खन्त
परवाच सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली.. एकाचवेळी दोन प्रतिक्रिया मनात उमटत होत्या. शिवाजी महाराजांचा पराक्रमाचे प्रतीक पाहून अभिमानाने छाति भरून यत होती तर दुसर्याच वेळी किल्ल्याची झालेली द्यनीय अवस्था पाहून लाजेने मान खाली झुकत होती. काय रुबाब होता एक वेळ सिंधुदुर्गाचा!!! अरबी समुद्राच्या लाटेला न जुमनता थेट परकीय जुलमी राजवटीला आव्हान देत मराठ्यांचे समुद्रावर वर्चस्व निर्माण करणारा आज तोच त्या समुद्राच्या लाटांमधे स्वतहाचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय.