कोड मंत्र - अत्यंत प्रभावी सादरीकरण
लष्कराचे सैनिकांसाठी अत्यंत कठोर प्रशिक्षण सुरू आहे. मराठा रेजिमेंटच्या सैनिकांची एक मोठी तुकडी अत्यंत कठोर प्रशिक्षणाची वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवित आहे. परंतु या तुकडीतल्या रवी शेलार नावाच्या प्रशिक्षणार्थीला हे कठोर प्रशिक्षण झेपत नाहीय्ये. इतरांच्या तुलनेत तो मागे पडतो. त्यांच्या अधिकार्याला, कर्नल प्रतापराव निंबाळकरांना त्याचे मागे पडणे अजिबात सहन होत नाही.ते स्वतः अत्यंत कर्तव्यकठोर आहेत. नक्षलवाद्यांशी समोरासमोर लढताना स्वतःला गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केलेला आहे.