मी नवीन हिंदी चित्रपट पाहत नाही पण एका आप्ताने दिवाळी निमित्त प्रायव्हेट स्क्रीनिंग साठी बोलावले असल्याने जावे लागले. म्हणून हा चित्रपट पहिला गेला. रेड सिग्नल तोडल्यावर जसे काही वेळ वाईट वाटते तसे वाटत आहे.
चित्रपटाची सुरुवात रणबीर कुणाशी तरी मुलाखत देत आहे असे वाटते. नंतर एका क्लब वर फोकस. क्लब मध्ये अनुष्का पाहिली आणि थेट दुसरा सिन पलंगावर प्रणयकीडा करताना. हा क्लीशे इतका मूर्खपणाचा आहे ! पण असुदे. पण थोडक्यांत रणबीर चा प्रणय प्रसंग फेल ठरतो आणि अनुष्का त्याची फार थट्टा उडवते. (मिपा वर कुणी तरी ते कसल्या तरी रिंग चे pdf टाकले होते ते त्याने कदाचित वाचायला पाहिजे.) रणबीर फार श्रीमंत बिसिनेस माणसाचा मुलगा आहे आणि त्याला भविष्यांत महंमद रफी व्हायचे आहे असे बोलण्यातून समजते.
ह्यापुढे चित्रपट "फ्रेंड झोन" मध्ये जातो. अनुष्का आणि रणबीर फ्रेंडझोन मधून बाहेर पडणार असे कदाचित दिग्दर्शक दाखवू इच्छित असावा पण प्रत्यक्षांत दोघांची ऍक्टिंग इतकी भिकार दर्जाची होती कि जणू काही ते मतिमंद भाऊ भगिनी आहेत असेच वाटत होते. पण फ्रेंड झोन मधून बाहेर पडायच्या आधीच फवाद येऊन अनुष्काशी निकाह करून जातो. फवाद DJ अली चा रोल प्ले करतो. अनुष्काचा हा पुराना आशिक म्हणून ती तात्काळ विवाह करते.
आता होते ऐश्वर्या रे हिची एंट्री. हि एके काळी विश्वसुंदरी असली तरी आता जुनी वाटते. रणबीर बरोबरची तिची चेमिस्त्रीं म्हणजे १६ वर्षाच्या टीनएजर ड्रॉयव्हरच्या हाती एखादी क्लासिक जुनी कार दिसावी तशी. कुठल्याही दृष्टिकोनातून हे प्रेम-प्रकरण वाटत नाही. दिल चाहता है मध्ये अक्षय खन्ना - डिम्पल जोडी होती तसे काही तरी वाटते. पण ते जाणून बुजून आहे कि चुकून तसे वाटते हे समजत नाही. एकूणच ऐश्वर्याचे प्रेयसी टाईप रोल करण्याचे दिवस संपले आहेत हे लक्षांत येते.
पण ऐश्वर्या रे रणबीरला दिसते तेंव्हा रणबीर "माझा पासपोर्ट ब्रिटिश आहे, मी ब्रिटिश बॉर्न आहे" असे सांगतो आणि ऐश्वर्या (जी एक शायरा आहे ) सुद्धा आपण ब्रिटिश आहे असे अभिमानाने सांगते.
एका संथ पार्टीत शाहरुख ची एंट्री होते. ह्यांत रणबीर त्याच्या वाढलेल्या वयाबद्दल बद्दल, शाहरुख ऐश्वर्याच्या वाढलेल्या वयाबद्दल आणि रणबीर काही तरी अगम्य जोक करतो. मला काही समजले नाही. त्यांत रणबीर ऐश्वर्याला रात्रभर झोपायला देत नाही असाही विनोद होतो. ऐश्वर्याला खोकल्याचा त्रास वगैरे असावा असे तिन्ही लोकां कडे पाहिल्यावर वाटते. शाहरुख खान आणि ऐश्वर्याची पुढील भेट ओल्ड एज होम मध्ये होईल असा एक विनोद टाकायला पाहिजे होता.
