उंबरठा!
उंबरठा!
गंजल्या ओठांस माझ्या, धार वज्राची मिळूदे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ...
उंबरठा!
गंजल्या ओठांस माझ्या, धार वज्राची मिळूदे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ...
सतीश राजवाडेंचा प्रेमाची गोष्ट चित्रपट पहिला असेलच !!! त्यात राजवाडेंचा एक संवाद आहे चित्रपटाचे शीर्षक कसे क्लिअर पाहिजे त्यातून लोकांना कोडी घालत बसू नयेत. " एम. एस . धोनी - the untold story " हे शीर्षक चित्रपटाला साजेसेच आहे. ह्या चित्रपटात " मेरे नाम में भी महम्मद है " वा " किसीको इतना भी मत डराओ .... " असे हमखास टाळ्या खेचणारे संवाद नायकाच्या मुखी बिलकुल नाहीत , असे असूनसुद्धा धोनी हा चित्रपट संपल्यावर रसिकांना हा चित्रपट एक आनंद देऊन जातो हेच याच चित्रपटाचे खरे यश आहे.
नमस्कार, रसिक मायबापहो
Please, Look After Mom ही Kyung-sook Shin या कोरियन लेखिकेची कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या नावातच तिचा कथा विषय, आई, ठळकपणे सूचित होतो.
खरंतर आई या विषयावर विपुल लेखन झालेले आहे. पण ही कादंबरी मनात रेंगाळत राहते, ती तिच्यातले सखोल तपशील,निवेदनशैली आणि कथनातील कमालीच्या प्रांजळपणामुळे !
कादंबरी सुरु होते तीच मुळी वाचकाचे चित्त जखडून ठेवणाऱ्या, 'स्टेशनवर आई हरवली' या वाक्याने!
[इथे Albert Camus च्या 'The Outsider' मधील Mother died today या प्रसिद्ध ओळीची आठवण आल्याशिवाय रहात नाही!]
कमी बजेटच्या, जास्त मोठे चेहरे नसलेल्या चित्रपटांमधे बर्याचवेळा काहिना काही वेगळं बघायला मिळालयं. मग यारा सिलि सिली असेल किंवा डिअर डॅड. असे बरेच चित्रपट, त्यांचे विषय, त्यांना मांडणारे लेखक-दिग्दर्शक अगदीच नवखे असल्यानं त्यांच बजेट किंवा त्यांची जाहीरात, प्रसिद्धी या सर्व बाबतीत इतर बड्या बॅनर्सपेक्षा बर्याच मोठ्या प्रमाणात मागे राहतात. पण त्यांच्यामधे एक वेगळेपण असतं. याच पठडीतला गेल्या वर्षी प्रदर्शीत झालेला चित्रपट म्हणजे...'सोनाली केबल'..
आज खूप दिवसांनी "रंजीश-ही सही " ही मेहंदी हसन साहेबांची अजरामर गज़ल ऐकायचा योग आला . "गज़ल" .. खरं तर हा असा गायन प्रकार आहे की हा न आवडणारा प्राणी विरळाच सापडेल . मग ती जगजीत ची "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो " असो किंवा अगदी अलिकडची हरिहरन ची "मरीज-ए- इश्क " असो . गज़ल हा प्रकारच गारुड करणारा आहे . तर अश्या अनेक गझलांपैकी एक अत्यंत आवडणारी गज़ल म्हणजे अहमद फराज साहेबांची "रंजीश ही सही ".
अहमद फराझ यांच्या तशा खूपश्या गज़ल , रचना अत्यंत सुरेख आहेत. पण अत्यंत लोकप्रिय अशी म्हणावी ती ही गज़ल. ओघवतं काव्य अत्यंत सोपी सुरेख मांडणी , समजायला सोपं आणि एक "कशीश” असलेलं लेखन म्हणजे अहमद फराज.
‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’
लेखिका – आतिवास सविता.
निर्माता धर्मा प्रोडक्शन्स (जोहर फॅमिली) आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर नवीन चित्रपट घेऊन आलेले आहेत, बार बार देखो. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्याच सुपरस्टार शाहरुख खानच्या “कभी अलविदा ना केहना” मध्ये पण एका चांगल्या कन्सेप्टची निरर्थक हाताळणी मुळे वाट लागली होती, त्या अनुभवाची आठवण धर्मा प्रोडक्शन्सला ‘बार बार देखो’ करून देणार हे नक्की.
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!
स्पॉयलर अलर्ट लेवल: हाय !!!)
आशुतोश गोवारीकर हा एक प्रामाणिक सिनेमाकार आहे. तो जीव तोडून मेहनत करत सिनेमे काढतो. पण त्याचं दुर्दैव म्हणा किंवा प्रयत्नांची- अभ्यासाची कमतरता म्हणा, कुठेतरी कमी पडतो. त्याचा नवा 'मोहोन्जो-दारो'ही या लौकिकाला अपवाद नाही. लगान, जोधा अकबर यासारखं प्रत्येकवेळी मोठ्या कॅनव्हासवर चित्र काढायाची हौस कितीही असली तरी चित्राच्या विषयात आणि ते चितारणार्या कुंचल्यात तेव्हढा दम हवा नाहीतर 'गवत खाणारी गाय' या चित्रासारखी त्याची गत होते आणि पाहाणार्याला गवतही दिसत नाही अन् गायही. मोहोन्जो-दारोचीही काहीशी अशीच अवस्था झाली आहे.