Sheet Anchor of Indian Chronology
अलेक्झँडर, चन्द्रगुप्त मौर्य, चाणक्य, अंभी, पौरस इत्यादि नावे जी आपणास आज ठाऊक आहेत ती सर्व पश्चिमेकडील ग्रीक लोकांच्या लेखनातून उपलब्ध झाली आहेत. भारतीय प्राचीन साहित्यात एकतर अलेक्झँडर, अंभी, पौरस कोठेच भेटत नाहीत आणि 'त्या' प्रसिद्ध लढाईविषयीहि एकहि उल्लेख नाही. अर्थात लढाई झाली हे सत्य आहे कारण अनेक ग्रीक लेखनांमधून तिचा उल्लेख मिळतो पण त्या ग्रीक सैन्यामध्ये कोणी एक चन्द्रगुप्त होता ज्याने चाणक्य ह्या राजनीतिपटु ब्राह्मणाच्या सहकार्याने नंदकुलाचा नाश केला ह्यामागे काही पुरावा नाही.