मोहोब्बत, दर्द असे बरेच काही तरी काही तरी अगम्य उर्दू भाषेंत शाहरुख में-में करत रडत रडत बोलतो. प्यार के बदले प्यार ना मिलनेकी फिलिंग क्या होती है वगैरे वगैरे. अचानक प्रेशर लागावा तसे रणबीर पळत जातो आणि अनुष्काला फोन लावतो. मग ते पुन्हा रडतात. मिस्ड यु वगैरे वगैरे. खरे सांगायचे तर रणबीर ने आजोबा - आजीची याद येऊन त्यांना फोन लावायला पाहिजे होता. थोडक्यांत शारुख ऐश्वर्याचा पुराना (खरोखर जुना) आशिक होता असे समजते.
मग दोघे (अनुष्का रणबीर) एकमेकांच्या बॉय फ्रेंड गर्ल फ्रेंड बद्दल चेट करत राहतात. अनुष्का त्याच्या DJ पती फवाद बरोबर विशेष खुश नाही असे वाटते. मग अनुष्का एक दिवस व्हिएन्ना मध्ये रणबीर आणि ऐश्वर्याला येऊन भेटते. एकूणच सिन मध्ये ऐश्वर्या रणबीर ची आई आहे आणि अनुष्का रणबीर ची गर्लफ्रेंड आहे असे वाटते. हा पोरटा बघायचा सिन एकदाचा संपतो. अतिशय अवक्वर्ड सिन आहे. जाणीव पूर्वक अवक्वर्ड आहे कि चुकून झाला हे समजत नाही. नूरजहाँ चे दर्द भरे गाणे पार्श्व्संगीत म्हणून वाजते, अनुष्का ऐश्वर्याला नूरजहाँ सारखी म्हणून संबोधिते. हे सगळे कॉम्प्लिमेंट आहेत कि टोमणे समजत नाही. पुन्हा रणबीर आपल्या आणि ऐश्वर्याच्या सेक्स लाईफ वर घसरतो. (हा चित्रपट क्लासिक झाला तर लोक भविष्यांत रणबीर च्या पात्राला आपल्या पलंगातील कमजोरी बद्दल न्यूनगंड आहे म्हणून तो पुन्हा पुन्हा तो विषय काढतो असे एक्स्पर्ट अनालिसिस करतील)
ह्या नंतर रणबीर आणि अनुष्का बाहेर फोटपाथवर येऊन खूप भांडण करतात. रणबीर थोडी धक्का बुक्की करतो. "प्यार नाही करती क्या ? " असा चेतन भगत च्या स्टोरी मधील नायका सारखा प्रश्न रणबीर करतो. "प्यार करती हुन लेकिन तूम जैसे समजते हो वैसा नाही' म्हणून ती शेवटी जाते (क्लासिक फ्रेंडझोनड) . घरांत आंत आल्यावर ऐश्वर्या " इट्स ओव्हर" असे रणबीर ला सांगते कारण "में तुम्हे चाहने लागी हु, लेकिन तुम्हारे आंखो मे मैने उसके लिये चाहत देखी है, समाजोगे नाहि समजोगे तो बिखर जाओगे ब्लाह ब्लाह ब्ला" उर्दूत काही तरी म्हणून त्याला घरांतून बाहेर काढते. (म्हणजे इतका काळ हा श्रीमंत पोरटा हिच्या जिवा वर जगत होता). घरांतून बाहेर काढले कि रणबीर धावत राहतो अगदी फॉरेस्ट गम्प मधील टॉम हँक्स सारखा फक्त थोडा जास्त रिटार्डेड वाटतो. (ह्या वेळी "ही इस फ्लॅश" असे कुणाचे तरी कार्टे माघून ओरडले). पळत तो अनुष्का जवळ येऊन पुन्हा काही तरी अगम्य अलंकारिक भाषेंत बरळतो आणि पुन्हा बाहेर येऊन फुटपाथवर रडतो. मग एक गाणे आहे. गाण्याची लय, बोल ह्यांचे कथेशी प्रसंगाशी काहीही संबंध नाहीत.
माझ्या शेजारची पंजाबी आंटी चित्रपट संपला असे समजून उठली पण बहुदा तिच्या मुलाने हात पकडून तिला पुन्हा बसवले.
