' (हल्ली संसदेत जी भाषा वापरतात ती आपण वापरायची म्हटलं तर कठीण आहे!!)भाषा वापरुनही समोरच्याचा जबरदस्त पाणउतारा करता येतो.
सबब, अति मोकळेपणा आणि अति हळवेपणा हे दोन्ही टाळता यावे आणि भाषेला नियमांच्या चौकटीत जखडून टाकू नये. - त्यातून फार फार तर नवी (परि)भाषा निर्माण होईल - मग किमान त्याबद्दल तक्रार तरी करु नये. (तुम्ही करता आहात तक्रार असं नाही - सर्वसाधारण विधान आहे ते!)
22 Aug 2013 - 1:14 pm | बॅटमॅन
एक सिंपल उदा. "%^&*च्या" प्रत्ययान्त असलेल्या शिव्या तादृश लागत नाहीत. पण एका विशिष्ट अॅक्सेंटमध्ये "बाऽव्ळट" म्हटल्यास ते बेक्कार लागते =))
22 Aug 2013 - 2:05 pm | माहितगार
लिहिणार्याच्या मनातला आणि वाचकाच्या मनातल्या काँटेक्स्ट वरीही बरेचसे अवलंबून असते. विचारपुर्वक दिलेल्या प्रतिसादा करता आभारी आहे.
22 Aug 2013 - 2:38 pm | विटेकर
भाषा समृद्ध होते ती त्यातील म्हणी आणि वाक्-प्रचारांनी , याबद्दल कोणाचेही दुमत नसावे. त्यामुळे भाषेला एक सौन्दर्य येते , रासवटपणा येतो , जो मराठीचा मराठीपणा म्हणून असणे अत्यंत आवश्यकही आहे.
राकट देशा कण्खर देशा आणि दगडांच्याही देशातील भाषेत असला खोड्करपणा आणि लडीवाळ्पणा आवश्यकच आहे.
अहो तर्री आहे म्हणून मिसळ आहे ना ?
खरे म्हणजे सांसदीय / असांसदीयपणा भाषेत नसून तो मनात असतो ! त्याशब्दांपेक्षा त्यामागचा भाव महत्वाचा आहे. अन्यथा कमीत कमी शब्दात ( ते ही अत्यंत सांसदीय भाषेत ) कमाल अपमानाचे पुणेरी तंत्र विकसित झालेच नसते.
आणि अत्यंत आदराने उल्लेख ( चितळे मास्तर - वर्गातील ढ मुलांना मास्तर आदरार्थी संबोधित ) केला म्हणजे आदर असतोच असे थोडेच आहे ? आणि आंतरजालावरील शब्द " लागावेत " इतके संवेदनाशील आपण केव्हा झालो ?
सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेचे जे संकेत आहेत ते किमान पाळावेत
हे आणि एव्ढेच खरे , बाकी फार विचार करु नये नाहीतर ".... खतरें में है " म्हणून आपल्या देशात फाजील लाड आणि लांगूलचालन चालू आहे तेच होईल . मूठ्भर लोकांसाठी सारे जण वेठीस धरण्यात काय हशील ?
कोणालाही दिवाणखान्यात मोठ्ठ्यांदा वाचताना संकोच होऊ नये इतपत तत्व प्रत्येकाने जबाबदारीने पाळावे.
अन काय सांसदीय धरून बसलात ? उप मुख्यमंत्रीमहोदयांचे उद्गार आठवा .. त्यापूर्वी एक मुख्यमंत्री म्हणाले . या तीन क्ष़़़़ बाया आहेत !! आता बोला ?
तेव्हा तर्री वाढ्वा मालक .. मजा येईल , जे आपल्याबरोबर येतील ते आपले , जे ठसका लागतो म्हणतील , ते आपसूकच थांबतील. मिपावर न येण्याचा प्रत्येकाचा अधिकार अबाधित आहे !
काय हे शिंचे .. हल्ली चांगले धागेच निघत नाहीत !
23 Aug 2013 - 3:22 am | शिल्पा ब
<<<आणि आंतरजालावरील शब्द " लागावेत " इतके संवेदनाशील आपण केव्हा झालो
साधारण १ -१/२ वर्षांपूर्वीपासुन सगळेच नै अन अशे मानसिक कमकुवत लोक वाढले आहेत म्हणून तसं जाणवतंय इतकंच असा एक अंदाज.
बाकी या शिंच्या धाग्याचं म्हणाल तर आमचे धागे उडवून टाकले त्यामुळे नैत।
तुम्हाला पर्सनली नै पण शिव्याच द्यायच्या झाल्या तर खणखणीत द्या कि…उगाच # ^ @ अशी मखलाशी कशाला ?
27 Aug 2013 - 12:20 am | प्रदीप भिमराव वानखदे
मला वाटते, मनातिल तगमग व्यक्त करण्याचा "म्हणी" हा अत्यन्त प्रभावी मार्ग आहे. जेव्हा अत्यन्त रागाने बोलावे वाटते पण बोलू शकत नाही तेव्हा अशा म्हणिचा वापर केला जातो. त्यावेळी रागाने जे काही बोलायचे असते, त्यापेक्शा म्हणीतुन व्यक्त होणार्या भावना त्यावेळी तरी बर्याच सौम्य असतात असे मला वाटते.