नजरेतून पायउतार होणं
कधी जमलंच नाही
काय शोधत होतो अखेरपर्यंत
ते कधी कळलंच नाही
तो वेग मंदावला असाच
वारा बेभान वाहतच होता
धावता धावता कधी थांबलो
ते कळलंच नाही
खाली जमिनीवरूनच घेतला
वेध मी आकाशाचा
इच्छा मनात धरिता
तारा निखळून पडला
काय मागितलं होतं
अन काय पदरात पडलं
ते समजलंच नाही
सांगोपांगी कथा बहू ऐकल्या
काही ठेवल्या मनात
तर काही ओठात
जे घडलं प्रेमात माझ्या
ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही
माझं प्रेम माझ्याकडेच राहिलं
मला कधी फळलंच नाही
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}