भारताचा एक खरा पण अप्रसिद्ध नायक (अनसंग हिरो) : माथुन्नी मॅथ्यूज
काही माणसे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता, जगावेगळे धैर्य दाखवून, आपल्याशी तसा काही तडक संबंध नसलेल्या लोकांना वाचविण्यासाठी असामान्य कार्य करतात. अश्या माणसांना बर्याचदा पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि थोडीबहूत मिळाली तरी, यातली बरीच माणसे प्रसिद्धिपराङमुख असल्याने, जनतेच्या आठवणीतून सहज निघून जातात. मात्र, अशी माणसे खर्या अर्थाने नायक (हिरो) असतात.