पहिल्या महायुद्धातील कोल्हे
कोल्हा हा कुत्र्याच्या जातीतील एक अत्यंत हुशार, कळपात राहणारा, आणि अत्यंत निष्ठुर प्राणी आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१६-१९१७ मध्ये कडाक्याच्या हिवाळ्यात विल्नीयस आणि मिन्स्कच्या भागात जर्मन आणि रशियन सेना एकमेकांशी लढत होत्या. बर्फात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढताना दोन्हीकडच्या सैन्याची अगदी दैन्यावस्था झाली होती. तेथील बर्फाळ भागात राहणाऱ्या कोल्ह्यांनाही युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची चांगली मेजवानी मिळत होती. जिवंत माणसाच्या गरम रक्ताची चटक त्यांना लागत चालली होती. थोडा धीर दाखवून ते एकट्या दुकट्या सैनिकांवर देखील हल्ला करू लागले.