अचानक त्या निरर्थक गाण्याचा अर्थ समजतो. रणबीर आपली गाणे युट्युब वर टाकतो, त्याला प्रचंड हिट्स भेटतात. तो अचानक स्टार होतो. एका शो च्या दरम्यान त्याला फवाद दिसतो. बोलता बोलता समजते कि दोन वर्षे आधीच अनुष्का ने त्याला सोडले आहे. (बॉलिवूड मधील शेकडो चित्रपट ह्याच स्टोरी वर आधारले आहेत, सर्वांत हल्लीच चित्रपट म्हणून लव आज कल ची आठवण आली ).
मग काय रणबीर पुन्हा फॉरेस्ट गम्प मोड मध्ये जाऊन तिला शोधतो. एकदा ची ती भेटते. डोके अगदी सफाचट (अनुष्काचे). म्हणजे तिला कॅन्सर होता. मग तो टॉयलेट मध्ये बसून रडतो. ती त्याची समजूत काढते. "बोहोत कुल थी में, लाईफ ने फुसकी बना दिया" हा गुंडा स्टाईल डायलॉग मारते. सफाचट डोक्यांत अनुष्का म्हणजे अगदी बाथटब मधील डक वाटते. गांधारी प्रमाणे रणवीर सुद्धा आपले डोके सफाचट करतो.
मग दोघे पुन्हा कराओके वगैरे करतात. पुन्हा रँडम नाच गाणे. शेवटी कल हो ना हो चे गाणे आणि लग जा गले गाणे वाजवले जाते. गाण्यावर दोघेही डान्स करतात. मग अनुष्काचे शेवटचे दिवस दाखवले जातात. (बाजूची पंजाबी आंटी डोळे पुसत होती.) अश्यांत पुन्हा काही तरी वाद होतो.
डायलॉग असे आहेत :
रणबीर : "मुझे तुम्हारे साथ सोना नही है मुझे तुम्हारा प्यार चाहिये है." (कुठे भेटतात असले बॉयफ्रेंड्स ? )
अनुष्का : "मैं तुमसे झूट बोल नहीं सकती." (कुठे भेटतात असल्या मुली ? )
रणबीर : "वो DJ अली का प्यार मुझे देदो. में भी उसके तरह टेटू बनवूंगा" (मागायला गाडीची चावी आहे काय ?)
शेवट अनुष्का पुन्हा ह्याला घराबाहेर काढते. पुन्हा दोघांचे स्वगत दाखवले जाते. शब्दांचा काहीही अर्थ लागत नाही. गुलजारचे "मेरा कुछ सामान" नावाचे वाह्यात गाणे आहे त्याची आठवण येते. सगळे खूप ऍब्स्ट्रॅक आहे किंवा पूर्णतः रिटार्डेड आहे.
मग शेवटी इतर सर्व बॉलिवूड चित्रपटा प्रमाणे रणबीर पुन्हा फॉरेस्ट गम्प मोड मध्ये जाऊन धावतो, एअरपोर्ट वर पोचतो. ती प्लेन मध्ये बसलेली असते आणि उतरण्यास नकार देते. काही तरी हेल्थ इशू होऊन तिला प्लॅन बाहेर स्ट्रेचर वर आणले जाते. ती मरत आहे असे वाटत असतानाच "मे ऍक्टिंग कर रही हू" (प्लेन वरून उतरण्यासाठी) असे सांगते. एकूणच चित्रपटांत तिचा आणि ऍक्टिंग चा काही संबंध आहे असे वाटत नाही. इथे स्पष्टपणे सांगितले म्हणून समजते.
आता पुन्हा रणबीर चे स्वगत. इथे रणबीर मुलाखत घेणाऱ्याची परमिशन घेऊन अरिजित च्या आवाजांत गाणे गातो.
आणि चित्रपट एकदाचा संपतो.
थोडक्यांत :
चित्रपटांतील १००% पात्रे मुस्लिम आहेत. जणू काही पाकिस्तानी लोकांना चित्रपट काढायचा होता पण त्यांच्या कलाकारांना घेऊन काढला तर भारतांत चालणार नाही म्हणून रणबीर, अनुष्का इत्यादी ना घेतले आहे असे वाटते. औषधाला सुद्धा भारतीय संस्कृती दाखवली नाही. लखनौ चा एक उल्लेख येतो इतकेच. ह्याच्या साठी विशेष मेहनत घेतली आहे असे वाटते. बहुतेक शूटिंग फॉरीन मधील आहे. मेड इन चायीना माल सुद्धा परवडला पण हे धड भारतीय नाही धड पाश्चात्य नाही धड पाकिस्तानी नाही असा फ्रेन्केनस्टेन मॉन्स्टर नकोसा वाटला. संपूर्ण चित्रपटच पाकिस्तानी आहे असे वाटले.
