हे वर्ष राम गणेश गडकर्याच्या संगीत एकच प्यालाच्या शताब्दीचे असून महाराष्ट्र शासन आणि जनता हे महान नाटक पूर्ण पणे विसरून गेली आहे. मिसळपाव वर वावर असलेल्या पत्रकारांना विनंती अशी की त्यांनी यात लक्ष घालून शासनाला याबाबत जागे करावे.
दुव्यांबद्दल आभार. काल एका मित्राशी रा.ग.गडकरी यांच्या विषयी चर्चा करत होतो तेव्हा तो भडकला आणि म्हणाला-
''गडकरी हे त्या काळातले ठळक प्रतिगामी,पुनरुज्जीवनदी नाटककार होते !त्यांनी विकृत केलेलं मराठी नाटक अजूनही ताळ्यावर आलं नाही !अजूनही मनुस्मृतीचे आदेश कायम ठेवूनच हे नाटक नवनवीन रूपं घेतंय. मूळ सूत्र तेच,दारुड्या नवऱ्यानं प्रत्यक्ष कितीही लाथाडले तरी,"कशी या त्यजू पदाला"असं म्हणणाऱ्या सिंधुचा आदर्श कायम आहे. हे गडकऱ्यांचं योगदान अक्षय/अमर आहे !''
प्रतिक्रिया
6 Jun 2018 - 12:04 pm | कंजूस
कायकाय पर्याय जागे करण्याचे आहेत?
6 Jun 2018 - 12:18 pm | एस
तुम्ही एखादा छान लेख लिहा. नक्कीच मुद्रित माध्यमे दखल घेतील.
6 Jun 2018 - 3:04 pm | manguu@mail.com
प्रभु आजि गमला मनी तोषला
6 Jun 2018 - 3:10 pm | manguu@mail.com
https://www.youtube.com/watch?v=yXx364tOvHk
रवि पटवर्धन
6 Jun 2018 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन व्हायला पाहिजे.
-दिलीप बिरुटे
7 Jun 2018 - 2:28 am | निमिष ध.
दोन महिन्यांन पूर्वीच लोकसत्ता मध्ये २ - ३ लेख आले होते एकच प्याला च्या शताब्दी निमीत्त. तुम्ही वाचले नसतील तर इथे लिंक देतो आहे.
https://www.loksatta.com/lekha-news/ekach-pyala-marathi-sangeet-natak-pr...
https://www.loksatta.com/lekha-news/hundred-years-of-ekach-pyala-marathi...
https://www.loksatta.com/lekha-news/ganesh-bodas-ekach-pyala-marathi-san...
8 Jun 2018 - 8:11 am | युयुत्सु
या सर्व दूव्यांबद्द्ल मनःपूर्वक आभार! पहिला आणि शेवटचा दूवा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.
8 Jun 2018 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुव्यांबद्दल आभार. काल एका मित्राशी रा.ग.गडकरी यांच्या विषयी चर्चा करत होतो तेव्हा तो भडकला आणि म्हणाला-
''गडकरी हे त्या काळातले ठळक प्रतिगामी,पुनरुज्जीवनदी नाटककार होते !त्यांनी विकृत केलेलं मराठी नाटक अजूनही ताळ्यावर आलं नाही !अजूनही मनुस्मृतीचे आदेश कायम ठेवूनच हे नाटक नवनवीन रूपं घेतंय. मूळ सूत्र तेच,दारुड्या नवऱ्यानं प्रत्यक्ष कितीही लाथाडले तरी,"कशी या त्यजू पदाला"असं म्हणणाऱ्या सिंधुचा आदर्श कायम आहे. हे गडकऱ्यांचं योगदान अक्षय/अमर आहे !''
गप्प बसून घेतलं.
-दिलीप बिरुटे
8 Jun 2018 - 5:30 pm | युयुत्सु
:)