डायलॉग बाबर खानच्या बिग बजेट भावाने लिहिले आहेत असे वाटले. उर्दू भाषेची मला थोडी फार समज आहे, त्यामुळे मलाच समजले नाही अशी शक्यता कमी आहे. डायलॉग मध्ये उर्दू पद्य फार घुसडले आहे पण त्याचा अर्थ अजिबात लागत नाही. गँग्स ऑफ वासींपुर मधील "बेटा तुमसे ना हो पायेंगा" हा डायलॉग लेखकाला सांगावा असे अनेकदा वाटले. शिद्दत काय, नूर काय, कायनात काय.. नूडल्स मध्ये मसाल्याचे पाकीट उधळावे तसे शब्द उधळले गेले आहेत.
चित्रपटाचा सेविंग ग्रेस म्हणजे लिसा हेडन हीचा २ मिनिटांचा रोल. रणबीरची ती शॉर्ट टाईम गर्लफ्रेंड बनली आहे. तिचा रोल एका बिंबोचा आहे अँड शी इस अ नॅचरल.
ऐश्वर्याने चित्रपट सन्यास घ्यावा किंवा वयस्कर भाभी वगैरेचा रोल भविष्यांत करावा . तिचं एकटीच्या कामाईवर आता बच्चन घराण्याचा खर्च चालणार नाही म्हणून आतांच सर्व फॅमिलीने आराध्यावर फोकस करावे.
रणबीर चे १००% चित्रपट खालील टेम्प्लेट मधील आहेत.
१. बेफिकीर मुलगा
२. मुलगी सापडते
३. मुलगी धिक्कारते
४. धक्याने ह्याचे जीवन सुधारते
५. ती मुलगी किंवा दुसरी चांगली सापडते/ कायमची दुरावते.
(पाहावे : बर्फी, वेक अप सीड, एक में एक तू, बचना ये हसींनो इत्यादी इत्यादी)
हल्ली मशीन लर्निंग इतके सुधारले आहे कि गाड्या स्वतःहून चालतात, दिवस दूर नाही जेंव्हा रणबीर ऐवजी रोबोट घेऊन हे रोल करवून घेणे स्वस्त होईल. त्याशिवाय रोबोटचा चेहरा आणखीन ४ एक्सप्रेशन जास्त देईल.
बॉलिवूड म्हणजे खरे तर आपली सॉफ्ट पावर असायला पाहिजे होती पण प्रत्यक्षांत आपल्या देशाच्या जनतेवर विदेशी आणि पाकिस्तानी सॉफ्ट पावर किमान ह्या चित्रपटातून मुद्दामहून प्रोजेक्ट होते आहे हि भावना प्रखर पणे जाणवली.
कैन्सर पेशंटचे असे क्लीशेड चित्रण दाखवणे सुद्धा मला फार खटकते. रणबीर दोन वेळा अनुष्काला जोराने ढकलतो.
प्रतिक्रिया
30 Oct 2016 - 2:21 pm | कविता१९७८
भारी
30 Oct 2016 - 2:47 pm | टवाळ कार्टा
बिंबो म्हणजे काय??
30 Oct 2016 - 3:04 pm | साहना
पहावे https://www.google.com/search?q=bimbo&ie=utf-8&oe=utf-8
30 Oct 2016 - 8:31 pm | बोका-ए-आझम
शिवाय तो एक ब्रेडचा ब्रँड आहे.
30 Oct 2016 - 3:13 pm | चित्रगुप्त
हा पिच्चर कधीच बघणार नाही, म्हणून हे परिक्षण वाचले आणि आवडले. संपूर्ण पिच्चर बघण्याच्या चिकाटीला सलाम.
30 Oct 2016 - 3:36 pm | यशोधरा
आत्तापरेंत सगळी जितकी परिक्षणे वाचली ह्या चित्रपटाची, ती चित्रपट बेक्कार आहे असेच जाणवून देणारी आहेत. नाही बघणार.
30 Oct 2016 - 6:05 pm | ऋषिकेश
इथेही सगळ्यांचे एकमत आहे की हा सिनेमा टुकार आहे.
मलाही नाही आवडला. पैसे वाया
30 Oct 2016 - 8:33 pm | बोका-ए-आझम
यांच्यात जे साम्य आहे त्याचे आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. हाही लेख त्याला अपवाद नाही.
30 Oct 2016 - 9:09 pm | स्रुजा
परिक्षण आवडले.. पंचेस भारी आहेत एक एक. मजा आली वाचताना. पण..
मेरा कुछ सामान ला वाह्यात म्हणालात म्हणुन जोरदार निषेध आणि एक मै एक तु मध्ये तो आमीर खान चा ठोकळा भाचा होता, रणबीर नव्हता.
31 Oct 2016 - 12:42 am | साहना
आह ! दोघां मध्ये फरक समाजणे सुद्धा मुश्किल आहे.
30 Oct 2016 - 10:04 pm | अमितदादा
भारी पंचेस.....भविष्यात अभिषेक चा चित्रपट आल्यास त्याच परीक्षण लिहा, वाचाय आवडेल.
30 Oct 2016 - 10:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पिच्चरं आधीपासुनचं डोक्यात गेलेला असल्याने पहाणार नव्हतोचं. आता अजुन १०-१२ जणांनाही सांगेन हे.
रच्याकने पिक्चर कितीही भीषण असो ते अर्जित सिंगचं "ए दिल है मुश्किल" मस्तंच आहे. अर्थात क्रेडिट गोझ टु अर्जित सिंग. पिळुन पिळुन गाणं म्हणतो राव तो.
30 Oct 2016 - 11:10 pm | रेवती
परिक्षण पूर्ण वाचले नाही............अर्धेही वाचले नाही. सिनेमा पहायचा नाही एवढे नक्की समजले.
माझ्या शत्रूंनी हा सिनेमा पहावा म्हणून जोरदार झायरात करीन व मित्रमंडळींना यापासून (व शिवायपासून) वाचवीन. ;)
31 Oct 2016 - 3:19 am | पिलीयन रायडर
मग असं होतं.. मग तसं होतं.. टाईप परीक्षण आहे. पण काही काही पंचेस मस्त आहेत.
गुलजारचं कोणतंही गाणं वाह्यात असु शकत नाही... मेरा कुछ सामान तर अजिबातच नाही. तेव्हा ते एक वाक्य अगदीच उगाच टाकलंय.
पिक्चर बघणार नव्हतेच.
31 Oct 2016 - 12:27 pm | चिन्मना
+१. मेरा कुछ सारख्या नितांत सुंदर गाण्यावर अशी कमेंट टाकणे यावरुनच लेखकाची समज कळते.
31 Oct 2016 - 3:19 am | पिलीयन रायडर
मग असं होतं.. मग तसं होतं.. टाईप परीक्षण आहे. पण काही काही पंचेस मस्त आहेत.
गुलजारचं कोणतंही गाणं वाह्यात असु शकत नाही... मेरा कुछ सामान तर अजिबातच नाही. तेव्हा ते एक वाक्य अगदीच उगाच टाकलंय.
पिक्चर बघणार नव्हतेच.
31 Oct 2016 - 2:25 pm | पाटीलभाऊ
वाटलंच होत कि अतिशय टुकार चित्रपट असेल म्हणून.
31 Oct 2016 - 2:33 pm | कैलासवासी सोन्याबापु
माझ्या शेजारची पंजाबी आंटी चित्रपट संपला असे समजून उठली पण बहुदा तिच्या मुलाने हात पकडून तिला पुन्हा बसवले.
सगळ्या पम्मी आंटी एकसारख्या कश्या असू शकतात ह्या विचारानेच गडबडा लोळून हसलो, तुमच्याकडल्या पम्मी आंटी गिल होत्या का अहलुवालिया?? =)) =)))
31 Oct 2016 - 3:31 pm | टुंड्रा
"गुलजारचे "मेरा कुछ सामान" नावाचे वाह्यात गाणे आहे त्याची आठवण येते."
कृपा करून कधी गाण्याचे परीक्षण लिहायला जाऊ नका ...